Home » Navratri : ‘या’ मंदिरात देवीला प्रसन्न करण्यासाठी चक्क दिल्या जातात शिव्या

Navratri : ‘या’ मंदिरात देवीला प्रसन्न करण्यासाठी चक्क दिल्या जातात शिव्या

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navratri
Share

आजपासून शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. आदिमाया, आदिशक्ती, त्रिपुरसुंदरी देवीचा हा मोठा उत्सव आता पुढील नऊ दिवस जल्लोषात साजरा केला जाणार आहे. आजपासून पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात आज सर्वत्र घटस्थापना केली जाईल. नवरात्राच्या काळात देवीचे देवत्व पृथ्वीवर जास्त असते. त्यामुळे जर आपण नवरात्रामध्ये मनापासून देवीची उपासना केली तर ती नक्कीच आपल्याला प्रसन्न होते आणि मनाजोगा आशीर्वाद देते. (Navratri 2025)

आता नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर. त्यामुळे आजपासून आपल्याला देशातील लहान, मोठ्या प्रसिद्ध अशा सर्वच देवीच्या मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळेल. देवीच्या विविध मंदिरांमध्ये जाऊन तिचे दर्शन घेणे नवरात्रीमध्ये शुभ समजले जाते. भारतात देवीची असंख्य मंदिरं आहेत. देवीची ५१ शक्तीपीठं आहेत. शिवाय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशी साडे तीन शक्तीपीठं आहेत. आता हि सर्वच मंदिरं भक्तांनी गजबजलेली दिसणार आहेत. (Marathi News)

सामान्यपणे आपण मंदिरात गेल्यानंतर आपण पूजेचे सामान घेतो जसे की ओटी, साडी, फुलं, हार गजरे, नारळ आदी आणि मंदिरामध्ये आत गेल्यानंतर तिचे स्तोत्र म्हणत तिला साद घालतो. मात्र याला एक मंदिर अपवाद आहे. या मंदिरात चक्क देवीला शिव्या दिल्या जातात आणि तिची पूजा केली जातात. वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल मात्र ही बाब खरी आहे. (Latest Marathi Headline)

Navratri

भारतात एक असे मंदिर आहे जिथे देवीला शिव्या दिल्या जातात. मात्र या शिवाय कोणत्या रागातून नाही तर श्रद्धेच्या दृष्टिकोनातून दिल्या जातात. काय आहे यामागचे कारण? आणि कोणते आहे हे असे आगळे वेगळे मंदिर चला जाणून घेऊया. दक्षिण भारतातील केरळमध्ये असलेल्या माता भद्रकालीच्या मंदिरात तिच्या उग्र स्वरूपाची पूजा केली जाते. येथे भक्त देवीला शिव्या देतात. (Todays Marathi Headline)

केरळमधील कोडुंगल्लूर जिल्ह्यात असलेल्या एका मंदिरात भद्रकाली देवीच्या उग्र स्वरूपाची पूजा ‘कुरुंबा भगवती’ या नावाने केली जाते. देवीच्या मूर्तीसोबत या मंदिरात गणपती आणि वीरभद्र यांची देखील पूजा होते. येथे दरवर्षी एक भव्य उत्सव होतो, ज्यामध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध विधी केले जातात आणि भक्तांकडून देवीला शिव्याही दिल्या जातात, ही या ठिकाणची एक अनोखी परंपरा आहे. (Marathi Top Headline)

या कुरुंबा भगवती मंदिरात स्थापित असलेली देवीची मूर्ती ८ भुजांची असून सुमारे ६ फूट उंच आणि रागीट स्वरूपात आहे. दरवर्षी या मंदिरामध्ये मार्च, एप्रिल महिन्यात भरानी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात शिव्या, तलवारी आणि देवीची चेतना घेऊन वेढलेला वेलिचपड साधकांचा कार्यक्रम अत्यंत प्रसिद्ध मानला जातो. (Latest Marathi News)

इथे राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मते आधी या मंदिराच्या जागी शिवशंकराचे मंदिर होते. मात्र नंतर भगवान परशुरामांनी देवी भद्रकालीची इथे स्थापना केली. त्यानंतर आजवर इथे या देवीची अविरत पूजा होत आहे. आता तर हे मंदिर खूपच प्रसिद्ध झाले आहे. दूरदूरवरून लोक इथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. असे सांगितले जाते की, रक्तबीजशी युद्धानंतर भद्रकालीचा राग अत्यंत उग्र झाला आणि भक्तांनी तिला शिवीगाळ करून शांत केले. त्यानंतर या मंदिरात ही परंपरा आजही चालू आहे. (Top Trending News)

========

Navratri : पहिली माळ : नवदुर्गेचे प्रथम स्वरुप- शैलपुत्री देवी

========

या भद्रकाली मंदिरात वेलिचपड़ हा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळेस महिला देवी कळीच्या रूपात तयार होतात आणि हातात तलवारी घेऊन देवीची पूजा करतात. असे मानले जाते की, या काळात या सर्व महिलांमध्ये देवीचा वास असतो. वेलिचपड़ या कार्यक्रमादरम्यान देवीला शिव्या दिल्या जातात आणि वाईट बोलले जाते. असे बोलून तिला प्रसन्न केले जात असल्याची आख्ययिका आहे. मात्र यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीच मंदिराचे आणि देवीचे शुद्धीकरण केले जाते. देवीला चंदनाचा लेप देखील लावला जातो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.