Home » 300 रुपयांची नोकरी ते Jet Airways च्या मालकाचा प्रवास- नरेश गोयल

300 रुपयांची नोकरी ते Jet Airways च्या मालकाचा प्रवास- नरेश गोयल

काही वर्षांपर्यंत कोट्यावधी रुपयांत खेळणारे नरेश गोयल आज तुरुंगात आहेत. बँक फ्रॉड प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. नरेश गोयल यांनी आपल्या आईकडून पैसे उधार घेऊन जेट एअरवेजची सुरुवात केली होती.

by Team Gajawaja
0 comment
Naresh Goyal
Share

काही वर्षांपर्यंत कोट्यावधी रुपयांत खेळणारे नरेश गोयल आज तुरुंगात आहेत. बँक फ्रॉड प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. नरेश गोयल यांनी आपल्या आईकडून पैसे उधार घेऊन जेट एअरवेजची सुरुवात केली होती. जेट एअरवेजच्या आयपीओनंतर फोर्ब्सने नरेश गोयल यांचे नेटवर्थ १.९ बिलियन डॉलर असल्याचे म्टले होते. मात्र कंपनीच्या घसरणीमुळे त्यांचे स्टार ही फिरले. तर जाणून घेऊयात नरेश गोयल यांच्या आयुष्याचा प्रवास. (Naresh Goyal)

१९६७ मध्ये ट्रॅवल एजेंसीत काम
डिसेंबर १९४९ मध्ये पंजाब मधील संगरूर मध्ये जन्मलेले नरेश गोयल यांचे वडील ज्वेलरीचे व्यावसायिक होते. वडीलांच्या आकस्मिक निधानामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळाच पण त्याचसोबत काही आर्थिक समस्या ही निर्माण झाल्या. तेव्हा ते केवळ ११ वर्षाचे होते. त्यावेळी सरकार आणि बँकेच्या कारवाईत गोयल परिवाराची संपूर्ण संपत्ती हातातून निघून गेली. त्यानंतर मामांनी ग्रॅज्युएशन पर्यंतच्या त्यांच्या खर्चाचा भार उचलला. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर १९६७ मध्ये गोयल यांनी एका ट्रॅव्हल एजेंसीमध्ये कॅशिअरची नोकरी केली. त्यांना तेव्हा ३०० रुपये प्रति महिना असा पगार मिळत होता.

सात वर्ष ट्रॅवल एजेंसीत काम केले
त्यानंतर नरेश लेबनानी इंटरनॅशनल एअरलाइन्ससाठी जीएसए ट्रॅव्हल एजेंसीशी जोडले गेले. १९६७-१९७४ दरम्यान गोयल यांनी काही परदेशी एअरलाइन्ससोबत जोडत ट्रॅव्हल एजेंसी संदर्भातील काम शिकले. या दरम्यान त्यांनी काही परदेश दौरे ही केले. त्यांचे कठोर परिश्रम आमि मेहनतीच्या कारणास्तव त्यांना १९६९ मध्ये इराक एअरवेजच्या पीआर मॅनेजरच्या रुपात नियुक्त केले. १९७१ मध्ये गोयल रॉयल जॉर्डन एअरलाइन्समध्ये ते रीजनल मॅनेजर झाले आणि १९७४ पर्यंत त्याच पदावर काम केले. या दरम्यान त्यांनी विविध कामांचा अनुभव मिळवला.

१९९३ मध्ये सुरु केली जेट एअरवेज
जेट एअरवेजने १९९३ मध्ये देशात आपले परिचालन सुरु केले. २००४ पर्यंत जेट एअरवेजने इंटरनॅशनल फ्लाइटचे संचालन सुरु केले. २००७ मध्ये एअर सहाराला टेकओव्हर केल्यानंतर २०१० पर्यंत जेट एअरवेज देशातील सर्वाधिक मोठी एअरलाइन होती. काही वर्षापर्यंत सर्वकाही व्यवस्थितीत सुरु होते. मात्र त्यांच्या कंपनीच्या अडचणी वाढू लागल्या आणि मार्च २०१९ मध्ये त्यांना आपल्या पदावर पायउतार करावा लागला होता.

२०१९ मध्ये कंपनीच्या बोर्डाचा दिला राजीनामा
२००० च्या दशकात त्यांच्या विरोधात एक पीआयएल दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्यावर अंडरवर्ल्ड दाउद याच्यासोबत संबंध असल्याचे आरोप लावण्यात आले होते. त्याचसोबत हे सुद्धा म्हटले गेले होते की, जेट एअरवेजची स्थापना दाउदने केली होती. संशयित देवाणघेवाणीसंबंधित प्रकरणी ईडीने त्यांच्यावर फेमा अंतर्गत मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी आपली पत्नी अनीता गोयलसोबत जेट एअरवेजच्या बोर्डाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या समस्या येथवर थांबवल्या नाहीत. (Naresh Goyal)

कोणत्या प्रकरणी तुरुंगात आहेत?
जेट एअरवेजचे संचालन बंद झाले. प्रमोटर राहिलेल्या नरेश गोयल यांच्यावर ईडीने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली ते मुंबई पर्यंत त्यांच्या आठ ठिकाणी छापेमारी केली.त्यांच्या समस्या अधिकच वाढल्या गेल्या. तपास यंत्रणा कंपनीने आता कॅनरा बँकेच्या विरोधात एक नवा गुन्हा दाखल केला आहे. कॅनरा बँकेने जेट एअरवेज (इंडिया) साठी ८४८.८६ कोटींचे कर्ज मंजूर केले होते. त्यापैकी अद्याप ५३८.६३२ कोटी रुपये शिल्लक आहेत. आता त्यांना अटक बँक फ्रॉड प्रकरणी करण्यात आली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.