Home » Narendra Modi : मोदींची चीन आणि रशियाच्या रोल्स रॉइसमधून सफर !

Narendra Modi : मोदींची चीन आणि रशियाच्या रोल्स रॉइसमधून सफर !

by Team Gajawaja
0 comment
Narendra Modi
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषदेसाठी चीनच्या तियानजिन शहरात आहेत. या शिखर परिषदेत मोदी यांनी केलेल्या भाषणाचे जगभरात कौतुक होत आहे. या परिषदेसाठी जगभरातील काही हजार पत्रकार तियानजिन शहरात आहेत. कारण या शिखर परिषदेत भारत, रशिया आणि चीन या तीन मातब्बर देशाचे नेते एकत्र आले आहेत. या तिघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जलवा किती आहे, याची एक झलक या पत्रकारांच्या माध्यमातून जगभरात दिसली आहे. (Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या कारमध्ये प्रवास केला आहे. या दोन्हीही कार खास आहेत. त्यातील एक चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची कार असून तिला चीनची रोल्स रॉइस कार म्हणतात, तर दुसरी कार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची आहे. या गाडीलाही रशियाची रोल्स राइस म्हणून ओळखले जाते. चीनमध्ये होत असलेल्या शिखर परिषदेकडे जगाचे लक्ष लागले आहे. येथे भारत, रशिया आणि चीन हे तीन देश अमेरिकेच्या टेरिफ धोरणाला कसे उत्तर देतात, याची उत्सुकता जगभरात आहे. अशाचवेळी या शिखर परिषदेवर असलेली भारताची, पर्यायानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छापही जगभरात चर्चेचा विषय झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून उठवलेले मुद्दे त्याला कारणीभूत ठरले, तसेच पंतप्रधान मोदी यांनी केलेला प्रवासही चर्चेचा ठरला आहे. (International News)

या प्रवासासाठी मोदी यांनी दोन राष्ट्राध्यक्षांच्या गाडीचा वापर केला आहे. पंतप्रधान मोदींना चीनमधील तियानजिनमध्ये प्रवासासाठी ‘होंगकी एल5′ ही खास कार देण्यात आली. या कारला चीनची रोल्स रॉयस म्हणतात. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हिच कार वावरतात. पंतप्रधान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी याच कारमध्ये पोहोचले. या होंगकी कारला रेड फ्लॅग कारही म्हणतात. चीनचे अध्यक्ष 2019 मध्ये जेव्हा भारत भेटीवर आले होते, तेव्हाही त्यांनी ही कार सोबत आणली होती. आता त्याच गाडीमधून पंतप्रधान मोदी चीनमध्ये प्रवास करीत आहेत. कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी 1957 मध्ये ही कार खास बनवण्यात आली होती. चीन सरकारच्या मालकीची कंपनी फर्स्ट ऑटोमोटिव्ह वर्क्सने ही गाडी तयार केली. मेड इन चायना चळवळीचे प्रतिक म्हणूनही या गाडीकडे बघितले जाते. होंगकी गाडीची लांबी सुमारे 5.5 मीटर आहे आणि त्यात V12 इंजिन आहे. चिनी भाषेत होंगकी म्हणजे लाल झेंडा. त्यामुळे फक्त राजकीय नेत्यांसाठीच या गाडीचा वापर होत असे. (Narendra Modi)

या गाडीचे उत्पादन 1981 मध्ये थांबवण्यात आले. परंतु 1990 मध्ये पुन्हा या गाडीची निर्मिती सुरु झाली. आज होंगकी L5 ही गाडी चीनमध्ये राष्ट्रपती आणि खास परदेशी पाहुण्यांसाठी राखीव आहे. 18 मीटर फूट लांब असलेली ही गाडी 3 टनांपेक्षा जास्त वजनाची आहे. यात 6.0 लिटर व्ही12 टर्बो इंजिन आहे, जे 400 पेक्षा जास्त हॉर्सपॉवर देते. ही कार सुमारे 8.5 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठते आणि तिचा सर्वोधिक वेग सुमारे 210 किमी/ताशी आहे. या गाडीत सुरक्षिततेसाठी, ऑल-व्हील ड्राइव्ह, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरे आणि पार्किंग सेन्सर्स आहेत. या कारमध्ये ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टम, उच्च-शक्तीची स्टील बॉडी आहे. (International News)

कारचे इंटीरियर संपूर्ण व्हीआयपी अनुभव देणार आहे. त्यात नप्पा लेदर सीट्स, सजावटीचे लाकूडकाम आणि मौल्यवान खडे लावलेले आहे. जगातील सर्वात सुरक्षित कारपैकी होंगकी एल5 कारचा समावेश आहे. कारण ही कार लहान बॉम्ब, गोळ्या आणि रासायनिक हल्ल्यांना तोंड देऊ शकते. यात एअर कॉम्प्रेशन सिस्टम आणि रन-फ्लॅट टायर्स आहेत. त्यामुळे ही कार पंक्चर झाली तरीही चालू शकते. होंगकी एल5 ची किंमत 5 ते 7 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. आता हिच गाडी पंतप्रधान मोदी यांच्या दिमतीसाठी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची खास गाडी वापरत असतांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे त्यांच्या खास कारसह तियानजिनला पोहोचले आहेत. पुतिन यांची ऑरस कारही जगातील सर्वात सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते. याच ऑरस कारमध्ये पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना प्रवास करायला लावला. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अधिकृत कार ही ऑरस सेनाट ब्रँडची एक लक्झरी लिमोझिन आहे. (Narendra Modi)

=======

Donald Trump : RIC ची ताकद ट्रम्पना रोखणार

=======

या कारला रशियन रोल्स-रॉइस असेही म्हणतात. ऑरस मोटर्स कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली आणि ही कंपनीही फक्त राष्ट्रपतींसाठी गाड्या तयार करते. पुतिन यांची कार प्रामुख्याने L700 लिमोझिन मॉडेल आहे. ही कार बुलेटप्रूफ आणि आर्मर्ड आहे. तिची लांबी 5.63 मीटर आहे. या गाडीचे वजन 2700 किलो आहे. त्यात 4.4 लिटर ट्विन-टर्बो V8 हायब्रिड इंजिन आहे. या गाडीचा सर्वाधिक वेग 249 किमी/तास आहे. ही कार चिलखत छेदणाऱ्या गोळ्या, ग्रेनेड आणि पाण्यात बुडवण्याचा सामना करू शकते. त्यात धुराचे पडदे, आपत्कालीन निर्गमन आणि बाह्य संप्रेषण प्रणाली आहेत. पुतिन परदेशी दौऱ्यांवर Il-76 विमानातून ही कार घेऊन जातात. ऑरस कार रशियाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते. याच गाडीतून पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह प्रवास केला आणि जगाचे लक्ष वेधून घेतले. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.