Home » नासाने रचला इतिहास… आता समजणार आपली आकाशगंगा ‘अल्फा सेंटरी’ कशी आहे? 

नासाने रचला इतिहास… आता समजणार आपली आकाशगंगा ‘अल्फा सेंटरी’ कशी आहे? 

by Team Gajawaja
0 comment
'Black Brant' Rocket
Share

नासा! अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था. तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा. 

१९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते. जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं; सोव्हिएत महासंघ, तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तांमध्ये छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्रराष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. 

कोण श्रेष्ठ!? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं  होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र आपोआपच जगाची सूत्र अमेरिकेकडे गेली. अत्यंत समृद्ध देश अशी अमेरिकेची आजवरची ख्याती आहे. अशा या अमेरिकेच्या नासाने नुकतंच ऑस्ट्रेलियन स्पेस सेंटर वरुन “ब्लॅक ब्रांट (‘Black Brant’ Rocket)” हे रॉकेट प्रक्षेपित केलं आहे. 

१९९५ नंतर प्रथमच नासाने ‘अर्नहेम स्पेस सेंटर’मधून व्यावसायिक रॉकेट प्रक्षेपित केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या ‘नुलहुंबय’ या जागेवरून हे रॉकेट प्रक्षेपित केलं गेलं. या भागात ऑस्ट्रेलियाचे मूल निवासी लोक म्हणजे ‘अबोरीजनल’  लोक राहतात. या भागात ‘गुमताज’ जमातीचे लोकही राहतात. या रॉकेटबद्दल सांगायचं म्हणजे अमेरिकेतल्या विस्कॉनसिन विद्यापीठाने एक्सरे क्वांनटंम कॅलॉरीमीटर विकसित केले आहे. प्रतिकूल हवामानामुळे फक्त तासभर उशिराने रॉकेटचं प्रक्षेपण झालं, बाकी या प्रक्षेपणात कुठलीही समस्या आली नाही. 

ऑस्ट्रेलियात २५ वर्षानंतर प्रथमच अशाप्रकारे ‘रॉकेट प्रक्षेपण’ झालं आहे. या प्रक्षेपणामुळे खगोलीय विज्ञानाचा अभ्यास केला जाणार आहे. अशाप्रकारचं संशोधन फक्त दक्षिण गोलार्धातूनच करता येतं आणि म्हणूनच या अभ्यासाठी हे प्रक्षेपण महत्वाचं असेल आणि यासाठीच ऑस्ट्रेलियाची निवड झाली. हे रॉकेट प्रक्षेपणानंतर फक्त १० सेकंदच डोळ्यांनी पाहता आले इतक्या वेगाने ते आकाशात झेपावले. (NASA Launches ‘Black Brant’ Rocket)

हे रॉकेट ४३० मिलियन प्रकाशवर्ष दूर असलेल्या ताऱ्यांचा आणि ग्रहांचा अभ्यास करणार आहे. तसंच आपली आकाशगंगा ‘अल्फा सेंटरी’ कशी आहे,हे या अभ्यासात कळणार आहे. असे कुठले ग्रह अवकाशात आहेत जिथे मानवी वस्ती होऊ शकते, हेसुद्धा या अभ्यासात कळणार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास या रॉकेटवर एक मोठा एक्सरे कॅमेरा लावला आहे जो कक्षेत फिरताना चित्र टिपून घेणार आहे. तसंच हे रॉकेट ३०० किमी प्रती तास या वेगाने अवकाशात फिरणार आहे. 

====

हे देखील वाचा – इराणचा आण्विक करार: भारतामध्ये तेलाचे दर कमी होणार का?

====

नासाकडून अर्नहेम स्पेस सेंटर मधून अशाप्रकारच्या एकूण तीन रॉकेटचं प्रक्षेपण होणार आहे. त्या शृंखलेतलं हे पहिलं प्रक्षेपण होतं. दुसरं प्रक्षेपण हे ४ जुलैला होणार असून त्याचं नाव आहे सिस्टीन (SISTINE)! या सिस्टीन प्रक्षेपणात मुख्यत्वेकरून अल्ट्राव्हायोलेट किरणांचा अवकाशात फिरणाऱ्या ग्रहांच्या वातावरणावर काय परिणाम होतो आहे, हे अभ्यासलं जाणार आहे. तिसरं आणि या शृंखलेतलं शेवटचं प्रक्षेपण हे १२ जुलैला होणार आहे. या मिशनच नाव आहे ड्यूस (DEUCE)… या अंतर्गत सिस्टीन मिशनमध्ये  जे ग्रह शोधले आहेत, त्यांच्यावर एक्सट्रिम अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या संदर्भात अभ्यास केला जाणार आहे. (NASA Launches ‘Black Brant’ Rocket)

नासाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे अंतराळवीर. इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. हे होतं नासाचं अपोलो मिशन.  कारण कुठल्याही माणसाने अशाप्रकारे म्हणजे मानवजातीने इतर ग्रहांवर आपण जाऊ शकू अशी कल्पनाही केली नसेल, इतकं मोठं यश नासाने संपादन केलं. नासा आता मंगळवारसुद्धा अंतराळवीरांना पाठवण्याच्या बेतात आहे. हेच काय तर, नासाने महत्वाकांक्षी असा ‘अरटेमिस प्रोग्राम’ ठरवला आहे. ज्यात चंद्राच्या दक्षिण भागात पहिली महिला आणि पुरुष यांना पाठवण्याचा बेत आहे. हे मिशन असणार आहे २०२४ सालचं! 

मानव प्राणी आकाशापासून आता अवकशापर्यंत पोहोचतो आहे. ही विज्ञानाची करामत आहे. पण याचं श्रेय माणूस नावाच्या बुद्धिमान प्राण्याला जातं. अंतराळात पोहोचण्यासाठी जे तंत्रज्ञान आवश्यक आहे ते विकसित करण्यासाठी प्रचंड वेळ पूर्वी खर्ची व्हायचा. पण सद्यस्थितीत ज्या गतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. (NASA Launches ‘Black Brant’ Rocket)

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ हे आता विज्ञानाचं प्रमुख अंग बनलं आहे. भविष्यात तंत्रज्ञान विकसित होण्याची गती आपल्या कल्पनेपलीकडे जाईल अशी परिस्थिति आहे. भारतासारख्या देशात आपली इस्रो अंतराळ संस्थासुद्धा नवनवीन क्षितिज गाठते आहे. इस्रोकडे सुद्धा नवीन मिशन्स तयार आहेत. मग ते चंद्रयान असो किंवा मंगलयान. आत्तापर्यंत फक्त सरकारी स्तरावरच अवकाश कार्यक्रम हाती घेतघेतले जात असत. पण सरकारी आणि खाजगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अवकाश क्षेत्रात आपल्याला कमी वेळात उंच झेप घेता येतेय. या नवीन अंतराळ युगासाठी आपण तयार होऊया…!

-निखिल कासखेडीकर 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.