सगळीकडे सध्या नवरात्रीचा माहोल पाहायला मिळत आहे. देवीची पूजा, पाठ, रास, गरबा, दांडिया आदी सर्वच गोष्टींमुळे एक नवा हुरूप आणि उत्साह सगळ्यांमध्ये दिसून येत आहे. प्रत्येक दिवसाचे खास महत्व असलेल्या आणि देवीच्या एका रूपाची पूजा केल्या जाणाऱ्या नवरात्रीमध्ये आठव्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. या आठव्या दिवसाला अष्टमी असेही म्हटले जाते. आज १० ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा आठवा दिवस त्यामुळे आज देवी महागौरीचे पूजन केले जाते.
पौराणिक मान्यतेनुसार देवी महागौरी ही शिवाची अर्धांगिनी म्हणून ओळखली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. यामध्ये देवीला पांढरे वस्त्र आणि दागिने घातले जातात. देवी अन्नपूर्णेच्या रुपाने भक्तांना सुख आणि समृद्धी प्रदान करत असते. महागौरी देवीच्या स्वरूपाबद्दल सांगायचे झाले तर देवीच्या एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात डमरु आहे. तिसऱ्या हात अभय देणारा असून, चौथा हात हा वरमुद्रा देणारा आहे. महागौरी ही करुणा आणि दयेची देवी मानली जाते. महागौरी देवीचे वाहन वृषभ अर्थात बैल आहे. त्यामुळेच देवीला वृषभारूढा देखील म्हटले जाते.
महागौरीच्या पूजेचे महत्त्व
महागौरी ही देवी मानले जाते. पौराणिक कथेनुसार महागौरीचे आपल्या भक्तांवर मुलांप्रमाणे प्रेम आहे. ती महादेवाची पत्नी म्हणून ओळखले जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. तसेच ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात सतत समस्या येत आहेत त्यांनी महागौरीची पूजा करावी. देवी आईच्या आशीर्वादाने उत्तम जोडीदार मिळतो. देवीची पूजा केल्याने येणारे सर्व संकट दूर होऊन सर्व पापांपासून मुक्ती मिळते. देवीच्या आशीर्वादाने सौख्य, ऐश्वर्याची प्राप्ती होते.
महागौरी पूजा विधी
नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीला पांढऱ्या रंगाचे कपडे अर्पण करा. तसेच महागौरीला पांढरे फूल अर्पण करा. देवीला नैवेद्य अर्पण करुन आरती आणि मंत्र म्हणा. देवीला पुरी, चणे आणि हलवा प्रामुख्याने देवीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यासोबतच पांढऱ्या रंगाची वस्तू आणि मिठाई देखील तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकतात.
महागौरी देवी कथा
काली रूपातील मातेचे काळे पडलेले शरीर पाहून भगवान शंकरांनी तिची चेष्टा केली. ती चेष्टा मातेला सहन झाली नाही.तेव्हा पार्वती माता तपश्चर्या करू लागली. अनेक वर्ष लोटली तरी पार्वती माता परतली नाही. मातेच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी मातेला हिमालयातील सरोवरात स्नान करावे. मातेने तसे केले अन् मातेची कांती चंद्रापेक्षाही अधिक सुंदर झाली.
दुसऱ्या एका कथेनुसार, भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी, देवीने कठोर तपश्चर्या केली होती. ज्यामुळे त्यांचे शरीर काळे पडले होते. देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव तिचा स्वीकार करतात आणि भगवान शिव तिचे शरीर गंगाजलाने अभिषेक घातला, त्यानंतर देवी तेजस्वी बनले. आणि तेव्हापासून तिचे नाव महागौरी पडले.
महागौरी मंत्र
मंत्र: या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्था.
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
ध्यान मंत्र
वंदे वांछित कामर्थेचंद्रघकृतशेखरम् ।
सिंहरुडाचतुर्भुजामहागौरीशस्विनीम् ॥
पुणेंदुनिभंगोरी सोमवक्रस्थिथम अष्टम दुर्गा त्रिनेत्रम् ।
वराभितीकारंत्रीसुल
पातांबरपरिधानमृदुहास्यनालंकारभूषितम् ।
मंजिर, कार, केयूर, किंकिनीरत्न कुंडल मंडितम्
प्रफुल्ल वदनमपल्लवधारकांता कपोलंचैवोक्यमोहनिम ।
कमनीयनलावण्यमृणालचंदन गंध लिप्तम्|
स्तोत्र मंत्र
सर्वसंकट हंत्रीत्वंहिधन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदाचतुर्वेदमयी,महागौरीप्रणमाम्यहम्॥
सुख शांति दात्री, धन धान्य प्रदायनीम्।
डमरूवाघप्रिया अघा महागौरीप्रणमाम्यहम्॥
त्रैलोक्यमंगलात्वंहितापत्रयप्रणमाम्यहम्।
वरदाचैतन्यमयीमहागौरीप्रणमाम्यहम्॥
कवच मंत्र
ओंकार: पातुशीर्षोमां, हीं बीजंमां हृदयो।
क्लींबीजंसदापातुनभोगृहोचपादयो॥
ललाट कर्णो,हूं, बीजंपात महागौरीमां नेत्र घ्राणों।
कपोल चिबुकोफट् पातुस्वाहा मां सर्ववदनो॥
महागौरी देवी आरती
जय महागौरी जगत की माया ।
जय उमा भवानी जय महामाया ॥
हरिद्वार कनखल के पासा ।
महागौरी तेरा वहा निवास ॥
चंदेर्काली और ममता अम्बे
जय शक्ति जय जय मां जगदम्बे ॥
भीमा देवी विमला माता
कोशकी देवी जग विखियाता ॥
=======
हे देखील वाचा : नवरात्रातील अष्टमी तिथी आणि कन्यापूजनाचे महत्व
=======
हिमाचल के घर गोरी रूप तेरा
महाकाली दुर्गा है स्वरूप तेरा ॥
सती ‘सत’ हवं कुंड मै था जलाया
उसी धुएं ने रूप काली बनाया ॥
बना धर्म सिंह जो सवारी मै आया
तो शंकर ने त्रिशूल अपना दिखाया ॥
तभी मां ने महागौरी नाम पाया
शरण आने वाले का संकट मिटाया ॥
शनिवार को तेरी पूजा जो करता
माँ बिगड़ा हुआ काम उसका सुधरता ॥
‘चमन’ बोलो तो सोच तुम क्या रहे हो
महागौरी माँ तेरी हरदम ही जय हो ॥