आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आपली शान आहे. जेव्हा तो फडकवला जातो तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या प्रत्येकाचे बलिदान आठवते आणि आपल्यामध्ये देशभक्तीची उर्जा संचारते. यंदा देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आजादी के अमृत मोहत्सवादरम्यान हर घर तिरंगा हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. अशातच आता प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकणार हे नक्कीच. परंतु राष्ट्रीय ध्वजासंदर्भात काही नियम ही तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे ते जाणून घेणे सुद्धा फार महत्वाचे आहे. आपला राष्ट्रध्वज हा आपल्या गौरवाचे प्रतीक आहे. देशातील लोक तिरंग्याच्या प्रती सन्मान आणि श्रद्धा ठेवतात. अशातच एखाद्या कारणामुळे तिरंगा फाटला असेल किंवा जुना झाला असेल तर काय करावे या बद्दल ही काही नियम तयार करण्यात आले आहेत.(National Flag of India)
भारतीय ध्वज संहितेच्या खंड २.२ नुसार जर राष्ट्रध्वज खराब झाला असेल किंवा त्याचा रंग फिकट झाला किंवा फाटला असेल तो वेगळ्या पद्धतीने नष्ट करावा. त्यासाठी सुद्धा काही नियम आहे. तर आपल्याकडे कापडाचा आणि कागदाचा राष्ट्रध्वज अधिकतर वापरला जातो. तर अशी स्थिती असेल तर काय करावे हे अधिक जाणून घेऊयात.
राष्ट्रध्वज कागदाचा असेल तर…
राष्ट्रीय ध्वज हा कागदाचा असेल तर त्यासंदर्भात ही नियम आहे. खासकरुन मुलं आणि मोठी माणसं सुद्धा कागदाचा झेंडा फडकावताना दिसून येतात. परंतु तो कधीच जमिनीवर फेकून देऊ नये. यामुळे राष्ट्रध्वजाचा सन्मान हा पायदळी तुडवल्यासारखे होते. त्यामुळे तो तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता.
राष्ट्रध्वजासंदर्भात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
-राष्ट्रध्वज उलटा दाखवला जाणार नाही. म्हणजे; भगव्या रंगाची पट्टी ही खालची पट्टी म्हणून ठेवू नये.
-तिरंगा फाटलेला किंवा चुरलेला असेल तर तो फडकवू नये.
-राष्ट्रीय ध्वज किंवा कोणत्याही व्यक्ती, वस्तूला सलामी देताना खाली वाकू नये.
-कोणताही ध्वज हा राष्ट्रीय ध्वजाच्या वरती किंवा आजूबाजूला नसला पाहिजे.
-राष्ट्रीय ध्वजाचा उपयोग कोणत्याही उत्सव, थाळी, ध्वज पट्ट किंवा अन्य पद्धतीच्या सजावटीसाठी वापरु नये.
-राष्ट्रीय ध्वज जमीनीवर किंवा फरशीवर टाकून देऊ नये.
-तिरंगा कोणत्याही प्रकारचे नुकसान होईल अशाप्रकारे तो बांधला किंवा फडकवला जाऊ नये.
-राष्ट्रीय ध्वज हा कोणत्याही अन्य ध्वजाच्या पोलसोबत फडकावू नये.
-राष्ट्रध्वजचा वापर टेबल झाकण्यासाठी किंवा व्यासपीठ झाकण्यासाटी करु नये. (National Flag of India)
हे देखील वाचा- ताजमहालावर दिव्यांची रोषणाई का केली जात नाही?
…जेणेकरुन राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही
गृहमंत्रालयाकडून राष्ट्रध्वजासंदर्भात अपमान रोखण्यासंदर्भात काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय सन्मार्थ अपमान रोकथाम अधिनियम १९७१ नुसार पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
-राष्ट्रीय ध्वजाचा वापर खासगी अंत्यसंस्कारासाठी किंवा कोणत्या त्या संदर्भातील गोष्टींदरम्यान वापरु नये.
-राष्ट्रीय ध्वजाचा वापर हा कोणत्याही प्रकारचा पोषाख किंवा वर्दी तयार करण्यासाठी करु नये. त्याचसोबत कुशन, रुमाल किंवा नॅपकिनसाठी सुद्धा वापरु नये.
-राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे लेखन केलेले नसावे. त्याचा वापर कोणतीही वस्तु गुंडाळण्यासाठी, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा वाटपासाठी करु नये.
-वाहन झाकण्यासाठी अजिबात राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.