फ्रेंच राज्यक्रांतीचा सरसेनापती नेपोलियन बोनापार्टने त्याच्या कारकिर्दीत सुमारे ६० युद्धे लढली. त्यापैकी फक्त सात युद्धात नेपोलियनचा पराभव झाला. त्याच्या या विजयाच्या गाथेमुळेच नेपोलियनला इतिहासातील महान सरसेनापतींपैकी एक मानले जाते. एकेकाळी नेपोलियन आपल्या देशावर चालून येत आहे, असे ऐकले तरी, त्या देशाच्या सैन्याला कापरे भरायचे, आता त्याच नेपोलियनच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. तेही जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयातून. जगप्रसिद्ध अशा या लूव्र संग्रहालयावर दरोडा पडला असून चोरांनी थोर सरसेनापती नेपोलियन बोनापार्टाच्या नऊ मौल्यवान दागिन्यांची चोरी झाली आहे. (Louvre Museum)

शिवाय फ्रान्सच्या महाराणीचा मुकुटावरही चोरांनी डल्ला मारला आहे. मात्र हा अमुल्य मुकुट चोरण्याच्या नादात तुटला असून त्याचे तुकडे पोलिसांनी जप्त केले आहेत. चोरीच्या प्रकरणात ऐतिहासिक महत्त्व असलेली एक कलाकृती नष्ट झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. धक्कादायक म्हणजे या जगप्रसिद्ध संग्रहालयाच्या मजबूत सुरक्षा यंत्रणेतून जी चोरी करण्यात आली, त्यासाठी अवघी सात मिनिटं लागली. शिवाय चोरी कऱण्यासाठी चोर एका साध्या स्कूटरवरुन आले होते, आणि चोरी केल्यावरही त्याच स्कूटरवरुन पळून गेले. त्यामुळेच लूव्र संग्राहलयाच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लिओनार्डो दा विंची यांची प्रसिद्ध कलाकृती मोनालिसाही याच संग्रहालयात आहेच, शिवाय ऐतिहासिक वारसा सांगणा-या अनेक अमुल्य वस्तू या संग्रहालयात जतन कऱण्यात आल्या आहेत. मात्र चोरी प्रकरणानंतर या वस्तूंच्या सुरक्षेतेबाबतही शंका निर्माण झाल्या आहेत. (International News)
फ्रान्समधील जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयावर दरोडा पडला असून चोरांनी नेपोलियन बोनापार्टच्या संग्रहातून नऊ मौल्यवान दागिने चोरीला नेल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. चार मुखवटा घातलेल्या चोरांनी अवघ्या सात मिनिटांत ऐतिहासिक आणि अमूल्य शाही कलाकृती चोरल्या आहेत. चोरीसाठी हे चोरटे एका स्कूटरवरुन संग्रहालयात आले होते. या लूव्र संग्रहालयात रोज हजारो प्रेक्षक येथील संग्रही वस्तू बघण्यासाठी येतात. मात्र संग्रहालयाच्या काही भागात बांधकाम चालू होते, त्याचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली. ज्या अपोलो गॅलरीमध्ये चोरांनी डल्ला मारला त्याच गॅलरीमध्ये फ्रेंच शाही मुकुट आणि दागिने ठेवले होते. यावरुनच या चोरांनी लूव्र संग्रहालयात चोरीच्या आधी अनेकवेळा फेरफटका मारुन कुठल्या वस्तू चोरायच्या हे निश्चित केल्याचे उघड होत आहे. (Louvre Museum)
फ्रान्समधील पॅरिसमध्ये असलेले लूव्र हे संग्रहालय जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयांपैकी एक आहे. यात चोरी झाल्याची माहिती सर्वप्रथम संस्कृती मंत्री रशिदा दाती यांनी सोशल मिडियावर दिली, आणि अवघ्या देशात खळबळ उडाली. चोर भिंतीवरून चढून संग्रहालयात घुसले आणि डिस्क कटरचा वापर करुन त्यांनी खिडकीचे गज कापले. त्यानंतर त्यांनी नेपोलियन आणि महारानी जोसेफिन यांचे मौल्यवान दागिने चोरले. हे सर्व करण्यासाठी या चार चोरांनी अवघी सात मिनिटे घेतली. त्यामुळेच ही चोरी कशी करायची याची पाहणी करण्यासाठी चोर अनेकवेळ संग्रहालयात आल्याचेही उघड झाले आहे. चोरलेल्या दागिन्यांमध्ये १८५५ मध्ये बनवलेला ऐतिहासिक युजेनी क्राउनचा समावेश आहे. या मुकुटाला हजारो मौल्यवान रत्न मढवण्यात आले आहेत. (International News)

मात्र चोरीच्या नादात या मुकुटाचे काही भाग तुटले असून हे तुकडे पोलिसांनी जप्त केले आहेत. याशिवाय राणी मेरी अमेलीचा मुकुट, राणी मेरी अमेलीचा रत्नांचा हार, राणी मेरीचे अमेलीचेच रत्नजडीत कानातले, राणी युजेनीचा मोठा कॉर्सेट धनुष्य, राणी युजेनीचा मुकुट आणि मेरी-लुईसचा हार आणि कानातले आदींची चोरी झाली आहे. हे दागिने किती किमतीचे आहेत, याची किंमतही आता काढता येणं शक्य नसल्याचे संग्रहालयाच्या अधिका-यांनी सांगितली, एवढे ते अमुल्य आहेत. या सर्व दागिन्यांशिवाय राणी युजेनी मुकुट सर्वात अमुल्य असल्याचे सांगण्यात आले आहे. १८५५ मध्ये नेपोलियनची पत्नी सम्राज्ञी युजेनी डी मोंटिजोसाठी हा मुकुट खास बनवण्यात आला. या मुकुटामध्ये हजारो अमुल्य हिरे आणि पाचू वापण्यात आले आहेत. या चोरीमुळे लुव्र संग्रहालयाच्या अधिका-यांना मोठा धक्का बसला आहे. चोरांना त्यांनी अमुल्य अशा दागिन्यांची मोडतोड करु नका असे भावनिक आवाहनही केले आहे. (Louvre Museum)
=======
हे देखील वाचा :
Donald Trump : ट्रम्पची दुधाची तहान ताकावर !
======
दरम्यान, फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट नुनेझ यांनी या दरोड्याचे वर्णन आत्तापर्यंतचा सर्वाधिक धाडसी दरोडा असे करुन लूव्र संग्रहालच्या संरक्षण यंत्रणेचे तातडीनं परिक्षण करण्याच्या सूचना केल्या आहेत. पॅरिसमधील लूव्र संग्रहालयात जगभरातील सर्वाधिक पर्यटक येथे येतात. लूव्र संग्रहालय सीन नदीच्या उजव्या तीरावर स्थित आहे. संग्रहालयाची इमारत पूर्वी लूव्र राजवाडा होती. लिओनार्डो दा विंचीचे मोना लिसा चित्रकला हे येथे येणा-या प्रेक्षकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. (International News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
