मंदिरात लोक प्रसाद म्हणून मिठाई, फळ किंवा आणखी काही अर्पण करतात. तसेच मनापासून देवासमोर इच्छा व्यक्त केली ती पूर्ण होतेच असे प्रत्येकजण मानतात. त्यामुळे मंदिरात पूर्ण श्रद्धेने देवाचे दर्शन घेण्यसाठी भाविक फार मोठी गर्दी करतात. भारतात अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांचा इतिहास किंवा एखादा चमत्काराचा महिमा आपण ऐकला असेल. पण नालंदामधील एक मंदिर आहे तेथे भाविक प्रसाद म्हणून चक्क लंगोट अर्पण केले जाते. हे भारतातील एकमेव अनोखे मंदिर आहे, जेथे लंगोट अर्पण केले जाते. खरंतर हे मंदिर नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथील बाबा मणिराम आखाडाच्या येथे आहे. (Nalanda Temple)
येथे प्रत्येक वर्षी आषाढ पौर्णिमेला सात दिवसांच्या जत्रेचे आयोजन केले जाते. याची सुरुवात सध्या झाली आहे. याच निमित्त येथील मंडळी मणिराम अखाडा येथे लंगोट अर्पण करत जिल्ह्यातील सुख-शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. येथे बिहारमधीलच नव्हे तर काही राज्यातील भाविक सुद्धा बाबांच्या समाधीवर लंगोट अर्पण करण्यास येतात.
पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या परंपरेनुसार पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी सर्वात प्रथम बाबांच्या समाधीवर लंगोट अर्पण करतात. तर महिला रुमाल अर्पण करतात. याच सोबत जत्रेची सुरुवात हेते. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर यंदा शहरात मोठ्या उत्साहात लंगोट यात्रा काढण्यात आली नाही.
बाबा मणिराम यांचे येथे आगमन १२३९ ई. मध्ये झाले होते. ते अयोध्येतून येथे आले होते. बाबांनी शहरातील दक्षिणेला असलेल्या पंचाने नदीच्या पिस्ता घाटाला आपल्या पूजेचे स्थळ बनवले. सध्या हे स्थळ अखाड़ा नावाने प्रसिद्ध आहे. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आणि क्षेत्राच्या शांतीसाठी बाबा घनदाट जंगलात राहून देवी भगवती हिची पूजा करायचे. लोकांना कुस्ती सुद्धा शिकवायचे. (Nalanda Temple)
तर ६ जुलै १९५२ मध्ये बाबांच्या समाधीच्या येथे लंगोट जत्रेचे आयोजन सुरु करण्यात आले. याआधी रामनवमीच्या दिवशी सुद्धा भाविक बाबांच्या समाधीवर पूजा-अर्चना करण्यासाठी यायचे. तेव्हा पासून प्रत्येक आषाढ पौर्णिमेच्या दिवशीपासून ते पुढील सात दिवस ही जत्रा असते. असे म्हटले जाते की, कपिलदेव बाबू जे नालंदाचे प्रोडक्ट निरीक्षक आहेत त्यांना पाच मुली होत्या. मात्र बाबांच्या कृपेमुळे त्यांना पुत्ररत्न झाला.
हेही वाचा- उत्तराखंडातील गोपीनाथ मंदिर झुकल्यानं खळबळ…
ऐवढे नव्हे तर बाबांच्या दरबारात आलेला व्यक्ती कधीच रिकाम्या हाती परत गेलेला नाही. मनापासून मागितलेली इच्छा प्रत्येकाची पूर्ण होतेच. बाबा मणिराम आणि मखदूम साहब यांच्यात मैत्री होती. त्यामुळेच बिहार शरीफला सूफ़म संतांची नगरी असे सुद्धा म्हटले जाते. बाबा मणिराम आणि महान सूफी संत मखदूम साहब यांच्यामध्ये खुप सखोल मैत्री होती.