Home » राष्ट्रीय मतदार दिवस का साजरा केला जातो?

राष्ट्रीय मतदार दिवस का साजरा केला जातो?

by Team Gajawaja
0 comment
National Voters Day
Share

लोकशाहीत निवडणूक आणि मतदार हे सर्वाधिक महत्वाचे असतात. परंतु हैराण करणारी गोष्ट अशी की, देशात स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, संविधान दिवसाची चर्चा होते. पण राष्ट्रीय मतदार दिवसाची चर्चा फार कमी होते. भारतात राष्ट्रीय दिवस प्रत्येक वर्षी २५ जानेवारीला साजरा केला जातो. यामागील उद्देश असा की, लोकांना आपल्या मतदानाचा अधिकार आणि मतदाराच्या रुपात जागृकता निर्माण करणे. मतदान किवा निवडणूक ही लोकशाहीचे आधार स्तंभ असतात. ते सुरळीत चालवण्यासाठी मतदार हा फार महत्वाचा मानला जातो. भारताच्या लोकशाहीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचे नेमके काय आहे महत्व याबद्दल आपण जाणून घेऊयात. (National Voters Day)

भारतात प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनापूर्वी म्हणजेच २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. कारण या दिवशी देशात निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. ज्याचे काम भारतीय संविधानानुसार देशात निपक्ष आणि यशस्वी निवडणूक करणे असे आहे. २५ जानेवारी १९५० रोजी देशात निवडणूक आयोग नावाच्या संस्थेची स्थापना झाली होती.

सर्वाधिक मोठी लोकसंख्या पण…
खरंतर लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगातील सर्वाधिक मतदार असलेला जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. मात्र हे सुद्धा खरं आहे की, टक्केवारीनुसार पाहिल्यास भारतात मतदान काही लोकशाहींच्या तुलनेत कमी होते. त्यामुळेच असे म्हटले जाते की, देशातील लोक राजकरणाप्रति जागृक आहेत. पण त्यांचा कल हा मतदानाकडे अधिक नाही.

प्रोत्साहन करण्याची गरज
देशातील प्रत्येक वयस्कर व्यक्ती हा एक मतदार असतो. त्याला ही मतदान करण्याचा अधिकार आहे. परंतु असे ही समजले पाहिजे की, मतदान हा अधिकार नव्हे तर एक कर्तव्य ही आहे. बहुतांश लोक याच्या महत्वाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गरजेचे असते की, देशातील सर्वच नव्हे तर एका मतदाराला मत देण्यासाठी प्रेरित केले जाईल. (National Voters Day)

एक गहन समस्या
वर्ष २०११ मध्ये असे दिसून आले की, भारतातील तरुण ज्यांचे वय १८ वर्षावरील आहे त्यांच्यामध्ये मतदानासंदर्भातील कल कमी आहे. त्यांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी प्रोत्साहन करण्याची गरज आहे. तर १८ वर्ष झाल्यानंतर ही देशातील तरुण निवडणूकीत मतदान करण्यास इच्छुक नसतात.

हे देखील वाचा- का सुरू आहे पीएम मोदी यांच्यावरील BBC डॉक्युमेंट्रीवरुन वाद…?

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने ठरवले आहे की, प्रत्येक वर्षी एक जानेवारी पासून अधिकाधिक तरुणांना आपल्या मतदार कार्ड बनवण्यासाठी प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक वर्षी २५ जानेवारीला ओळखपत्र जाहीर केले जाईल. तेव्हापासून प्रत्येक वर्षी २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिवस साजरा केला जातो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.