भारतीय जनता पार्टीकडून आज देशभरात विविध ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र याच दिवशी तरुणांनी ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ (National Unemployment Day) म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला आहे. १७ सप्टेंबरच्या दिवसाची सुरुवात होताच बेरोजगारांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा बेरोजगार दिवसाच्या रुपात देत ट्विट केले आहे. त्यामुळे आज ट्विटरवर एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसासह राष्ट्रीय बेरोजगारी दिवस ही ट्रेंन्ड करत आहे.
सकाळीच ट्विटरवर बेरोजगार दिवसासंदर्भात २० हजारांहून अधिक ट्विट केले गेले. तर मोदींचा वाढदिवस हा बेरोजगारी दिवसाच्या रुपात आता साजरा केला जात आहे. देशात आणि प्रदेशात वाढणाऱ्या बेरोजगारीची समस्येवर नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी कोणताही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे सर्व बेरोजगार तरुणांना आवाहन आहे की, आधीसारख्या बेरोजगारी आंदोलनात सहभागी व्हावे.
दुसऱ्या एका युजरने म्हटले की, बेरोजगारीच्या मुद्दा मोदी मीडिया उचलून धरणार नाही. त्यामुळे हा मुद्दा आपल्या सारख्या बेरोजगारांनाच उचलून धरावा लागणार आहे. अशातच अधिकाधिक जणांनी ट्विटवर येत राष्ट्रीय बेरोजगार दिवसाच्या रुपात पीएम मोदी यांना टॅग करुन ट्वीट करावेत. खरंतर बेरोजगार दिवसानिमित्त उत्तर प्रदेशातील रिक्त पदांवरील मुद्दा गंभीरपणे उचलून धरण्यात आला आहे.(National Unemployment Day)
युवा काँग्रेसकडून मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा केला जात आहेच. पण आपल्या कार्यकर्त्यांसोबत बेरोजगार मेळाव्याचे सुद्धा त्यांच्याकडून आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संबोधित करताना युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी वी यांनी असे म्हटले की, मोदी सरकारने देशात बेरोजगारी आणली आहे. त्यामुळेच तरुणांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करावा.
हे देखील वाचा- पीएम मोदींच्या टोपीवर लिहिण्यात आलेल्या R11 चा अर्थ काय आहे?
पुढे त्यांनी असे म्हटले की, जगामध्ये भारतात अधिक तरुण वर्ग असणारा देश आहे. परंतु देशातील ६० टक्के तरुण हे बेरोजगार आहेत. तर २०-२४ वयोगटातील तरुणांची आकडेवारी ४२ टक्के असून त्यांच्याकडे काम नाही. त्याचसोबत ४५ वर्षांमध्ये सर्वाधिक बेरोजगारी आहे. पण मोदी सरका फक्त निवडलेल्या दोन उद्योगपतींसाठीच काम करतात. देशातील प्रत्येक सहावा ग्रॅज्युएट हा बेरोजगार आहे. आठ वर्षात २२ कोटी लोकांना केंद्र सरकार नोकरी देईल असे आश्वासन दिले होते. मात्र एक टक्का सुद्धा नोकरी दिलेली नाही. बेरोजगारीचा दर हा गेल्या एक वर्षापासून उच्च स्तरावर आहे. पक्त ऑगस्ट मध्ये २० लाख रोजगारात घट झाली. पण केंद्र आणि राज्यांमध्ये ६० लाख पद रिक्त आहेत त्यावर सरकार का काही करत नाही? असा सवाल ही त्यांच्याकडून उपस्थितीत करण्यात आलेला आहे.