दिल्लीतील महापालिका निवडणूकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या आम आदमी पार्टीला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. जवळजवळ १० वर्षांपूर्वी राजकरणाच्या मैदानात आपने एंन्ट्री केली होती. आप राज्य सभा खासदार संजय सिंह यांनी नुकतीच याबद्दल माहिती दिली. त्यांनी असे म्हटले की, गुजरातमध्ये पक्षाच्या नेत्यांनी मिळून खुप मेहनत केली आणि आम्हाला ओळख मिळाली. त्यामुळेच गुजरातचे आभार, कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी काही मानक पूर्ण करावी लागतात. तर जाणून घेऊयात राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून स्विकृती मिळण्यासाठी कोणते नियम आहेत त्याबद्दल अधिक.(National Party Rules)
राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय?
राष्ट्रीय स्तरावर आपली उपस्थिती दाखल करणारा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो. जसा भाजप आणि काँग्रेस. राजकीय जगात त्यांना मोठे पक्ष मानले जाते. मात्र काही देशांमधील लहान पक्षांना सुद्धा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. यामध्ये कम्युनिस्ट पार्टी. काही पक्ष असे सुद्धा असतात जे राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असतात. मात्र ते एक क्षेत्रीय असतात. जसे तमिळनाडूतील DMK, आंध्र प्रदेशातील YSRCP, बिहार मधील RJD आणि तेलंगणातील TRS.

राष्ट्रीय पक्षासाठी काय आहेत नियम?
इलेक्शन कमीशने कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी काही नियम बनवले आहेत. जे पूर्ण केल्यानंतर एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष होतो. दरम्यान, नियमांचे उल्लंघन किंवा पालन न केल्यास राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जातो. तर जाणून घेऊयात राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी काय आहेत नियम-
-निवडणूक आयोगाचा नियम असा सांगतो की, कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी त्याला कमीत कमी चार राज्यांमध्ये ओळख मिळाली पाहिजे.
-त्या पार्टीत कमीत कमी ४ राज्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत कमीत कमी ६ टक्के मतं मिळालेली असावीत.
-जर त्या पक्षाचे वोटिंग शेयर ३ टक्क्यांहून कमी असेल तर त्यांच्या तीन जागा असणे गरजेचे आहे.
दिल्ली आणि पंजाब मध्ये आप सरकार आहे. गोव्यात आपने ६ टक्के मत/2 जागा मिळवण्याचे काम पूर्ण केले आहे. आता गुजरातमध्ये सुद्धा प्रदेश स्तरावर पक्ष बनण्याची तयारी केली आहे.(National Party Rules)
हे देखील वाचा- भारत-पाकिस्तानच्या युद्धात गुजरातच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांचा झाला होता मृत्यू
आतापर्यंत देशात ८ राष्ट्रीय पक्ष
आम आदमी पार्टी ३ राज्य दिल्ली, पंजाब, गोव्यात आधीपासूनच एक स्टेट पार्टी आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये त्यांचे सरकार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला स्टेट पार्टी बनण्यासाठी विधानसभा निवडणूकीत कमीत कमी ६ टक्के मतं आणि २ विधानसभेच्या जागेवर विजय मिळवणे आवश्यक आहे. गुजरात मध्ये हा आकडा पार केलेल्या आप पक्षाने राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठीची योग्यता पूर्ण केली आहे.