श्रावण महिना सुरु झाला असून, लवकरच श्रावणातला पहिला सण नागपंचमी आपण साजरी करणार आहोत. महादेव आणि नागांना समर्पित असणारी ही नागपंचमी म्हणजे हिंदू लोकांसाठी खास दिवस असतो. यादिवशी नागांची पूजा केली जाते, त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांची आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातल्या लोकंच्या निरोगी आणि उत्तम जीवनासाठी प्रार्थना केली जाते. नागपंचमीच्या पूजा केल्याने नागांबद्दलची भीती दूर होते, कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, पितृदोष नाहीसा होतो, घरात आनंद आणि आर्थिक सुबत्ता येते. नागपंचमीच्या दिवशी केवळ नागांच्या प्रतिमेची, वारुळाची पूजा करतात असे नाही तर भारतात नागांची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत, जिथे जाऊन देखील भाविक नागपंचमी साजरी करतात. जाणून घेऊया भारतातील याच प्रसिद्ध मंदिरांबद्दल. (Marathi NEws)
नागचंद्रेश्वर मंदिर, उज्जैन
उज्जैनमधील महाकाल मंदिरात नाग देवतांचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. जे संपूर्ण वर्षभरात केवळ नागपंचमीच्याच दिवशी उघडले जाते. हिंदू मान्यतेनुसार, या मंदिरात तक्षक नाग विराजमान आहे. महाकाल यांच्या मंदिरात नागचंद्रेश्वर यांचे दर्शन तिसऱ्या मजल्यावर घेता येते. येथे नाग देवता भगवान शंकरांच्या गळ्याभोवती बसलेले आहेत. (Todays Marathi HEadline)
मन्नारशाला नाग मंदिर, अलेप्पी (केरळ)
केरळमधील अलेप्पी जिल्ह्याजवळ असलेले मन्नारशाला नाग मंदिर हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. हे मंदिर नागांचा राजा भगवान नागराज याला समर्पित करण्यात आले आहे. या मंदिराच्या परिसरात जवळजवळ ३० हजार दगडांवर सापांच्या मुर्त्या आणि चित्र आहेत. येथे नागराज आणि नागयक्षी यांच्या मूर्तीही आहेत. या मंदिरातील पूजाअर्चा फक्त नम्बूदिरी ब्राह्मण कुटुंबातील लोकच करतात. काही मान्यतेनुसार, या कुटुंबातीलच एका स्त्रीच्या गर्भातून नागराज जन्माला आले होते. (Social NEws)
पटनीटॉप नाग मंदिर, जम्मू
नाग देवतेचे जवळपास आठ दशक जुने असे मंदिर जम्मूमधील पटनीटॉप येथे आहे. हिंदू मान्यतेनुसार, या नाग मंदिरात नाग देवतेची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व कष्ट दूर होत इच्छा पूर्ण होतात. यामुळेच नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात दर्शनासाठी फार मोठी गर्दी होते. मंदिरासंदर्भात मान्यता अशीही आहे की, येथे इच्छाधारी नाग देवतांनी ब्रम्हचारी रुपात कठीण तप केला होता. यानंतर पिंडीचे रुप धारण केले होते. तेव्हापासून पटनीटॉपमधील नाग मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. (Top Marathi Stories)
धौलीनाग मंदिर, उत्तराखंड
धौलीनाग मंदिर उत्तराखंड येथील बागेश्वर येथे आहे. या मंदिराचा संबंध कालिया नागाशी आहे. हिंदू मान्यतेनुसार, धौलीनाग कालिया नागाचा सर्वाधिक मोठा पुत्र आहे. धौली नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. स्थानिकांच्या मते, धौलीनागाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख आणि कष्टांचे निवारण होते. (Marathi Trending NEws)
कुक्के सुब्रमण्य मंदिर, कर्नाटक
कुक्के सुब्रमण्य मंदिराची मुख्य देवता भगवान सुब्रमण्यम, भगवान वासुकी आणि शेषनाग देवता आहे. हे मंदिर सुरम्य कुमार पर्वताच्या शिखरावर असून, कुमारधारा नदीने वेढलेले आहे. येथील मान्यता अशी आहे की, वासुकी आणि अन्य सापांनी सुब्रमण्यमच्या गुफांमध्ये शरणागती पत्करली होती. असे ही मानले जाते की. मंदिरात गेल्याने सर्प दोष ही दूर होतो. (Marathi Latest News)
त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मुख्य ज्योतिर्लिंग मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे वेगळे नागमंदिर नसले तरीही ‘नारायण नागबली’ची पूजा येथे केली जाते. कदाचित संपूर्ण भारतामध्ये ही पूजा त्रंबक येथेच केले जाते. जी कालसर्प दोष निवारणासाठी ही पूजा प्रसिद्ध आहे. येथे विधिवत पूजा करून नाग-नागिणीचे जोडपे नदीत सोडल्यास कालसर्प योग दूर होतो, अशी श्रद्धा आहे. तसेच येथे त्रिपिंडी श्राद्ध आणि कालसर्प दोष निवारणासाठी अनेक भाविक दरवर्षी गर्दी करतात. (Top Marathi Headline)
वासुकी नाग मंदिर, प्रयागराज
प्रयागराजच्या संगमाजवळील दारागंज भागात असलेले वासुकी नाग मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. या नागदेवतेला शेषनाग, अनंत, सर्पनाथ आणि सर्वाध्यक्ष अशा विविध नावांनी ओळखले जाते. शिवाच्या गळ्यात वासुकी नाग वास करत असल्याची धार्मिक मान्यता आहे. येथे पूजा केल्याने कालसर्प दोष दूर होतो, असे मानले जाते. त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी संपूर्ण भारतातून भाविक येतात. (Top Stories)
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?
Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’
=========
भुजंग नागा मंदिर, गुजरात
भुजिया किला गुजरातमध्ये भुजच्या बाहेरच्या परिसरात उभारण्यात आले आहे. लोककथांच्या नुसार, हा किल्ला शेवटच्या नागा वंशाच्या भुजंगाला समर्पित आहे. जे युद्धात मारले गेले. त्यानंतर, स्थानिक लोकांनी त्यांच्या स्मरणार्थ भुजिया टेकडीवर एक मंदिर बांधले, ज्याला भुजंग नागा मंदिर म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी नागपंचमीला मंदिराभोवती जत्रा भरते. सध्या हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात असून त्याचा वापर दारूगोळा साठवण्यासाठी केला जातो. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics