उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभ नुकताच संपन्न झाले. तब्बल 45 दिवस चाललेल्या या महाकुंभमध्ये जगभरातील 66 करोड भाविक सामिल झाले होते. या महाकुंभनंतर आता भारतातील कुठल्या ठिकाणी पुढचा कुंभ होणार याची तारीख आणि स्थळ जाहीर झाले आहे. पुढचा कुंभ महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होत असून महाराष्ट्र सरकारनं या कुंभसाठी तयारी सुरु केली आहे. कुंभ हा जगभरातील हिंदू नागरिकांचा सर्वात मोठा उत्सव असतो. (Nashik)
प्रयागराज येथील महाकुंभमुळे नवीन विक्रम झाले आहेत. या महाकुंभसाठी जगभरातील भाविक प्रयागराज येथे आले होते. दर 12 वर्षांनी हे कुंभ भारतातील चार पवित्र स्थळी साजरे होतात. दर 12 वर्षांनी कुंभ आणि दर सहा वर्षांनी अर्धकुंभ आयोजित केला जातो. महाकुंभ 144 वर्षांनी होतो. असाच महाकुंभ प्रयागराज येथे झाल्यावर आता भाविकांना पुढच्या कुंभची ओढ लागली आहे. 2027 मध्ये हा कुंभ नाशिक येथे होईल, त्याचवेळी हरिद्वार येथेही अर्धकुंभ होणार आहे. या दोन्हीही सोहळ्यांसाठी राज्य सरकारनं तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रातील त्र्यबंकेश्वर येथे कुंभमेळ्याची तयारी सुरु झाली आहे. 2027 मध्ये होणा-या या कुंभसाठीही मोठ्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढवण्यात येत असून रेल्वे फलाटांचीही संख्या वाढवण्यात येणार आहे. यासाठी प्रयागराज महाकुंभमेळ्यातील प्रशासकीय अधिका-यांचीही मदत घेण्यात येणार आहे. 17 जुलै 2027 ते 17 ऑगस्ट 2027 या कालावधीत हा कुंभ होईल अशी माहिती आहे. (Social News)
प्रयागराज येथे झालेल्या भव्य महाकुंभनंतर आता नाशिक येथे होणारा कुंभही भव्य असेल अशी अपेक्षा आहे. प्रयागराज महाकुंभसाठी देशविदेशातील हिंदू त्रिवेणी स्नानासाठी आले होते. आता त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदिमध्ये स्नान करण्यासाठीही असाच मोठा भाविकांचा मेळा होईल, अशी अपेक्षा आहे. या भाविकांसाठी मोठ्या संख्येनं सुविधा करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासन यासाठी एक नवीन प्राधिकरण स्थापन करणार आहे. या प्राधिकरणामार्फत कुंभमेळ्याच्या आयोजनाची सर्व जबाबदारी पार पाडण्यात येईल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 2025-16 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा झाला होता. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वर महादेवाचा समावेश आहे. गोदावरी काठावर असलेल्या या पुरातन मंदिराचेही सुशोभिकरण या निमित्तानं करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 25 अधिकारी प्रयागराज महाकुंभच्या आयोजनात सहभागी झाले होते. या अधिका-यांच्या अनुभवाचाही लाभ घेण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील अन्य देवस्थानांमध्येही भाविकांच्या सुविधांची आखणी कऱण्यात येणार आहे. (Nashik)
त्र्यंबकेश्वर परिसरात बरेच आखाडे आहेत. या आखाड्यांच्या आश्रमातील प्रमुखांच्या सूचनाही कुंभ आयोजनात विचारात घेण्यात येणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिर ते पवित्र कुंड या रस्त्याचे रुंदिकरण करण्याचा शासनाचा विचार आहे. यासाठी स्थानिकांबरोबर चर्चा सुरु असून त्र्यंबकेश्वर आणि नाशिक यांना जोडणा-या रस्त्याचेही रुंदिकरण कऱण्यात येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी नुकतीच एक बैठक घेऊन संबंधित अधिका-यांची नेमणूक केली आहे. या बैठकीत प्रथम रस्ते, रेल्वेमार्ग आणि विमान सुविधांवर चर्चा करण्यात आली. नाशिक कुंभमेळ्यात सुमारे 15 कोटी भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकारनं व्यक्त केली आहे. (Social News)
=============
हे देखील वाचा : Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
Mahakumbh : प्रयागराज महाकुंभाची ‘इतिश्री’
=============
त्र्यंबकेश्वरमध्ये वास्तव्यास असलेल्या साधू संतांचीही संख्या मोठी आहे. सोबत देशभरातील अन्य साधूही या ठिकाणी कुंभनिमित्त येणार आहेत. सुमारे 3 लाख साधू संत येतील अशी शक्यता आहे. त्यांच्यासाठी विशेष तंबू उभारण्याची सरकारची योजना आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर सोबत उत्तराखंडमधील हरिद्वार येथेही अर्धकुंभ होत आहे. यापूर्वी 2021 मध्ये हरिद्वार येथे पूर्ण कुंभमेळा झाला होता. यासाठीही उत्तराखंड सरकारने तयारी सुरू केली आहे. प्रयागराज महाकुंभमध्ये भारतीय रेल्वेनं चालू केलेल्या विशेष गाड्यांच्या माध्यमातून लाखो भाविक महाकुंभ स्थानी पोहचले होते. आता अशाच गाड्या त्र्यंबकेश्वरसाठी चालू कऱण्यात येणार आहेत. या सर्वांचे नियोजन चालू असून संबंधिक विभागाबरोबर बैठका घेण्यात येणार आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या दरम्यान कुंभ होत आहे, तेव्हा पावसाचीही शक्यता आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस पडतो. या सर्वांचा विचार करण्यात येणार असून त्र्यंबकेश्वरची कुंभनगरी ही वॉटरप्रूफ करण्याचा सरकारचा मानस आहे. (Nashik)
सई बने