धनत्रयोदशी झाली की येते ती ‘नरकचतुर्दशी’. नरकचतुर्दशी म्हणजे पहिली अंघोळ अर्थात दिवाळीतील पहिले अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे लवकर उठून सुवासिक तेल, उटणे लावून अंघोळ करण्याची प्रथा आहे. दिवाळीत या दिवसाला देखील मोठे महत्व आहे. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणून देखील नरकचतुर्दशीच्या दिवसाला ओळखले जाते. आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. नरक चतुर्दशी दिवाळीच्या एक दिवस आधी आणि धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी येते. अनेक अर्थी या दिवसाला महत्व प्राप्त आहे. (Marathi)
भारतातील काही ठिकाणी नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणूनही ओळखले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात फक्त हा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, यमराज, भगवान श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, भगवान हनुमान आणि भगवान विष्णू यांच्या वामन स्वरुपाची पूजा केली जाते. यंदा नरक चतुर्दशी सोमवारी, २० ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाईल. नरक चतुर्दशी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०१:५१ वाजता सुरु होईल आणि चतुर्दशी तिथी समाप्त होईल २० ऑक्टोबर २०२५, दुपारी ०३:४४ वाजता संपेल. (Narak Chaturdashi)
नरकचतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते. अभ्यंगस्नान चंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी पुढील मंत्र म्हणावा. ‘यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।’ (Diwali 2025)
अर्धी आंघोळ झाल्यानंतर आंघोळ करणार्याला औक्षण करावे. या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी पुढील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा. ‘दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।। चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।’ (Top Stories)
अभ्यंगस्नान झाल्यानंतर अनेक ठिकाणी ‘कारेटं’ अंगठयाने फोडण्याची प्रथा आहे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यावे. त्यानंतर देवाला नैवेद्य म्हणून फराळाचे पदार्थ दाखवावे. घरातील सर्व सदस्यांनीही अंघोळीनंतर फराळाच्या पदार्थाचं सेवन करावे. अनेक ठिकाणी या दिवशी दिवाळी पहाटचा कार्यक्रम असतो. (Marathi Trending News/Headline)
नरक चतुर्दशी कथा
पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नींसह द्वारकेत राहत होते. एके दिवशी देवराज इंद्र भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि म्हणाले… हे कृष्णा, दैत्य राजा भौमासुराच्या अत्याचारामुळे देवांना त्रास होत आहे. क्रूर भौमासुराने वरुणाचे छत्र, अदितीचे कानातले आणि देवतांचे रत्न हिसकावून घेतले आणि तो तिन्ही लोकांचा राजा झाला. भौमासुराने पृथ्वीवरील अनेक राजे आणि सामान्य लोकांच्या मुलींचे अपहरण केले आहे. या तिन्ही जगाला त्या क्रूर राक्षसापासून वाचवा. (Top Marathi News)
देवराज इंद्राचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण आपली पत्नी सत्यभामासह गरुडावर स्वार झाले आणि क्रूर भौमासुराचे वास्तव्य असलेल्या प्राग्ज्योतषपुरात पोहोचले. भगवान श्रीकृष्णाने सर्वप्रथम आपल्या पत्नीच्या मदतीने मुर नावाच्या राक्षसाचा सहा पुत्रांसह वध केला. मुर राक्षसाच्या वधाची बातमी ऐकून भौमासुर आपल्या सैन्यासह युद्धासाठी निघाला. भौमासुराला एका स्त्रीकडून मारले जाईल असा शाप होता. म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिला सारथी बनवले आणि युद्धाच्या शेवटी सत्यभामेच्या मदतीने भौमासुराचा वध केला. (Latest Marathi Headline)
यानंतर त्यांनी भौमासुरचा पुत्र भगदत्त याला निर्भयतेचे वरदान देऊन प्राग्ज्योतिषाचा राजा बनवले. भगवान श्रीकृष्णाने ज्या दिवशी भौमासुराचा वध केला, ती आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती, म्हणून या तिथीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने केवळ नरकासुराचा वध केला नाही तर त्याच्या बंदिवासातून सुमारे १६ हजार स्त्रियांची सुटका केली. या आनंदामुळे त्यादिवशी दीपप्रज्वलन करण्यात आले. चहूबाजूंनी दिवेही दान करण्यात आले. नरकासुराच्या मृत्यूनंतर, त्याच्या शरीरावरील रक्ताचे थैले स्वच्छ करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने स्वतः तेलाने स्नान केले. यामुळेच ते नेहमी अंगाला तेल लावतात, तेव्हापासून अभ्यंगस्नानाला सुरुवात झाली. (Top Trending News)
========
Diwali 2025: दिवाळीचे ५ दिवस प्रत्येक दिवस सांगतो शुभत्व, प्रेम आणि नव्या सुरुवातीचा अर्थ!
Diwali : धनत्रयोदशीला कुबेर पूजन करण्यामागे आहे खास कारण
========
नरक चतुर्दशी कथा २
दक्षिण भारतातही या दिवशी वामन पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी राजा बली (महाबली) याला भगवान विष्णूने दरवर्षी वामन अवतारात भेट देण्याचा आशीर्वाद दिला होता. यासाठी वामन पूजा केली जाते. अनुसरराज बली म्हणाले, हे देवा! कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते अमावस्या या कालावधीत तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस, म्हणून माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजासाठी दिवा दान करणाऱ्यावर यमाचा छळ होऊ नये आणि उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला यमाकडून त्रास होऊ नये. दिवाळीच्या या तीन दिवसात लक्ष्मीजी कधीही घराबाहेर पडत नाहीत. असे आशीर्वाद द्या. ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले, ‘राजन ! असे होईल, तथास्तू.’ भगवान वामनाने राजा बलीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाचे व्रत, पूजा आणि दीपदान करण्याची प्रथा सुरू झाली. (Social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics