चांद्रयान-३ मिशनच्या यशाची चर्चा जगभरात केली जात आहे. चांद्रयान-३ मिशनचे २३ ऑगस्टला यशस्वीपणे लँन्डिंग झाले. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाला ‘नॅशनल स्पेस डे’ (National Space Day) च्या रुपात साजरा करण्याची घोषणा केली आहे. पीएम मोदी यांनी असे म्हटले की, २३ ऑगस्टला जेव्हा भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर तिरंगा फडकवला तो दिवस हिंदुस्तान नॅशनल स्पेस डे च्या रुपात साजरा होईल. हा दिवस नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला दोन दिवसांचा दौरा पूर्ण केल्यानंतर भारतात परतले आहेत. ते ग्रीस वरुन थेट बंगळुरुत आले आणि इस्रोचे कमांडर सेंटरमध्ये वैज्ञानिकांची भेट घेतली. पीएम यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना सेल्यूट केले आणि त्यांना या मिशनसाठी शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी असे म्हटले की, तुम्ही जे प्रयत्न, मेहनत केली ती देशवासियांना माहिती असावी. हा प्रवास सोप्पा नव्हता. मून लँन्डरच्या सॉफ्ट लँन्डिंगला सुनिश्चित करण्यासाठी वैज्ञानिकांनी आर्टिफिशयल सुद्धा तयार केले. याव विक्रम लँन्डर उतरवून चाचणीसुद्धा केली. ऐवढ्या परिक्षा देत मून लँन्डर तेथपर्यंत पोहचले गेले आहे तर त्याला यश मिळणारच होते.
पीएम मोदी यांनी वैज्ञानिकांना असे सुद्धा म्हटले की, आज मी जेव्हा पाहतो की भारताची तरुण पिढी विज्ञान, स्पेस आणि इनोवेशन ते उर्जेने भरलेली आहे. त्यामागे अशाप्रकारचे यश आहे. मंगलयान आणि चांद्रयानचे यश आणि गगनयानच्या तयारीने देशाला एक नवी ओळख दिली आहे. आज भारतातील लहान-लहान मुलांच्या तोंडी चांद्रयानचे नाव आहे. (National Space Day)
आज भारतातील मुलं आपल्या वैज्ञानिकांमध्ये भविष्य पाहत आहेत. तुमच्यासाठी ही एक संधी आहे की, तुम्ही भारतात संपूर्ण पिढीला जागृत केले असून उर्जा दिली आहे. आपल्या यशाचे ठसे उमटवले आहेत. आज कोणतेही मुलं रात्रीच्या वेळी चंद्राकडे पाहिल तेव्हा त्याला विश्वास पटेल की, ज्या विश्वासाने आपला देश चंद्रावर पोहचला आहे तोच विश्वास आणि उत्साह त्या मुलामध्ये आहे. तरुण पीढीला कायम प्रेरणा मिळेल म्हणून एक निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे २३ ऑगस्टला जेव्हा भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला त्या दिवसाला हिंदुस्तान नॅशनल स्पेस डे च्या रुपात साजरा केला जाईल.
हेही वाचा-रोबोट व्योममित्राबद्दच्या खास गोष्टी
त्याचसोबत पीएम मोदी यांनी असे ही म्हटले की, चंद्राच्या ज्या भागावर आपले चांद्रयान पोहचले आहे त्याला भारताने नाव देण्याचे ठरवले आहे. ज्या ठिकाणी चांद्रयान-३ चा मून लँन्डर उतरला आहे त्या पॉइंटला ‘शिवशक्ति’ नाव दिले जाईल. त्याचसोबत चंद्राच्या ज्या ठिकाणी चांद्रयान-२ गेले होते त्या पॉइंटला ‘तिरंगा’ असे म्हटले जाईल. हा तिरंगा पॉइंट भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा ठरणार आहे. हा तिरंगा पॉइंट आपल्याला अशी शिकवण देईल की, कोणतेही अपयश हे अखेरचे नसते.