Home » Teachers Day :५ सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा होतो?

Teachers Day :५ सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा होतो?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Teachers Day
Share

“गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।” आपल्या देशात कायम आपल्याला अगदी कमी वयातच मातृ आणि पितृ देवो भव: सोबतच आचार्य देवो भव:ची देखील शिकवण दिली जाते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरुचे स्थान अव्वल असते. आई ही आपला सर्वात पहिला गुरु असते. त्यानंतर गुरुचे स्थान मिळते ते आपल्या शिक्षकांना. गुरूशिवाय ज्ञान मिळवणे निव्वळ अवघड असते. आपल्या गुरूने शिकवलेल्या शिकवणीवरच त्याचे विद्यार्थी आयुष्यात पुढे जातात आणि नावलौकिक कमवतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशात त्याच्या गुरूचा सर्वात मोठा वाटा असतो. अशा या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षण दिन. (Teachers Day)

गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. दरवर्षी ५ सप्टेंबरला सर्वत्र शिक्षण दिन साजरा केला जातो. आपल्या आयुष्याला दिशा आणि आकार देण्यामध्ये आपल्या शिक्षणाचा सर्वात मोठा हात असतो. त्यांचे बोट धरूनच आपण या जगात उभे राहून चालायला शिकत असतो. अशा आपल्या आयुष्यातील शिक्षकांचा आदर व्यक्त करण्यासाठी ५ सप्टेंबरला देशात शिक्षण दिन उत्साहाने साजरा केला जातो. भारताला कायम तरुणांचा देश म्हटले जाते. आपल्या देशाचे भविष्य तरुणाच्या हातात सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. देशाचे हे भवितव्य शिक्षणाच्या हातात असते. प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना या जगात चालण्यासाठी आणि टिकण्यासाठी योग्य शिक्षण आणि शिकवण देत असतो. (Marathi News)

अशा या या शिक्षणाची सुरुवात कशी झाली माहिती आहे का? भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राधाकृष्णन यांनी राजकारणात काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवलाच सोबतच शिक्षण क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी केली. राधाकृष्णन यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली होते. मात्र तरी देखील शेवटपर्यंत त्यांनी त्यांची आदर्श शिक्षकाची ओळख जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये सर्वप्रथम १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. (Todays Marathi Headline)

Teachers Day

याबद्दल एक किस्सा सांगितलं जातो आणि तो म्हणजे, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या काही विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. तेव्हा राधाकृष्णन यांनी माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून पाळला तर हा मला अभिमान वाटेल, असे सांगितलं. डॉ. राधाकृष्ण यांच्या सूचनेनुसार ५ सप्टेंबर १९६२ रोजी देशात पहिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून राधाकृष्णन यांची जयंती हा शिक्षक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. (Marathi Top News)

मुळातच शिक्षक या शब्दाचा आपण अर्थ काढला तर शि म्हणजे शिल, क्ष म्हणजे क्षमा, क म्हणजे कला असा निघतो. अर्थातच ज्याच्याकडे शिल, क्षमा आणि कला याचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक. भारतात शिक्षकाचे, गुरुचे महत्व जास्त असले तरी इतर देशांमध्ये देखील शिक्षकांना कायम महत्वाचे स्थान दिले जाते. त्यामुळेच भारतासोबतच इतरही देशांमध्ये मोठ्या उत्साहाने शिक्षण दिन साजरा केला जातो. (Top Marathi Headline)

युनेस्कोने ५ ऑक्टोबर हा दिवस आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केला आहे. मात्र असे असले तरी जगातील विविध देशांना वेगवेगळ्या तारखांना हा शिक्षण दिन साजरा केला जातो. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. नंतर १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात शिक्षण दिन साजरा करतात. (Latest Marathi News)

तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. साधरण २० व्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. चीनमध्ये १९३१ मध्ये ‘नॅशनल सेन्ट्रल यूनिव्हर्सिटी’मध्ये शिक्षक दिनाची सुरुवात करण्यात आली. सन १९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस २७ ऑगस्ट हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून त्याला मान्यता मिळाली. (Top Trending News)

========

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटियरचा महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाशी काय संबंध? घ्या जाणून सविस्तर माहिती

========

शिक्षक दिन कसा साजरा करतात?
शाळा आणि महाविद्यालये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी शिकवण्याची संधी देखील दिली जाते, जेणेकरून ते व्यवसायातील जबाबदाऱ्या आणि आव्हाने अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील. अनेक शिक्षण संस्था शिक्षकांना त्यांच्या शिक्षणातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुरस्कार आणि सन्मान देऊन सन्मानित करण्यासाठी सत्कार कार्यक्रम आयोजित करतात. भारतामध्ये शिक्षक दिन साजरा करणे हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. (Social Media)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.