Home » Consumer Day : राष्ट्रीय ग्राहक दिन! जाणून घ्या… ग्राहक म्हणून आपल्या अधिकारांबाबत

Consumer Day : राष्ट्रीय ग्राहक दिन! जाणून घ्या… ग्राहक म्हणून आपल्या अधिकारांबाबत

by Jyotsna Kulkarni
0 comment
Consumer Day
Share

एखादी वस्तू, सेवा विकत घेणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक. आपण सर्वच लोकं ग्राहक असतो. पैसे देऊन आपण विविध वस्तू आणि सेवा घेत असतो. जेव्हा आपण पैसे देतो तेव्हा त्या पैशांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला अर्थात ग्राहकाला उत्तम वस्तू किंवा सेवा मिळणे अपेक्षित असते. मात्र कधी कधी असे होत नाही. ग्राहकांना पैसे देऊन देखील वाईट अनुभव येतात. अशा वेळेस त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळावा अशी त्यांची इच्छा असते. यासाठीच भारत सरकारने ग्राहकांसाठी त्यांचे हक्क आणि कर्तव्य तयार केले आहेत. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सजग व्हावा, यासाठीच २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. (Grahak Din)

ग्राहक हक्क संरक्षणासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारानेच देशात ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकावर २४ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर देशभरात तो कायदा म्हणून लागू करण्यात आला. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून भारतात २४ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय ग्राहक दिवस’ साजरा करण्यात येतो. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करुन घेण्याचा हक्क नागरिकांना मिळू शकला. ग्राहकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देण्यासाठी त्यांना याबद्दल जागरूक करण्यासाठी विविध संघटना नानाविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करतात. (Consumer Day)

ग्राहकांना आवश्यक मार्गदर्शन थेट मिळावं यासाठी राज्यात स्वतंत्र हेल्पलाईन कार्यरत आहे. ग्राहक १८००-२२-२२६२ या क्रमांकावर हेल्पलाईनला फोन करुन आपल्या शंकाचे निरसन करु शकतात. ग्राहक केंद्रीत बाजारव्यवस्था निर्माण होणे ही काळाची गरज असताना अशा सुविधांचा लाभ घेऊन ग्राहकांनीदेखील आपले हक्क जाणून घेणे गरजेचे आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला ६ हक्क मिळाले आहेत. या हक्कांमध्ये ग्राहकांना एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना त्यांना कोणते अधिकार आणि हक्क आहेत याची माहिती देण्यात आली आहे. (Marathi)

ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी हा कायदा अंमलात आला आहे. या कायद्यांतर्गत कोणताही ग्राहक कोणत्याही प्रकारच्या अन्यायकारक व्यापाराची तक्रार करू शकतो, ज्यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळातील व्यापारांच्या व्यवहाराची हाताळणी लक्षात घेऊनच हा कायदा लागू करण्यात आला होता. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार, प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा मुख्य अधिकार देण्यात आले आहेत. हे सहा हक्क पुढील प्रमाणे. (Todays Marathi Headline)

Consumer Day

१) सुरक्षिततेचा हक्क
सुरक्षिततेचा हक्क म्हणजे आरोग्य आणि जीवनाला धोका पोहोचवणाऱ्या वस्तू व सेवांपासून संरक्षण मिळण्याचा हक्क. ग्राहकांनी देखील नेहमी चांगल्या गुणवत्तेचे असलेले उत्पाद वापरावे. शक्यतो ISI ऍगमार्क चिन्हे आणि ISO प्रमाणित असलेले उत्पाद वापरावे. वस्तूची गुणवत्ता आणि त्याच्या मिळणाऱ्या सेवांबाबत ची माहिती मिळविण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. (Marathi News)
२) माहितीचा हक्क
ग्राहकाला उत्पादनाशी निगडित सर्व माहिती जसे की त्याची गुणवत्ता, प्रमाण, किंमत त्या मधील शुद्धता एक्स्पायरी डेट या सर्व बाबींची माहिती मिळविण्याचा हक्क आहे.
३) निवडीचा हक्क
यामध्ये स्पर्धात्मक किंमतीत विविध पर्यायांमधून निवड करण्याचा हक्क.
४) ऐकून घेण्याचा हक्क
प्रत्येक ग्राहकाला आपले मत मांडण्याचा हक्क आहे. ग्राहकाने विकत घेतलेल्या काही वस्तू मध्ये बिगाड झाले असल्यास किंवा वस्तू खराब असल्यास त्याच्या विरोधात आपले मत मांडण्याचा हक्क आहे. जर ग्राहकाला असे जाणवत आहे की त्याची फसवणूक झाली आहे तर तो त्या कंपनी किंवा त्या व्यावसायिक बद्दलची तक्रार ग्राहक तक्रार निवारण केंद्रात करू शकतो. (Top Marathi News)
५) तक्रार निवारणाचा हक्क
यानुसार ग्राहकास फसवणूक किंवा अन्याय झाल्यास नुकसानभरपाई व न्याय मिळण्याचा हक्क. या हक्काच्या अंतर्गत ग्राहक आपली तक्रार करू शकतो आणि ग्राहक मंचाला किंवा ग्राहक निवारण केंद्राला त्याचे निराकरण करावे लागते. ही तक्रार मोठी असो किंवा लहान असो त्याचे निराकरण ग्राहक तक्रार केंद्राला करावे लागते. (Latest Marathi Headline)
६) ग्राहक शिक्षणाचा हक्क
ग्राहक शिक्षण हक्क मिळविण्यासाठी ग्राहकाला जागृत करण्यासाठी सरकारद्वारा वेगवेगळे उपक्रम राबविले जाते. जसे की जागो ग्राहक जागो. तसेच बरेच शिबीर आणि कार्यशाळा घेतल्या जातात. जेणे करून ग्राहकांना त्याच्या हक्काची माहिती मिळावी आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा.

तुम्हाला हे माहीत आहे का?
– कोणत्याहीहॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वच्छतागृहचा वापर करू शकता
– सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या-चॉकलेट देऊ शकत नाही
– जाहिरातीमध्ये दिलेलं वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा तर ठोकू शकतातच, पण त्याचबरोबर त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता. (Top Trending Headline)
– शैक्षणिक संस्थांनी गुणवत्तेचे निकष न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
– रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्यास कारवाई होऊ शकते
– चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही

=========
Post Lunch Fatigue : लंच केल्यानंतर थकवा येत असल्यास करा हे उपाय, दिवसभर राहाल फ्रेश

=========

ग्राहकांची जबाबदारी कोणती?
ग्राहकांना सरकारने हक्क देण्यासोबतच काही कर्तव्यांचे पालन करण्याची जबाबदारी देखील दिली आहे. ग्राहकांनी वस्तू, सेवा खरेदी करताना काही गोष्टी कटाक्षाने पालन केल्या पाहिजे, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याचे पक्के बिल (GST Bill) मागणे, वस्तूची एक्स्पायरी डेट तपासणे, ‘आयएसआय’ (ISI) किंवा ‘अॅगमार्क’ (Agmark) सारखी मानांकने तपासणे ही आपली जबाबदारी आहे. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने देशभरात कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात, ज्याचा उद्देश ग्राहकांना अधिक जबाबदार बनवणे हा असतो. लक्षात ठेवा, तुमची एक छोटीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.