उद्या श्रावणातला पहिला सण म्हणून ओळख असलेली नागपंचमी साजरी होणार आहे. श्रावणातल्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागांची पूजा करून त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवैद्य अर्पण केला जातो. श्रावण हा शंकरांना समर्पित असलेला महिना असून, याच महिन्यात साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीला विशेष महत्व असते, कारण नाग हा महादेवाचा गण म्हणून ओळखला जातो. महादेवांचे रूप इतर देवतांपेक्षा वेगळे आहे. त्यांच्या गळ्यात नाग, केसात गंगा, डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशूल-डमरू आहे. हे सगळे शिवशंकरांचे प्रतीक मानले जातात. महादेवांच्या गळ्यातील नाग ही त्यांची खास ओळख देखील समजली जाते. मात्र महादेवांच्या गळ्यात नाग का असतो? का शंकरांनी नाग धारण केला आहे? श्वाच्या गळ्यातील नागाचे नाव काय? त्यांची माहिती या सर्व प्रश्नांची माहिती उद्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया. (Nagpanchami news)
पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी हे भगवान शिव यांचे परमभक्त होते. नागराज वासुकी हे नेहमी शिवशंकरांची पूजा करण्यात व्यस्त राहायचे. पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी यांनी समुद्रमंथनाच्या वेळी दोरीचे काम केले होते. नागराजाची भक्ती पाहून भोलनाथ प्रसन्न झाले होते. भगवान शिवाने वासुकीला नागलोकाचा राजा बनवले आणि वासुकीला आपल्या गळ्यात दागिन्याप्रमाणे कायम ठेवण्याचे वरदान दिले. यानंतर नागराज वासुकी अमर झाले. (Todays Marathi Headline)
पौराणिक माहितीनुसार नागकुळातील सर्व साप भगवान शिवाचे वास्तव असलेल्या हिमालयातच राहत होते. भगवान शिवाचेही नागवंशीयांवर खूप प्रेम होते. सुरुवातीला सापांची पाच कुळं होती. ज्यात शेषनाग, वासुकी, तक्षक, पिंगला आणि कर्कोटक यांचा समावेश होता. सापांच्या या पाच कुळांना देवांच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते. यापैकी शेषनाग हा सापांचा पहिला राजा समजला जातो, त्याला अनंत या नावानेही ओळखले जाते. पुढे, शेषनागानंतर, वासुकी नागांचा राजा बनला. हा वासुकी भगवान शिवाचा सेवक देखील होता. (Top Marathi HEadline)
वासुकी नागाचे वडील ऋषी कश्यप आणि आई कद्रू होती. वासुकी नागाच्या मोठ्या भावाचे नाव शेष अर्थात अनंत आणि इतर भावांचे नाव तक्षक, पिंगळा आणि कर्कोटक होते. शेषनाग हे विष्णूचे सेवादार होते तर वासुकी भगवान शिवाचे सेवादार होते. वासुकी महादेवाचे मोठे भक्त होते. वासुकीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान महादेवाने त्यांना आपल्या गणात समाविष्ट केले होते. अशी आख्यायिका आहे की वासुकीचे कैलास पर्वताजवळ राज्य होते. वासुकीला नागलोकाचा राजा मानला गेला आहे. भगवान शिवासह वासुकी नागाची पूजा देखील केली जाते. म्हणून नागपंचमीला शेषनागाच्या नंतर वासुकी नागाची पूजा करणे शुभ मानले जाते. (Marathi Latest News)
समुद्र मंथनाच्या दरम्यान वासुकी नागालाच दोऱ्याच्या रूपात मेरू पर्वताच्या अवती भवति गुंडाळून मंथन केले गेले, या मुळे त्यांचा संपूर्ण शरीरातून रक्तस्त्राव झाला. असे मानले जाते की वासुकीच्या याच कामामुळे नाग समुदायातील सर्व लोकांनी सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली. शिवाय धार्मिक कथेनुसार वासुकी नागानेच कुंतीपुत्र भीमाला दहा सहस्र हत्तीचे बळ प्राप्त करण्याचे वर दिले होते. जेव्हा भीमाला दुर्योधनाने फसवून विष पाजून गंगेत फेकून दिले तेव्हा भीम नागलोकात पोहोचला. तेथे भीमाच्या आजोबांनी वासुकीला भीमाबद्दल सांगितले. तेव्हा वासुकी नागाने भीमाचे विष काढून घेतले आणि त्याला दहा सहस्र हत्तीचे बळ दिले. (Top Stories)
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावणात होणाऱ्या मंगळागौरीच्या व्रताची माहिती
=========
वासुकीच्या डोक्यावरच नागमणी असल्याचे सांगितले जाते. जेव्हा भगवान श्रीकृष्णाला कंसाच्या तुरुंगातून वासुदेव गोकुळात नेत होते तेव्हा जोरदार पाऊस सुरू होता. या पावसापासून आणि यमुनेच्या पुरापासून वासुकी नागानेच श्रीकृष्णाचे रक्षण केले होते. मात्र काही लोकं हे कार्य शेषनागाने केले असल्याचे सांगतात. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics