आज दिवाळीची पहिली अंघोळ अर्थात नरक चतुर्दशी. आश्विन वद्य चतुर्दशी तिथीला ‘नरकचतुर्दशी’ असे म्हणतात. या दिवसाला काली चतुर्दशी, छोटी दिवाळी आणि नरक निवारण चतुर्दशी असेही म्हटले जाते. या दिवसाचे महत्व मोठे आहे, कारण याच दिवशी भगवान श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि सोळा सहस्त्र राजकन्यांना त्याच्या बंदिवासातून मुक्त केले, श्रीकृष्णाने असुरी शक्तीवर विजय मिळवला म्हणून या दिवसास नरकचतुर्दशी म्हणतात. (Narakchaturdashi)
नरकचतुर्दशीला पहाटे उठून सुवासिक तेल आणि उटणे अंगाला लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी नरकासुर या राक्षसाचा वध केला. श्रीकृष्ण यांच्याबद्दल तर कमी जास्त प्रमाणात सर्वांनाच माहिती आहे. मात्र आज आपण श्रीकृष्णाची पत्नी असलेल्या सत्यभामाबद्दल जाणून घेऊया. (Diwali)
सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णाची एक राणी होती, जिने नरकासुराचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाला मदत केली होती. सत्यभामा ही देवी भूमी आणि लक्ष्मीचा अवतार मानली जाते. नरकासुर, जो अत्यंत शक्तिशाली होता, त्याला मारण्यासाठी श्रीकृष्णाने सत्यभामाची मदत घेतली आणि तिच्या मदतीने त्याचा पराभव केला. सत्यभामा ही राजा सत्राजित यांची कन्या होती. ती कृष्णाच्या आठ मुख्य पत्नींपैकी एक होती. सत्यभामाला भूमीदेवीचा अवतार मानले जाते. सत्यभामेने नरकासुर या राक्षसाचा वध करण्यात कृष्णाला मदत केली, त्यामुळे तिचे महत्त्व जास्त आहे. सत्यभामा आणि श्रीकृष्ण यांच्या विवाहाची देखील एक रंजक कथा आहे. या घटनेमध्ये श्रीकृष्णावर चोरीचा आरोप देखील करण्यात आले होते. (Marathi News)
ही कथा सुरू होते कृष्णाच्या सत्राजित नावाच्या एका भक्तापासून. सत्राजित नावाचा एक सूर्यभक्त होता. सूर्यदेव त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्याला एक ओजस्वी मणी देतात. त्या मणीचे नाव असते स्यमंतक मणी. या स्यमंतक मणीला सत्राजित आपल्या गळ्यात घालून फिरत असे. एके दिवशी तो द्वारकेला जाऊन पोहोचतो. त्या मणीचा प्रकाश सर्वत्र पसरत होता. या मण्याचा प्रकाश संपूर्ण द्वारकेमध्ये पसरला. (Todays Marathi Headline)
द्वारकेच्या लोकांना वाटले की जणू स्वयं सूर्य देवांचे द्वारकेला आगमन झाले. कृष्णाच्या भेटीला स्वयं सूर्यदेव आले ही बातमी हा हा म्हणता द्वारकेमध्ये पसरली. याबद्दल कृष्णाला समजतातच त्यांना हसू येऊ लागले. कारण श्रीकृष्णाला आधीच माहित असते की नक्की द्वारिकेमध्ये कोण आले आहे. ते म्हणतात आपण ज्यांना सूर्यदेव समजत आहात ते सूर्यदेव नसून सत्राजित आहे. त्याच्या गळ्यात जो मणी आहे त्याचा हा प्रकाश सर्वत्र पसरत आहे. सत्राजितने तो मणी आपल्या घराच्या देऊळात स्थापित केला होता. त्या मणीचे वैशिष्ट्य असे होते की तो मणी दररोज आठ भार सोनं देत असे. त्यामुळे सत्राजितकडे भरपूर संपन्नता होती. एके दिवशी कृष्ण त्याचा घराच्या समोरून जात होते, त्यांनी सत्राजितला सुचवले की ही मणी मथुरेचे महाराज उग्रसेन ह्यांना द्यावा. म्हणजे त्यांचा राज्यात पण संपन्नता येईल आणि प्रजा सुखी राहील. परंतु अती लोभेमुळे त्याने असे करण्यास नकार दिला. (Top Stories)
एके दिवशी सत्राजितचा लहान भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात घालून घोड्यावरून शिकार करण्यास जातो. तेथे प्रसेन आणि त्याचा घोडा एका सिंहाच्या हल्ल्यात मरण पावतात. सिंह त्या मणीला घेऊन आपल्या गुहेत जातो. ऋक्षराज जांबवंत ह्याची दृष्टी सिंहावर पडते जो मणी घेऊन जात असतो. जांबवंत सिंहाला ठार मारतात आणि त्याकडून ती मणी घेऊन आपल्या गुहेत येतात. (Top Marathi Headline)
इथे सत्राजित आपल्या भावाची आतुरतेने वाट बघत असतो. त्याला वाटते की कृष्णानेच त्याचा भावाला त्या मणीसाठी ठार मारले आहे आणि तो मणी चोरून नेला. अशी दवंडी सत्राजित संपूर्ण शहरात पिटवतो. कृष्णावर खोटे आरोपही करतो. ही गोष्ट कृष्णा पर्यंत पोहचते. आपल्यावर लागलेल्या या आरोपाला चुकीचे ठरविण्यासाठी श्रीकृष्ण काही लोकांना आपल्यासोबत घेतात आणि जंगलात प्रसेनला शोधण्यासाठी जातात. तेथे त्यांना सिंहाच्या पावलाचे खुणा दिसतात. काहीच अंतरावर त्यांना प्रसेन आणि त्याचा घोड्याचे प्रेत दिसते. त्यांना सर्व घडलेला प्रकार समजतो. (Top Marathi News)
थोड्या अंतरावरच त्या सिंहाचे देखील प्रेत श्रीकृष्ण बघतात. जवळच त्यांना अजून एक गुहा दिसते. या गुहेत अंधार असल्यामुळे कोणीही त्यामध्ये जाण्याचे धाडस करीत नाही. बरोबरच्या लोकांना बाहेरच थांबवून कृष्ण स्वतःच त्या अंधारी गुहेत जातात. आत गेल्यावर त्यांना दिसते की काही लहान मुलं त्या मणी सोबत खेळत असतात. श्रीकृष्णांना पाहून ती मुलं घाबरतात. त्या अनोळखी व्यक्तीला मारण्यासाठी जांबवंत धावून येतात. कृष्णा आणि जांबवंत यांच्यात युद्ध होते आणि हे युद्ध बरेच दिवस चालते. (Marathi Latest Headline)
जांबवंताना लक्षात येते की श्रीकृष्ण कोणी साधारण व्यक्ती नाही. ते कृष्णाच्या पायाशी लोटांगण घालतात. कृष्ण त्यांना माफ करतात पण जांबवंताला स्वतःची चूक जाणवते आणि त्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून जांबवंत आपल्या मुलीचे लग्न कृष्णा सोबत लावून देतात आणि मणी देऊन त्यांची परत द्वारिकेला पाठवणी करतात. अशा प्रकारे जांबवंती कृष्णाची दुसरी बायको होते. (Top Trending News)
=======
Diwali : नरक चतुर्दशीला आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
Naraka Chaturdashi : ‘छोटी दिवाळी’ अशी ओळख असणाऱ्या नरकचतुर्दशीचे महत्व
Narak Chaturdashi : नरक चतुर्दशीचे पौराणिक महत्व
=======
इकडे श्रीकृष्ण तो मणी सत्राजितला देत सर्व घटना सांगतात. हे सर्व घडलेले समजल्यावर त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते. त्याला देखील ह्याचे प्रायश्चित्त करावेसे वाटू लागते. कृष्णाला ते मणी देतात आणि मणीसोबतच त्याची मुलगी सत्यभामांचे लग्नसुद्धा कृष्णाशी लावून देतात. मणी आपल्याला सूर्यदेव कडून मिळाली आहे ती आपल्या जवळच राहू द्या. असे म्हणून ते मणी परत सत्राजितला देतात आणि सत्यभामांशी लग्न करतात. अश्या प्रकारे सत्यभामा कृष्णाची तिसरी बायको होते. (Social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics