मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रतिभासंपन्न अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नानांनी आपल्या सहज सुंदर जिवंत अभिनयाने मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नायकांपासून ते खलनायकापर्यंत सर्वच प्रकारच्या भूमिका नानांनी अतिशय उत्तम साकारल्या. सध्या नाना पाटेकर खूपच चर्चेत आले आहेत. अभिनयापासून ते सामाजिक कार्यांपर्यंत सर्वच बाबतीत ते कायम अग्रेसर असतात. नानांनी स्थापन केलेल्या ‘नाम’ या फाऊंडेशनला दहा वर्ष पूर्ण झाल्यामुळे या संस्थेचा दशकपूर्ती समारंभी पुण्यात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात पाहुण्यांशी संवाद साधताना नानांनी ते निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यांच्या या निवृत्तीच्या भाषणामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे. (Marathi News)
नानांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले, “मी वयाच्या १३ व्या वर्षापासून काम करतोय. मी आता वयाची पंच्याहत्तरी गाठली आहे. येत्या १ जानेवारीला मी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करेन. त्यामुळे आता काहीतरी वेगळं.. जे आवडते, ते मनापासून करावेसे वाटत आहे.. ते करेन. शेवटी कुठेतरी आपण थांबायचं असतं. त्यानंतर नाटक, चित्रपटांमधून निवृत्त होऊन गावखेड्यातील लोकांसाठी काहीतरी काम करेन. मी नाटक, चित्रपटांमधून 99 टक्के निवृत्ती घेतोय. एखादी छान कलाकृती वाट्याला आली तर ती करीनही. आता नवीन पिढीने या क्षेत्रात येऊन आपली कला दाखवावी. नाम फाऊंडेशनची धुराही आता मकरंदनेच पुढे न्यावी. कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी सोबत असेनच.” (Nana Patekar)
अफाट मेहनत घेऊन नानांनी त्यांची ओळख बनवली. उत्कृष्ट अभिनेते असण्यासोबतच नाना साहित्यप्रेमी, वाचक तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे अभिनेते आहेत. नानांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली आहे. मातीशी नाळ जोडलेला ‘आपला माणूस’ अशी नानांची ओळख आहे. आज नाना पाटेकर हे अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत. सगळ्यांनाच ते माहित आहे. मात्र त्यांचा प्रवास हा अजिबातच सोपा आणि सहज नव्हता. (Bollywood life)
नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी मुरुड-जंजीरा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. त्यामुळे कलेचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालं आहे. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स या महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. महाविद्यालयात असताना चित्रकलेसोबतच त्यांना रंगभूमीची आवड निर्माण झाली. (Entertainment News)
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नानांनी वयाच्या १३ व्या वर्षीची काम करायला सुरुवात केली होती. नाना पाटेकर शाळेनंतर आठ किलोमीटर पायपीट करून चुन्याच्या भट्टीत काम करायचे. दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून तिथे ते चित्रपटाची पोस्टर्स रंगवत असत.आज ते ज्या स्थानावर आहेत तिथपर्यंत पोहचण्यासाठी नानांना खूप संघर्ष करावा लागला. (Top Marathi Headline)
नाना पाटेकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात गमन या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट १९७८ मध्ये प्रदर्शित झाला, त्यानंतर नानांनी मागे वळून पाहिले नाही. ४ दशकांच्या आपल्या मोठ्या चित्रपट कारकिर्दीत नाना पाटेकर यांनी प्रत्येक प्रकारची भूमिका साकारली. कॉमेडीपासून ते अॅक्शनपर्यंत आणि रोमान्सपासून नकारात्मक पात्रांपर्यंत, नानांनी प्रत्येक भूमिका अक्षरशः जगली. नानांच्या संवादांना, त्यांच्या स्टाईलला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. अनिल कपूर, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर यांच्या ‘परिंदा’ या चित्रपटासाठी नानांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. (Todays Marathi HEadline)
करिअरमध्ये नानांनी गंभीर, ऍक्शन, रोमान्स, खलनायक आदी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. नानाच्या या भूमिका पाहून त्यांना त्याच त्याच प्रकारच्या भूमिका येत होत्या. मात्र पण २००७ साली ‘वेलकम’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी विनोदी भूमिकादेखील तितक्याच ताकदीने आणि प्रभावी पद्धतीने साकारली. नानांना आतापर्यंत चारवेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Latest Marathi Headline)
मराठीमध्ये देखील नानांनी अनेक उत्तम चित्रपट केले आणि त्यांचे सिनेमे गाजले देखील. नानांनी ‘हमिदाबाईची कोठी’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. ‘माफीचा साक्षीदार’ हा त्यांचा सिनेमा प्रचंड गाजला. सिंहासन, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे, आपला माणूस, नटसम्राट असे त्यांचे अनेक मराठी सिनेमे गाजले आहेत. नानांच्या नाम फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील दुष्काळी भागांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली जात आहे. नानांचे व्यावसायिक आयुष्य खूपच यशस्वी झाले आणि गाजले देखील. (Top Marathi News )
मात्र नानांचे वैयक्तिक आयुष्य तसे ठीक नव्हते. नानांनी अभिनेत्री नीलकांती यांच्यासोबत लग्न झाले. नीलकांती या ब्राह्मण तर नाना मराठा होत्या. लग्नाच्या वेळी नानांना महिन्याला साडे सातशे रुपये पैसे मिळायचे, तर नीलकांती या एका बँकेत नोकरीला होत्या, त्यांना त्याकाळात दरमहा अडीच हजार रुपये पगार होता. नीलकांती यांनी नानांना सांगितले की, ”तुला जे काम करायचे ते कर मी घर सांभाळेल”. नीलकांती यांच्यामुळेच आज नाना यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. नाना आणि नीलकांती यांना एक मुलगा असून त्याचे नाव मल्हार पाटेकर आहे. मल्हारच्या जन्मापूर्वी नाना आणि नीलकांती यांना एक मुलगा झाला होता. पण जन्मानंतर काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. नाना यांचे वैवाहिक आयुष्य फारसे आनंदी राहिले नाही. ते त्यांच्या पत्नीपासून विभक्त राहतात. मात्र त्यांचा घटस्फोट झालेला नाही. (Latest Marathi News)
नानाच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर, नाना यांच्या मुंबईत असलेल्या घराची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. नाना पाटेकर यांच्याकडे महिंद्रा जीप CJ4, ऑडी Q7 आणि महिंद्रा स्कॉर्पियो देखील आहे. भरपूर संपत्ती असूनही नाना पाटेकर यांना अतिशय साधं जीवन जगायला आवडतं. (Top Trending News)
========
Kulman Ghisingh : नेपाळचा इलेक्ट्रीक मॅन !
Nepal : सुशीला कार्कींचे पती भारताच्या तुरुंगात का होते ?
========
एका माहितीनुसार, नाना पाटेकर ५५ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. नाना पाटेकर एक सिनेमासाठी २-३ कोटी रुपये मानधन घेतात. तर एका जाहिरातीसाठी नाना पाटेककर १ कोटी रुपये मानधन घेतात. एवढंच नाही तर, सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये देखील नाना पाटेकर यांचा वाटा असतो. त्यांचे महिन्याला उत्पन्न जवळपास ५० लाख रुपये आहे. वर्षाला नाना पाटेकर ६ कोटी रुपये कमावतात . (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics