Nail care tips : प्रत्येक महिला आपले सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. अशातच सध्या बहुतांश महिला नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मेनिक्युअर करतात. यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागतात. पण नखांचे घरच्याघरी सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता. याचा नक्की वापर कसा करायचा याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
नखांसाठी फायदेशीर अॅप्पल सायडर व्हिनेगर
अॅप्पल सायडर व्हिनेदरमध्ये काही गुणधर्म असतात, जे नखांसाठी फायदेशीर असतात. अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अॅसिटिक आणि मॅलिक अॅसिड असते. यामुळे नखांची चमक वाढली जाते. याशिवाय अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुण असल्याने नखांना कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन दूर राहण्यास मदत होते.
अशाप्रकारे करा वापर
विधी-1
-एका वाटीत दोन चमचे व्हिनेगर घ्या
-व्हिनेगर नखांवर पाच मिनिटे राहू द्या
-यानंतर नखांना मसाज करा
-आठवड्यातून दोनदा नखांना अॅप्पल सायडर व्हिनेगरने मसाज करा (Nail care tips)
विधी-2
-एका ग्लासात पाणी घ्या
-पाण्यामध्ये दोन चमचे व्हिनेगर टाका
-आता एक चमचा ग्लिसरिन टाका
-मिश्रण नखांना पाच मिनिटे लावून ठेवा
-नखांना हलक्या हाताने मसाज करा
-हा उपाय आठवड्यातून तीनवेळा करा