Home » नासा मंगळावर माणसाला पाठवणार…

नासा मंगळावर माणसाला पाठवणार…

by Team Gajawaja
0 comment
NASA
Share

सूर्यमालेतील चौथा ग्रह असलेल्या मंगळ ग्रहाबाबत मानवाला कामय उत्सुकता आहे. अमेरिकतील अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. त्यानंतर अमेरिकेची आंतराळ संशोधन संस्था कायम या मंगळावर मानव पाठवण्याच्या तयारीसाठी लागली आहे. पण या लाल ग्रहावर जाण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न अपुरे पडले. मात्र आता नासा या मोहिमेमध्ये महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचल्याची माहिती आहे. कारण नासानं मंगळावर जाण्यासाठी एक टीम निवडली असून या टीममधील सर्वांना आता वर्षभरासाठी एकांतात ठेवण्यात येणार आहे. या काळात या टिममधील सर्वजण मंगळावरील वातावरणातील साम्य असणा-या एका मोठ्या चेंबरमध्ये राहणार आहेत.  वर्षभर ही मंडळी मंगळावर ज्या पद्धतीनं राहिलं जाईल, तसंच या भागात रहाण्याचा प्रयत्न करणार आहेत. नासाच्या (NASA) या टप्प्यानं जगाचं लक्ष वेधलं आहे. नासापाठोपाठ भारताची इस्त्रो ही अंतराळ संशोधन संस्था आणि चीनची अंतराळ संस्थाही या लाल ग्रहावर आपला ठसा उमटवण्याच्या शर्यतीमध्ये आहेत.  

मंगळ हा ग्रह कायम मानवाला आपल्याकडे खेचून घेत आहे. हा लाल ग्रह खडकाळ आहे आणि मंगळावरील नैसर्गिक वातावरण दुर्मिळ आहे. मंगळाचा पृष्ठभाग हा चंद्राप्रमाणेच अनेक ज्वालामुखी, नद्या, ज्वालामुखी आणि पृथ्वीसारख्या ध्रुवीय बर्फाने बनलेला आहे. मुख्य म्हणजे, सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत, ऑलिंपस मॉन्स आणि सर्वात उंच पर्वत दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे. त्यामुळेच मंगळावर पाऊल ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करण्यात येत आहे. मंगळावरचा हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अमेरिकन अंतराळ संस्थेचे प्रयत्न जोरदार सुरु आहेत. यासाठी चंद्रावर एक स्पेस स्टेशन उभं करण्याचाही नासाचा प्रयत्न आहे. यातूनच नासानं (NASA) आपली मंगळ ग्रहाबाबतची 378 दिवसांची मोहीम सुरु केली आहे. 

अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्यूस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये या मंगळ मोहिमेची तयारी सुरु झाली आहे. या सेंटरमध्ये एक मोठे चेंबर तयार करण्यात आले आहे. त्यात मंगळाच्या जमिनीसारखी जमीन असून वातावरणही मंगळ ग्रहासारखे ठेवण्यात आले आहे. या भल्यामोठ्या चेंबरमध्ये नासानं 4 लोकांचा क्रू बंद केला आहे. ही चार जणांची टीम जवळपास वर्षभर या मोठ्या चेंबरमध्ये घालवेल. या दरम्यान त्यांचा जगातील अन्य संपर्क तोडण्यात आला आहे. हे चारजण सर्वांपासून अलिप्त राहून मंगळावर कशा पद्धतीनं राहू शकतात याची चाचपणी करण्यात येणार आहे. मुळात या भल्यामोठ्या खोलीमध्ये राहून ही चारजणांची टीम पृथ्वीवरच मंगळाचा अनुभव घेणार आहे. यासाठी विशेष उपकरणे बनवण्यात आली आहेत. नासा मंगळग्रहाबाबत एकूण तीन मोहीम तयार करत आहे. या तीन मोहींमापैकी ही पहिली मोहीम आहे.  यातून जी चारजणांची टीम मंगळाचे वातावरण असलेल्या चेंबरमध्ये राहणार आहे, त्यांच्यावर सीसीटिव्हीमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे.  मात्र त्यांना काही सूचना देण्यात येणार नाहीत. मंगळावर काही अडचण आल्यास ही टीम कशी त्यातून बाहेर पडू शकेल, याची चाचपणी येथेच, म्हणजे पृथ्वीवर घेण्यात येणार आहे. (NASA)  

या मिशनला क्रू हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्सप्लोरेशन अॅनालॉग हे नाव देण्यात आले आहे. ही टीम टेक्सासमधील ज्या भल्यामोठ्या चेंबरमध्ये राहत आहे, ती खोली 3D आहे. तसेच 1,700 चौरस-फूट आहे. यामध्ये फ्लाइट इंजिनीअर रॉस ब्रॉकवेल, स्ट्रक्चरल इंजिनीअर आणि सार्वजनिक बांधकाम प्रशासक, वैद्यकीय अधिकारी नॅथन जोन्स, विज्ञान अधिकारी आन्का सेलार्यू यांचा समावेश आहे.  

=========

हे देखील वाचा : पाकिस्तानमध्ये पुन्हा नवाझराज…

=========

ही टीम ज्या भल्यामोठ्या चेंबरमध्ये आहे, तिथे स्पेसवॉक करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिवाय मंगळावर दळणवळण कसे होऊ शकते, याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र हे सर्व प्रशिक्षण ही मंडळी कोणामार्फतही देण्यात येणार नाही. तर सर्व टीमला स्वतःच या सर्वातून जाणार आहे. मंगळावर जर राहाण्याचा प्रसंग आला तर तेथील आव्हानांना कसे तोंड देता येईल, हे ही यातून ही टीम शिकणार आहे.  नासानं या टीमचे हे भलेमोठे चेंबर मंगळावर ज्या वस्तू पाठवण्यात येणार आहेत, त्यांनी भरले आहे. त्यात राहून ही टीम आपल्या शरीरातील बदल आणि आपापसातील वर्तणुकीशी संबंधित डेटा गोळा करणार आहे. ही सर्व टीम आता वर्षभरानं त्या मोठ्या चेंबरमधून बाहेर येणार आहे. त्यानंतरच मंगळावरील मोहिमेचा दुसरा टप्पा नासा चालू करणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.