Home » पार्लरमध्ये मॅनिक्युअर करता? त्वचेसंबंधित उद्भवू शकतात ‘या’ समस्या

पार्लरमध्ये मॅनिक्युअर करता? त्वचेसंबंधित उद्भवू शकतात ‘या’ समस्या

पार्लरमध्ये जाऊन बहुतांशजणांना मॅनिक्युअर करणे आवडते. यामुळे आराम मिळतो पण यामुळे काही नुकसानही होते.

by Team Gajawaja
0 comment
Nail Care Tips
Share

Nail Care Tips : आजकाल धावपळीच्या आयुष्यात स्वत:कडे अधिक लक्ष देण्यास प्रत्येकाला फारसा वेळ नसतो. अशातच बहुतांशजण पार्लरमध्ये जाऊन आपल्या सौंदर्य उजवळण्यासाठीच्या विविध ट्रिटमेंट करतात. त्यापैकीच एक म्हणजे मॅनिक्युअर करणे. महिन्यातून एकदा मॅनिक्युअर केल्याने आराम मिळतो. पण याचे काही तोटेही होतात. एलर्जिक रिअॅक्शन ते त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवू शकतात.

मॅनिक्योअरमुळे नक्कीच हातांचे सौंदर्य वाढले जाते. पण यासोबत काही समस्याही उद्भवतात. मॅनिक्योअरसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे नुकसान होऊ शकते. यामधील सर्वसमान्य बाब म्हणजे स्किन अॅलर्जी होणे. यामुळे फार मोठे नुकसान होत नाही. पण काहींना स्किन अॅलर्जीमुळे भयंकर त्रासही होते. अशातच तुम्हीही पार्लरमध्ये मॅनिक्युअर करत असाल तर आधी ही माहिती नक्की वाचा.

त्वचेवर जळजवळ होणे
मॅनिक्युअरसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी खासकरून नेल पॉलिश, नेल पॉलिश रिमूव्हर किंवा क्युटिकल ऑइल तयार करण्यासाठी हानिकारक केमिकल्सचा वापर केला जातो. यामधील केमिकल्स त्वचेवर जळजवळ निर्माण करतात. नखांजवळ कापले गेले असल्यास हे केमिकल त्वचेच्या आतमध्ये गेल्यास नुकसान होऊ शकते.

एलर्जिक रिअॅक्शन
काही लोकांना केमिकलची अॅलर्जी असते. अशातच मॅनिक्युअर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. अन्यथा काहींना एलर्जिक रिअॅक्शन होऊ शकते.

नखांचे नुकसान
मॅनिक्युअरवेळी नखांना नुकसान पोहोचले जाऊ शकते. यावेळी नखांना फाइल केले जाते. यामुळे नख पातळ होऊन लवकरच तुटण्याची शक्यता वाढली जाते. (Nail Care Tips)

मॅनिक्युअरच्या दुष्परिणामांपासून असे राहा दूर
-एका उत्तम आणि प्रतिष्ठित पार्लरमधूनच मॅनिक्युअर करावे.
-मॅनिक्युअर करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य स्वच्छ आहे की नाही हे तपासून घ्यावे.
-तुमची त्वचा संवेदनशील असल्यास त्याबद्दल आधीच पार्लरमध्ये सांगावे.
-मॅनिक्युअर करण्यासाठी एका उत्तम प्रतिचे प्रोडक्ट्स वापरले जातायत का हे पाहावे.

(अशाच लाइफस्टाइलसंबंधितच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

आणखी वाचा :
उन्हाळ्यात पायांना भेगा पडतायत? करा हे घरगुती उपाय
केसांना ग्लिसरिन लावता का? जाणून घ्या तोटे
चेहऱ्यावरील हायपिग्मेंटेशनच्या समस्येवर करा ‘हा’ उपाय, उजळेल त्वचा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.