Home » नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे, काय करू नये

नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे, काय करू नये

by Jyotsna Kulkarni
0 comment
Narak Chaturdashi
Share

आज गुरुवार ३१ ऑक्टोबर नरक चतुर्दशी. आजच्या दिवशी देवी लक्ष्मी, कृष्ण, माता काली, यमराज आणि हनुमान यांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि सुमारे १६००० स्त्रियांची कैदेतून मुक्तता केली. म्हणून दरवर्षी आश्विन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. हा दिवस रूप चौदस यासह अनेक नावांनी ओळखला जातो.
हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. .

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमासाठी दिवा लावला जातो. असे मानले जाते की, यामुळे व्यक्तीला कधीही अकाली मृत्यूला सामोरे जावे लागत नाही. तसेच यमाच्या नावाने दिवा लावल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. वास्तविक नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणतात कारण ती दिवाळीच्या एक दिवस आधी साजरी केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी काही कामे अत्यंत शुभ मानली जातात. त्याचबरोबर या दिवशी काही कामे करण्यास मनाई आहे. जाणून घेऊया नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

नरक चतुर्दशीला काय करावे?

– नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आधी लवकर उठून स्नान करावे.

– नरक चतुर्दशीच्या दिवशी १४ दिवे लावा.

– या शुभ दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे.

– नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात स्नान करून यमाची पूजा केली जाते.

– नरक चतुर्दशीला रूप चौदस असेही म्हणतात. या दिवशी उबटन लावण्याची परंपरा आहे.

Narak Chaturdashi

– नरक चतुर्दशीच्या यमराजाच्या नावाने दिवा लावावा.

– या दिवशी घराची दक्षिण दिशा अस्वच्छ असू नये.

-या दिवशी देवी-देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपर्‍यात स्थापित कराव्या आणि त्यांची पूजा करावी.

-नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात स्नान करून यमाची पूजा केली जाते.

-नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच छोटी दिवाळीच्या दिवशी दिवे दान करा.

-छोट्या दिवाळीच्या दिवशी घरातील प्रत्येक सदस्याने यमाच्या नावाने मोठा दिवा लावावा. हा चार बाजू असलेला दिवा घरभर फिरवावा.

– या काळात कुटुंबातील इतर सदस्यांनी घरातच राहावे आणि या यम दीपककडे पाहू नये, हे लक्षात ठेवा.

– नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून शरीराला तेलाने मसाज करून अंभ्यग स्नान करावे. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

– या दिवशी, आपले घर पूर्णपणे स्वच्छ करा, विशेषतः देव्हारा आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. यामुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळेल.

– या दिवशी विषम संख्येत दिवे लावा आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. तसेच, या दिवशी गणपतीचीही पूजा करावी, यामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील.

नरक चतुर्दशीला काय करू नये?

– नरक चतुर्दशीच्या दिवशी मांस आणि अल्कोहोलसह तामसिक पदार्थांचे सेवन करू नये.

– या दिवशी केस आणि नखे कापणे टाळावे.

– नरक चतुर्दशीला झोपू नये.

– नरक चतुर्दशीच्या दिवशी प्राण्यांची हत्या करू नये.

– या दिवशी प्राण्यांना चुकूनही त्रास देऊ नये.

– या दिवशी घरात भांडणे आणि अपशब्द वापरू नयेत.

– नरक चतुर्दशीच्या दिवशी मीठ, तेल आणि तीक्ष्ण वस्तूंचे दान करणे शुभ मानले जात नाही.

========
हे देखील वाचा : नरक चतुर्दशीचे पौराणिक महत्व कोणते?
========

– या दिवशी मारामारी करु नये किंवा अपशब्द काढू नयेत.

– या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला अस्वच्छता असू नये. असे केल्याने पितर आणि यमराज क्रोधित होतात असे मानले जाते.

– या दिवशी दिवसा घरात झोपू नये आणि कोणाला काही दान करू नये. कारण, असे केल्याने लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

– छोट्या दिवाळीच्या दिवशी तिळाच्या तेलाचे दान करू नये.

– नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळीच्या दिवशी चुकूनही झाडू मारू नये. लहान दिवाळीच्या दिवशी झाडू सरळ ठेवू नये. असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते आणि घरात वास करत नाही.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.