तारीख २२ नोव्हेंबर २०२३, नायगांव जवळ असणाऱ्या मुंबई अहमदाबाद हायवेवरुन जाणाऱ्या दोन प्रवाशांना रस्त्यात अचानक लघवी लागली. ते करण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. हायवेच्या आजूबाजूला मोकळं शेतं असल्याने ते शेताच्या झुडपात लघवी करण्यासाठी गेले. तेव्हा त्या दोघांना कुजलेला वास येतं होता. त्यांनी खाली बघितलं तर ते जिथे उभे होते बरोबर त्यांच्या समोर एक कुजलेला मृतदेह पडला होता, मृतदेहाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना त्या मृतदेहाची ओळख पटेल असा एकही पुरावा सापडत नव्हता. शेवटी या मृतदेहाच्या मृत्यूचा खुलासा एका दारू पिणाऱ्या माणसांमुळे झाला. नेमका कसा जाणून घेऊया. (Naigaon Murder Case)
हायवेला थांबलेले ते दोघ प्रवासी मृतदेहाची अवस्था पाहून घाबरतात आणि ताबडतोब नायगांव पोलिस स्टेशनमध्ये फोन करून पोलिसांना ही माहिती देतात. तोपर्यंत आजूबाजूचे आणखी काही लोक जमतात. मृतदेहची अवस्था बघून तो काही दिवस जुना असावा, हे कळतं. काही वेळातच पोलिसांची गाडीही घटनास्थळी पोहोचते आणि पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवला जातो. सुरुवातीला पोलिसांना ही अॅक्सिडेंटची केस वाटते म्हणून ते अपघाताच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करतात. (Crime News)
पोस्टमार्टम रीपोर्ट आल्यानंतर हा अपघात नसून खुनाचा प्रकार असल्याचं पोलिसांच्या लक्षात येतं. मृत व्यक्ती २५ ते ३० वर्षांचा असून त्याच्या डोक्यात मोठा दगड खालून त्याची हत्या केली आहे हे उघड होतं. हत्या कशी याचा शोध पोलिसांना तर लागला पण हत्या कोणाची झाली? हा मृत व्यक्ती कोण आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिस पुन्हा घटना स्थळी जातात आणि पूर्ण जागेचा बारकाईने शोध घेतात. पण तरीही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही. शेवटी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे कपडे आणि चप्पलांचे फोटो जवळच्या पोलिस ठाण्यात पाठवले जातात. (Naigaon Murder Case)
या फोटोसमुळे या मृत व्यक्तिचं नाव लवेश माळी आहे हे समजतं. लवेश हा रिक्षा चालक होता जो नायगांव परिसरात रिक्षा चालवायचा. तो खूप दिवस गायब असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिस लवेशच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू करतात. मात्र, पोलिसांकडे कोणाताही असा पुरावा नव्हता ज्याच्यामुळे हे कळू शकेल की, ही हत्या कोणी केली होती. घरच्यांच्या आणि इतर ठिकाणी चौकशी केली असता लवेश अनेकदा दारूपिण्यासाठी वेगवेगळ्या पण ठराविक ठिकाणी जात असल्याच समोर येतं. पोलिस आपल्या खबरींना त्या ठिकाणी लक्ष ठेवायला सांगतात. (Crime News)
अचानक एक दिवस एक खबरी पोलिस स्टेशनमध्ये येतो आणि लवेश हत्या प्रकरणात पुरावा मिळाल्याचं पोलिसांना सांगतो. हा खबरी ज्या ठिकाणी शोध घेण्यासाठी जात होता. तिथे एक माणूस रोज दारू प्यायला यायचा आणि दारू पिऊन झाल्यानंतर बाहेर जाऊन ओरडायचा “मला वाचवा ते मलाही ठार मारतील” आणि तिथेच बेशुद्ध होऊन झोपून जायचा. दारू पिऊन बडबडणाऱ्या माणसाला जसं सगळेच इगनोर करत असतात. तसं त्या माणसालाही केलं जायचं. पण त्याच्या बोलण्यावरुन त्याला कोणीतरी मारणार आहे अशी बडबड तो करत असतो. म्हणून पोलिस त्याला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये घेऊन येतात. त्याला विचारलं जातं की, तुला कोण मारणार आहे आणि तू असं का ओरडत असतो? त्याच्या उत्तरातून लवेशच्या हत्येच गूढ सुद्धा उलगडतं. त्या माणसाने लवेशची हत्या होताना पहिलं होतं आणि त्या रात्रीपासून त्याला वाईट स्वप्नं पडत होती. लवेशला ठार करणारे आपल्याला सुध्दा ठार करतील अशी भीती त्याला वाटत होती. त्याच्या सांगण्यानुसार ही हत्या करणाऱ्या दोन आरोपींना त्या अटक करण्यात येते. (Naigaon Murder Case)
======
हे देखील वाचा : अंत्यसंस्कार झाले होते आणि तो जीवंत फिरत होता !
======
चौकशीत या दोघांनी या हत्येत एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याच सांगतात अगदीच किरकोळ कारणावरून हा खून झाला. ही तिघ आरोपी आणि लवेश मित्र होते. या तिघांपैकी एका आरोपीसाठी लवेश भाड्याने रिक्षा चालवत होता. काही दिवसांआधी लवेशने रिक्षाने एका डंपरला धडक दिली होती. त्यामुळे रिक्षाच नुकसान झालं. पण हे नुकसान भरून द्यायला लवेशने नकार दिला. त्यादिवशी या चौघांनी मिळून नशा केली आणि मग त्या तिघांनी मिळून लवेशच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवलं. तिथे एक जण अजून हे सर्व पाहतोय हे त्यांना माहिती नव्हतं. पण त्या माणसाने सुद्धा घाबरून न जाता सरळ घटनेनंतर पोलिसांना सांगायला हवं होतं. (Crime News)