आज नवरात्राची तिसरी माळ. आजच्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा रूपाचे पूजन केले जाते. आदिमायेच्या जागर असलेल्या नवरात्रामध्ये देवीच्या नऊ रूपांची भक्तभावाने पूजा केली जाते. स्त्रीशक्तीचा जागर म्हणून देखील नवरात्राला ओळखले जाते. नवरात्र म्हणजे देवीची पूजा आणि गरबा, दांडियाचा रास. आता नवरात्र म्हटले की गरबा आणि दांडिया आलेच. किंबहुना गरब्याशिवाय नवरात्र अपूर्णच असते. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीसमोर गरबा आणि दांडिया खेळाला जातो. छान तयार होऊन लोकं गरबा खेळायला जातात. आणि मनसोक्त गरबा, दांडिया खेळतात. (Marathi)
आता गरबा आणि दांडिया म्हणजे एक प्रकारचा डान्सच आहे. विशिष्ट पद्धतीने गाण्याच्या किंवा संगीताच्या बीटवर हा गरबा खेळला जातो. गरबा खेळताना हात आणि पाय या अवयवांची जास्त हालचाल होते. त्यातही पायांची जास्त. त्यामुळे अनेकांना पाय दुखीचा त्रास गरबा खेळताना जाणवतो. असा त्रास सुरु झाले की नकोसे वाटते. संपूर्ण वर्षात केवळ काही दिवसच गरबा खेळायला मिळतात आणि त्यात पाय दुखीचा त्रास सुरु झाल्यावर चिडचिड होते, मूड ऑफ होतो. एकत्र आपण अचानक सवय नसताना जास्त वेळ डान्स करतो. त्यामुळे आपल्या शरीराला याची सवय नसते. अचानक केलेल्या एवढ्या डान्समुळे साहजिकच आहे पाय दुखतात. (Marathi Trending Headline)
गरबा खेळताना आपण जोशात खेळतो मात्र घरी आल्यानंतर पाय कमालीचे दुखतात. तासंतास जोशात नाचल्याने दुसऱ्या दिवशी आपले अंग, पाठ, पाय, मान सगळंच दुखायला लागत. अशावेळी आपण नेमकं काय करावं हे सुचत नाही. जर गरबा खेळून पाय दुखत असतील तर आपण काही सोपे एक्सरसाइज घरच्या घरीच करु शकतो. हे सोपे स्ट्रेचिंग व एक्सरसाइजचे प्रकार केल्याने पाय तर दुखायचे थांबतील सोबतच गरबा खेळून आलेला थकवा देखील कमी होण्यास मदत होईल. थोडी काळजी घेतली तर तुम्ही हा त्रास नक्कीच बाजूला सारून पुन्हा एकदा जोरदार गरबा करू शकतात. (Navratri 2025)
गरबा खेळून आल्यानंतर करा साधा व्यायाम
वॉर्मअप
सगळ्यात आधी मॅटवर पाठ ताठ ठेवून बसा. त्यानंतर आपले दोन्ही हात हलकेच मागे नेऊन आपली बोट जमिनीला टेकवा. आपले हात ताठ ठेवा आणि पाय जमिनीपासून किंचित वर उचलत वर खाली हलवा. दोन्ही पाय एकामागोमाग एक असे वर खाली उचलावेत. असे किमान २० ते ३० वेळा करावे. (Top Marathi Headline)
बटरफ्लाय योगा
दोन्ही पाय समोर ठेवून बसा. पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना चिकटतील असे ठेवा. गुडघ्यावर हात ठेवून गुडघे वरच्या बाजूला उचला. त्यानंतर गुडघे खाली घेऊन जा आणि जमिनीला पायांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे चार-पाच वेळा करा. यानंतर हातांनी पायांचे तळवे पकडा. आता गुडघे वेगानं वर-खाली करा. पाय आखडणं, पायांना आलेला जडपणा, सुन्न होणं, टाचांचं दुखणं यांसारख्या समस्यांवर हे आसन करणे फायदेशीर ठरते. (Marathi News)
वाईड लेग स्ट्रेच
यात आपले दोन्ही पाय दोन्ही बाजूला लांब पसरवून घ्यावेत. त्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडून कमरेतून खाली वाकावे. कमरेतून खाली वाकताना आपले कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. हा एक्सरसाइज केल्याने आपले हात, पाय, पाठ, कंबर स्ट्रेच होऊन त्यावर हलकासा ताण पडतो त्यांचे दुखणे थांबते. २० ते ३० सेकंद हा स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावा. (Todays Marathi News)
क्रॉस लेग अँड हीप्स
पायांची मांडी घालून बसावे. त्यानंतर डावा पाय उजव्या पायावर ठेवून दोन्ही पायांची ढोपरं अगदी बरोबर एकावर एक येतील अशा पद्धतीने बसावे. त्यानंतर आपले दोन्ही हात वर करून थोडेसे मागच्या बाजूला झुकावे आणि हळुहळु पुढे येत आपले हात खाली आणत कपाळ ढोपराला टेकवण्याचा प्रयत्न करावा. हाच एक्सरसाइज परत पुन्हा करून उजवा पाय डाव्या पायावर ठेवावा आणि बाकी संपूर्ण एक्सरसाइज आहे तसाच करून घ्यावा. या एक्सरसाइजमुळे आपले पाय, ढोपर, पायांच्या टाचा दुखण्याचे थांबते. (Top Marathi News)
मिठाच्या पाण्यात पाय ठेवा
याशिवाय तुम्ही गरबा खेळून आल्यानंतर काही काळ गरम पाण्यात खडे मीठ किंवा एप्सम सॉल्ट टाकून त्यात पाय बुडवून देखील बसू शकता. यामुळे तुमच्या पायाला आराम मिळेल. यानंतर पाय पाण्यातून बाहेर काढावे. पाय स्वच्छ कोरडे करून त्यांना एखाद्या तेलाने हल्या हाताने मसाज करा. यामुळे तुमचे पाय दुखणे कमी होईल. (Latest Marathi News)
गरबा खेळताना कोणती काळजी घ्यावी?
आरामदायी शूज घाला
गरबा किंवा दांडिया खेळताना काहीजण अनवाणी पायाने गरबा खेळतात. पण यामुळे पायांना जखम होऊ शकते. त्यामुळे अनवाणी पायाने गरबा न खेळता आरामदायी शूज घालून गरबा खेळावा. जेणेकरून तुमच्या पा यांना आराम मिळेल. पायांना कोणतीही दुखापत होणार नाही. हिल्स घालणे देखील घटक ठरू शकते. यामुळे पाय मुरगळ्यण्याची भीती असते. (Top Trending News)
======
Navratri : गरबा खेळताना हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
======
वॉर्म अप
दांडिया किंवा गरबा खेळायला जाण्याआधी वॉर्म अप करावा. वॉर्म अप केल्यामुळे स्नायू ताणले जाणार नाहीत. तसेच शरीराला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत किंवा जखम होणार नाही. स्ट्रेचिंग केल्यामुळे शरीराचे स्नायू लवचिक होतात. तसेच व्यायाम केल्यामुळे पायांना दुखापत होत नाही. कोणताही आजरा असलेल्या लोकांनी गरबा खेळण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics