Home » Nashik : नाशिकची रंगपंचमी आणि रहाड संस्कृती

Nashik : नाशिकची रंगपंचमी आणि रहाड संस्कृती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Nashik
Share

होळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी साजरी होते रंगपंचमी. होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात धुलीवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रंगोत्सव खेळाला जातो. मात्र काही ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळतात. उद्या सर्वत्र मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी होणार आहे. या दिवशी एकमेकांंना रंंग लावून आनंंदोत्सव साजरा करतात. कडक उन्हामुळे अंगाची होणारी दाह शांत व्हावी म्हणून रंग खेळले जातात. शिवाय या रंगपंचमीचा सण उन्हाळ्याच्या सुरुवातीला येत असल्याने येणारा उन्हाळा आपल्याला बाधू नये म्हणून देखील हा सण साजरा केला जातो.(Rangpanchami)

आजच्या काळात बहुतकरून होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशीच अर्थात धुलिवंदनालाच रंग खेळले जातात. खूप कमी ठिकाणी रंगपंचमी साजरी होते. यातलेच एक ठिकाण म्हणजे नाशिक. होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये धुलिवंदनाचे निमित्त साधून वीरांची मिरवणूक मोठ्या गाजावाज्यामध्ये काढली जाते. त्यानंतर रंगपंचमीला येथे रंग खेळतात. आता तुम्ही म्हणाल मग यात काय नवल आहे…? महाराष्ट्रामध्ये रंगपंचमीलाच रंग खेळण्याची परंपरा आहे. मात्र जिथे आपण अनेक उत्तर भारतीय प्रथांचे अनुकरण करत असताना धुलिवंदनालाच रंग खेळण्याची त्यांची पद्धत देखील उचली आहे.(Nashik)

Nashik

मात्र नाशिक शहराने रंगपंचमीला रंग खेळण्याची आपली परंपरा मात्र चालू ठेवलेली दिसते. नाशिकमधील रंगपंचमीची बातच निराळी आहे. एकदा जर तुम्ही नाशिकमध्ये रंगपंचमी खेळात तर नक्कीच कायम याच शहरात येऊन हा सण कायम साजरा कराल. कारण नाशिककरांसाठी रंगपंचमीचे खास वैशिष्ट्य आहे. आणि ते म्हणजे इथे असणाऱ्या ‘रहाडी’. हो…नाशिकच्या रंगपंचमीची रहाड संस्कृती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या दिवशी शहरामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते. या रहाडीमध्ये रंग खेळले नाही तर नाशिककरांची रंगपंचमी पूर्णच होत नाही.(Nashik Rahad)

=============

हे देखील वाचा : Syria : महिलांची नग्न मिरवणूक सिरियात परिस्थिती बिकट !

B.R. shetty : ज्यांनी १८ हजार कोटींची कंपनी ७४ रुपयांना विकली

=============

मग रहाडी म्हणजे काय? आणि काय आहे त्याचा इतिहास चला जाणून घेऊया. नाशिक आणि रंगपंचमी हे समीकरणच भन्नाट आहे. या नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी जपण्यात येणारी अनोखी परंपरा म्हणजे ‘रहाड’. जवळपास २५० पेक्षा जास्त वर्षांपासून नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रहाड उघडण्यात येते. नाशिकमध्ये आधी १४ रहाडी होत्या, मात्र आज चार रहाडी असून, या सर्व पेशवेकालीन आहे. नाशिकची ही रहाड संस्कृती बघण्यासाठी दरवर्षी देशभरातून किंबहुना जगभरातून अनेक लोकं शहरात येतात आणि रंगांचा आनंद लुटतात.(Top Stories)

रहाडी म्हणजे काय?
रहाड म्हणजे १२ बाय १२ चा एक हौद जो तब्बल ८ फूट खोल असतो. या हौदाला पायऱ्या देखील असतात. हा हौद अर्थात रहाट रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी तयार केली जाते. रंगपंचमीच्या काही दिवस आधी ही रहाड उघडून ती स्वच्छ करतात आणि मग त्यात पूर्णपणे नैसर्गिक रंग आणि पाणी टाकून ती खेळण्यासाठी सज्ज केली जाते. शहरातील प्रत्येक रहाटीमध्ये टाकण्यात येणारा रंग हा वेगवेगळ्या फुलांपासून तयार केला जातो. यासाठी विविध रंगाच्या फुलांना तासंतास उकळून त्याचा घोटून रस काढतात आणि तोच तस पाण्यात मिसळून रहाडीमध्ये टाकला जातो.(Marathi Latest News)

Nashik

रहाडीमधील हे रंगाचे पाणी शरीराला अत्यंत गुणकारी मानलं जातं. या पाण्यात अंघोळ केल्याने, त्वचेचे आजार दूर होतात आणि उन्हाळा बाधत नाही अशी मान्यता आहे. रहाडीमध्ये एकमेकांना धप्पा देत या पाण्यात ढकलण्याची एक वेगळीच गंमत आपल्याला येथे पाहायला मिळते. मुख्य म्हणजे वर्षातले ३६४ दिवस या रहाडी बंद असतात. आज या रहाडीवरच वाहतुकीसाठी रोड बांधण्यात आले आहे. आपण अनेकदा सामान्य दिवसांमध्ये रहाडीवर उभे राहतो किंवा प्रवास करतो. पण आपल्याला जाणवत देखील नाही की, आपल्या पायाखाली रहाड आहे.(Nashik Rangpanchami)

कारण वर्षभर ही रहाड बंद ठेवली जाते. त्यावर सागवानी लाकडांच्या मोठमोठ्या रिफांचं आच्छादन टाकलं जातं. असं सांगितलं जातं की, या सागाच्या रिफाही जवळपास ३०० वर्ष जुन्या आहेत. आज नाशिकमध्ये शनी चौकातील रहाड, तांबट लेन येथील रहाड, दंडे हनुमान चौकातील रहाड, दिल्ली दरवाजा रहाड आणि तिवंधा चौकातील रहाड या सर्व रहाडी चालू आहेत. प्रत्येक रहाडीचे एक वैशिष्ट्य आणि एक रंग ठरलेला आहे. या सर्व राहाडींबद्दल जाणून घेऊया. (Marathi Trending News)

शनी चौक रहाड
काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला असलेली शनी चौकातील रहाड पेशवे काळापासून प्रसिद्ध आहे. पूर्वी या भागात पेशव्यांचे सरदार राहायचे. तेव्हा येथे कुस्त्या खेळण्याचा हौद होता. रास्ते सरदार याची देखभाल करत. हाच हौद पुढे राहाडीमध्ये बदलण्यात आला. शनी चौकातील शनी चौक मित्र मंडळ आणि सरदार रस्ते आखाडा परंपरेने रहाडीची काळजी घेत आहे. शनी चौकातील होळी रात्री बारानंतर पेटवली जाते. तर सकाळपासून रहाड उघडण्यास सुरुवात होते. या रहाडीचा रंग गुलाबी असून, हा रंग कायमस्वरूपी एकच असतो. रंगपंचमीच्या दिवशी दीक्षित घराण्याचे मानकरी रहाड पूजा करतात.(Social News)

Nashik

दिल्ली दरवाजा रहाड
गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या दिल्ली दरवाजा चौकात असलेल्या रहाडीचा मान तुरेवाले पंच मंडळ यांच्याकडे आहे. रहाडीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी आझाद सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मंडळाची स्थापना करण्यात आली होती. पळसाच्या फुलांपासून या रहाडीसाठी रंग बनवला जातो. हे या रहाडीचे वैशिष्ट्य आहे. या रहाडीचा रंग केशरी आहे.(Top Latest News)

तांबट लेन रहाड
पेशवेकालीन पाषाणातील दगडाच्या बांधकामात असलेल्या या रहाडीचा रंग लाल आहे. रंगपंचमीच्या दिवशी येथील पाच कुटुंबीयांना पूजेचा मान दिला जातो. या रहाडीचा रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले, तुळस आणि चंदनाचा वापर केला जातो.(Holi News)

=============

हे देखील वाचा : Elon Musk : मस्क, आयव्हीएफ आणि वाद !

=============

तिवंधा चौक रहाड
जगप्रसिद्ध अशा बुधा हलवाईच्या दुकानासमोर असलेल्या तिवंधा चौकातली ही पेशवेकालीन रहाड नाशिकमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. या रहाडीचा रंग पिवळा आहे. रंगपंचमीच्या दिवशी संपूर्ण रहाड सजवल्यानंतर रहाडीची विधिवत पूजा केली जाते. रहाडीचा मान जळगावकर कुटुंबीयांना आहे. विशेष म्हणजे या रहाडीत महिलांना प्रवेश दिला जातो. या रहाडीमध्ये अर्धा भाग महिलांसाठी राखीव ठेवला जातो.(Marathi News)

दंडे हनुमान चौक रहाड
नाशिकमधील काझीपुरा पोलीस चौक परिसरात ही पेशवे कालीन दंडे हनुमान रहाड आहे. या रहाडीत पिवळा रंग तयार केला जातो. जवळपास २०० किलो हून अधिक फुलांना एकत्रित करून हा रंग तयार केला जातो.(Nashik Rahad History)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.