Home » नाना इज बॅक…

नाना इज बॅक…

by Team Gajawaja
0 comment
nana patekar the confession
Share

अभिनेत्री तनुश्री दत्ताने चार वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर आरोप करीत खळबळ उडवली होती.  यानंतर नाना पाटेकर यांनी बॉलिवूडमधून काही काळासाठी विराम घेतला. आता नाना तब्बल चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करीत आहेत.  

‘द कन्फेशन’ या थ्रिलर चित्रपटामध्ये नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असून नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. अनंत नारायण महादेवन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून टीजर रिलीज झाल्यावर नानांच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याचे स्वागत केले आहे.  

टीजरमध्ये नाना पाटेकर एका कोर्टरूममध्ये दिसत असून त्यांच्या मागून आवाज येत आहेत.  

“मैंने सच का चेहरा पहले ही देख लिया है, यहाँ तक कि मैंने उसकी आवाज भी सुनी है। हां, मैं सच जानता हूं लेकिन इसे स्वीकार नहीं कर सकता। मैं इसके लिए अपनी जान देने को तैयार हूं।” हा आवाज ऐकायला मिळतोय.  

नानाच्या चाहत्यांनी या टीजरला लाखो लाईक दिले आहेत.  

तनुश्री दत्ता प्रकरणानंतर नानांनी काही काळ मोठ्या पडद्यावरुन ब्रेक देत स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं होतं.  मात्र अलिकडे काहीकाळ नाना पुन्हा सोशल मिडीयावर ॲक्टीव्ह झाले आहेत. नाना आपल्या बेधडक वक्तव्यांवरुन कायम चर्चेत राहिले आहेत. 

अलिकडे ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुनही नाना यांनी एका कार्यक्रमात आपले मत नोंदविले होते. चित्रपटावरुन आपल्या समाजात विभाजनाची भाषा योग्य नसल्याचे मत नानांनी व्यक्त केले होते. या त्यांच्या मतावरुनही अनेक उलट सुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र त्यानंतर लगेच नाना मोठ्या पडद्यावर पुन्हा येत असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाना पाटेकर यांनी आतापर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. उलट्या काळजाचा खलनायक ते हास्यनायक…. नाना कुठल्याही भूमिकेत फिट बसले आहेत. त्यामुळेच आता ‘द कन्फेशन’ या थ्रिलर चित्रपटात नानांची जादू कशी आहे, याची उत्सुकता लागली आहे.  

‘द कन्फेशन’ हा एनएच स्टूडीयोज, टाइम फिल्म्स, अजय कपूर प्रोडक्शन आणि स्पार्कलिंग स्टूडीयोज यांचा चित्रपट असून  प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहेत. सुभाष काळे, अजय कपूर, प्रवीण शाह आणि नरेंद्र हीरावत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध लेखक सी. पी. सुरेंद्रन यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. 

=====

हे देखील वाचा – शाहरुखानचा ‘डंकी’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

=====

नाना पाटेकर यांनी चार वर्षापूर्वी रजनिकांत यांच्याबरोबर 2018 मध्ये ‘काला’ या चित्रपटात भूमिका केली होती. त्यानंतर ‘हाऊसफूल’ चित्रपटासाठी नानांनी खलनायकाच्या भूमिकेसाठी शूट सुरू केले होते. मात्र त्याचवेळी तनुश्री दत्तानी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर उठलेल्या वादळांनी नाना यांनी शांत रहाणे पसंत केले. 2021 मध्ये नाना टाटा स्काईच्या जाहीरातीमध्ये दिसले. मात्र अन्यवेळी नाना आपल्या समाजकार्यात व्यस्त होते. आता ते पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.