नासाचा अहवाल जाहीर,अंतराळात एलियन असल्याचा दावा

by Team Gajawaja
0 comment
Aliens In Space
Share

अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं एलियन, म्हणजेच परग्रहींवर एक धक्कादायक दावा केला आहे.  नासा गेले काही वर्ष एलियन संदर्भात संशोधन करीत आहे.  याच संदर्भात नासानं एक धक्कादायक अहवाल जाहीर केला आहे.  नासाच्या या 33 पानांच्या अहवालात एलियन ज्या वाहनातून फिरतात, ते युएफओ हे आपल्या ग्रहाचे सर्वात मोठे रहस्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  हा अहवाल नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन यांनी प्रसिद्ध केले असून त्यामध्ये त्यांनी पृथ्वीशिवाय विश्वात जीवसृष्टी म्हणजेच एलियनचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित केले आहे.  नासाच्या या अहवालामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून काही दिवसापूर्वी मेक्सिकोच्या संसदेमध्ये एलियनचा मृतदेह दाखवण्यात आला होता.  या घटनेबरोबर नासाच्या अहवालाचा संबंध जोडण्यात येत आहे.  मात्र नासानं आपल्या अहवालात युएफओचा पृथ्वीला मोठा धोका असून भविष्यात यावर अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचेही नमूद केले आहे.  मुख्य म्हणजे, अहवालात, नासाने कबूल केले आहे की, यूएफओ हे आपल्या ग्रहाचे सर्वात मोठे रहस्य आहे. अहवाल प्रसिद्ध करताना नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन म्हणाले की, त्यांचा विश्वास आहे की, या विश्वात पृथ्वी व्यतिरिक्त जीवन आहे,  या त्यांच्या वाक्यानं एलियन असल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येते.  (Aliens In Space)

नासाचा अहवाल जाहीर,अंतराळात एलियन असल्याचा दावा

नासातर्फे गेले काही वर्ष एलियन आणि त्यांचे विमान, युएफओ यावर संशोधन करण्यात येत आहे.  आपल्यापेक्षा परग्रहींकडे प्रगत तंत्रज्ञान असल्याचे नासाचे म्हणणे आहे.  त्यातूनच परग्रहींच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी नासा प्रयत्न करीत आहे. यावर आधारीत नासाचा अहवाल या आठवड्याचे नासाच्या व्यवस्थापकांना सोशल मिडियावर जाहीर केला.  त्यात त्यांनी एलियन आणि युएफओचे अस्तित्व मान्य केले आहे.  पृथ्वीच्या बाह्य वातावरणात या दोघांचेही अस्तित्व असल्याचे नासानं त्यांच्या अहवालात स्पष्ट केले आहे.  यूएफओच्या अभ्यासासाठी भविष्यात अधिक नवीन वैज्ञानिक तंत्रे आवश्यक असतील, असेही नासानं म्हटले आहे. (Aliens In Space)

यासंदर्भात नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितले की, पृथ्वीच्या बाह्य वातावरणात एलियन्स आहेत.  हे जाहीर करतांनाच नासानं यासंदर्भात अधिक अभ्यास करण्याची गरजही व्यक्त केली आहे.  यूएफओवरील अहवालाचे हे पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष आहेत.  त्यामुळे बिल नेल्सन यांनी या संपूर्ण वस्तुस्थितीची चौकशी करण्यासाठी यूएपी संशोधन संचालकाची नियुक्ती करत असल्याची घोषणा केली आहे.  आधीच नासाची एक समिती एलियन संदर्भात संशोधन करीत होती, त्या समितीनंही अशाच एका स्वतंत्र संशोधन पथकाच्या नियुक्तीची मागणी केली होती.  त्यानुसार नासानं युएफओ आणि एलियन बाबत एक स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. स्वतंत्र युएफओ समितीमध्ये विविध क्षेत्रातील 16 तज्ञांचा समावेश आहे.  नासाच्या अहवालात यूएफओ हे अमेरिकन हवाई क्षेत्राच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  त्यावरही या समितीतील तंत्रज्ञ अभ्यास करणार आहेत.  नासानं नवयुक्त केलेली ही समिती आता आकाशात घडणाऱ्या घटनांचे संशोधन करुन त्यातून काही धोके असतील तर ते आधी स्पष्ट करण्यात येतील. (Aliens In Space)

बिल नेल्सन यांनी नासाचा अहवाल जाहीर करताना सांगितले आहे की, भविष्यात नासा यूएफओचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास आणि विश्लेषण करण्यावर भर देणार आहे.  33 पानांच्या या अहवालाच्या शेवटच्या पानावर असे म्हटले आहे की, नासाने नोंदवलेल्या शेकडो यूएफओच्या मागे कोणतीही अलौकिक शक्ती आहे, असा निष्कर्ष आत्तातरी काढता येणार नाही.  पण आपल्या सूर्यमालेतून अनेक रहस्यमय गोष्टी पृथ्वीपर्यंत आल्याचे अहवालात म्हटले आहे.  अमेरिकेचे संरक्षण यंत्रणा जेथे आहे, त्या पेंटागॉनने यापूर्वी एक व्हिडिओ जाहीर करुन नौदलाच्या वैमानिकांनी अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर काही रहस्यमय विमाने पाहिल्याचा दावा केला होता. या विमानांचा वेग सध्याच्या विमान वाहतूक तंत्रज्ञानापेक्षा जास्त होता.  तसेच त्यांचा आकारही वेगळा होता.  तेव्हापासून अमेरिकेत एलियनच्या अस्तित्वाबाबत चर्चा सुरु झाली होती.  (Aliens In Space)

===========

हे देखील वाचा : सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मोफत मिळणार गॅस सिलिंडर

===========

दरम्यान नासाच्या या अहवालाच्या आधी एक दिवस मेक्सिकन संसदेतच एलियन्सचे मृतदेह दाखविण्यात आले.  त्यानंतर नासानं लगेच आपला अहवाल जाहीर केला.  या दोन्ही घटनांचा संबंध लावण्यात येत आहे.  नासाकडेही एलियनचे मृतदेह आहेत, पण त्यांच्या आधी मेक्सिकोनं एलियन असल्याचा दावा करणारे पुरावेच सादर केल्यानं नासाला जी प्रसिद्धी मिळायाची होती, ती प्रसिद्धी मेक्सिकोलो मिळाली,  त्यामुळेच नासानं घाईघाईनं पत्रकार परिषद घेऊन युएफओ संदर्भात आपला अहवाल जाहीर केला आणि समिती जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.