दिल्लीतील सध्या चर्चेतील श्रद्धा हत्याकांड मधील आरोपी आफताब पूनावाला याची नार्को चाचणी (Narco Test) केली जात आहे. नार्को चाचणीनंतर अशी अपेक्षा करण्यात येत आहे की, श्रद्धाच्या हत्येच्या प्रकरणातील काही गोष्टी समोर येतील आणि पोलिसांना सर्व पुरावे मिळतील. कारण चौकशी दरम्यान पोलिसांना आफताब याने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. दरम्यान असे पहिल्यांदाच झालेले नाही की एखादा गुन्हेगार सत्य लपवण्यासाठी वारंवार आपले विधान बदलत आहे. यापूर्वी सुद्धा निठारी कांड, आरुषी मर्डर केसह काही गुन्हेगारांची सुद्धा नार्को चाचणी करण्यात आली होती. तर जाणून घेऊयात नार्को चाचणी नक्की काय आहे आणि त्याचा कशा पद्धतीचे वापर केला जातो त्याबद्दल अधिक.
नार्को चाचणी ही ट्रुथ सीरमच्या माध्यमातून केली जाते. नार्को हा ग्रीक भाषेतील एक शब्द आहे. ज्याचा अर्थ एनेस्थियिया. नार्को एनालिसिसचा वापर करुन मनोचिकित्सकेसाठी असे तंत्रज्ञान असते ज्यामध्ये साइकोट्रोपिक औषधांचा वापर केला जातो. ती अशावेळी केली जाते जेव्हा एखादा गुन्हेगार सत्य लपवण्यासाठी वारंवार विधानं बदलत राहतो. कोर्टाच्या परवानगी नंतर ही चाचणी केली जाते. या चाचणीत सोडियम पेंटोथल, स्कोपोलामिन आणि सोडियम एमिटल हे व्यक्तीच्या शरिरात एका इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जाते.
हे औषधं शरिरातील शिरांमध्ये केल्यानंतर व्यक्तीच्या रक्तात मिसळतात आणि तो व्यक्ती हिप्नोटिक ट्रांन्समध्ये जातो. यामुळे त्याला वाटणारी भिती आणि खोटं बोलण्याची प्रवृत्ती कमी होते. अशातच तो न घाबरता उत्तरे देतो, ती उत्तर तो शुद्धीत असताना देत असल्याचा प्रमाणेच असतात. यामुळे एजेंसिंना असे सुद्धा कळते की, पुरावे नसले तरीही काही गोष्टी समोर येतात.
भारतात पहिल्यांदा कधी झाली होती नार्कोची चाचणी?
-भारतात सर्वप्रथम नार्कोची चाचणी २००२ मध्ये गोधरा कांडमध्ये झाली होती. त्या हत्याकांडात आरोपी कासिम अब्दुल सत्तार, बिलाल हाजी, अब्दुल रज्जाक, अनवर मोहम्मद आणि इरफान सिराज यांच्यावर नार्को चाचणी करण्यात आली होती.
-२००६ मध्ये निठारी कांडमध्ये सीबीआयने आरोपी मनिंदर कोली याची नार्को चाचणी केली होती. यामध्ये सीबीआयला नार्को चाचणीमुळे काही गोष्टी कळल्या होत्या. त्यानंतर दुसरा आरोपी सुरेंद्र कोली याला गाजियाबाद सीबीआय कोर्टाने १४ वेळा फाशीची शिक्षा सुनावली होती.
-२००७ मध्ये हैदराबाद मध्ये झालेल्या दोन बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल कलीम आणि इमरान खान याची ही चाचणी झाली होती. या स्फोटात ४२ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले होते. या दरम्यान आरोपींनी काही मोठे खुलासे सुद्धा केले होते. त्यानंतर कोर्टाने त्यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
-२००८ मध्ये नोएडा येथे झालेल्या आरुषि तलावर मर्डर केसमध्ये तिचे वडिल राजेश तलवार यांचे सहाय्यक कृष्णा यांची नार्को चाचणी झाली होती. त्यानंतर केसची पूर्ण कथाच बदलली गेली. पोलिसांना तपासात असे कळले की, आरुषी आणि नोकर हेमराज या दोघांची हत्या राजेश तलवार आणि त्यांची पत्नी नुपूर तलवार यांनी केली होती. त्याच्या आधारावर त्यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
-मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाब याची सुद्धा नार्को चाचणी झाली होती. या दरम्यान अजमल याने खुलासा केला होता की, तो पाकिस्तानात राहणारा आहे आणि त्याला या हल्ल्यासाठी ट्रेनिंग दिली गेली होती. अजमल याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
हे देखील वाचा- जमीनानंतर सुद्धा कैद्यांची सुटका का होत नाही? काय आहे कायदा
नार्कोची चाचणी कोण करतं?
नार्कोची चाचणी (Narco Test) फॉरेंसिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मनोवैज्ञानिकांची एक टीम असे एकत्रित करते. या दरम्यान, सुस्त अवस्थेत असलेल्या व्यक्तीला काही प्रश्न विचारले जातात. त्याची त्याला खरी उत्तर द्यायची असतात. ट्रुथ ड्रग दिल्यानंतर तज्ञांची टीम सर्वात प्रथम हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते की, इंजेक्शन योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला सुरुवातीला काही सोप्पे प्रश्न विचारले जातात. जसे की, त्याचे नाव, परिवार असे. त्यानंतर व्यवसायाबद्दल विचारले जाते. जर तो व्यक्ती वकिल असेल तर त्याला तु डॉक्टर आहेस का असा उलट प्रश्न केला जातो. यावरुन कळते की, तो खरं बोलत आहे की खोटं. त्यानंतर त्याला घडलेल्या घटनेबद्दल प्रश्न विचारले जातात.