जगात काही ठिकाणी अशी आहेत जी फारच सुंदर आहेत. परंतु अशी ही काही ठिकाणं आहेत जेथे जाण्यास लोक घाबरतात. तेथील दंतकथा, तेथील लोककथा ऐकूनच लोक पळ काढतात. त्याचपैकी एक असलेले जापान मधील एका गावात माणसं नव्हे तर चक्क पुतळे राहतात. हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. येथे संपूर्ण गाव हे पुतळ्यांनीच भरले गेले आहे. (Nagore Village)
शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांऐवजी त्यांचे पुतळे तुम्हाला दिसतात. येथे शिकवणारे शिक्षक ही बिजूका म्हणजेच पुतळेच दिसतात. जापानच्या या गावाचे नाव नागोरे असे आहे.
तंत्रज्ञानाच्या जोरावर सध्या जग वेगाने पुढे जात आहे. पण या गावातील लोक मात्र विलुप्त झाली आहेत. जवळजवळ संपूर्ण गावच ओसाड पडलं आहे. गावात केवळ वृद्ध व्यक्तीच राहतात. तरुणांच्या संख्येत घट झाल्याने गावात १८ वर्षांपासून एकाही नवजात मुलाने जन्म घेतलेला नाही. असे सांगितले जाते की, एक काळ असा होता जेव्हा गावाची लोकसंख्या ३०० होती. पण काळानुसार ती घटत गेली. गावातील जापानी पुतळ्यांना ‘आदमकद बाहुले’ म्हणजेच बिजुका असे म्हटले जाते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, माणसांशिवाय ओसाड पडलेल्या गावात पुतळे कसे आले? खरंतर या गावात राहणाऱ्या एका महिलेने गावाला पुतळ्यांच्या गावाचे रुप दिले. गावात राहणारी अयानो सुकिमी हिने तिला आवड म्हणून गावासाठी आपल्या वडिलांच्या कपड्यांपासून एक पुतळा तयार केला. त्यानंतर अयानो सुकिमीने यालाच आपले लक्ष्य केले.मुलं होत नसल्याने गावातील शाळा बंद झाल्या होत्या. अशातच शाळेतील बाकावर मुलांऐवजी पुतळे बसवले गेले. पुतळे तयार करण्यासाठी लाकडापासून त्याचा सांगाडा तयार केला जातो. त्यानंतर न्युजपेपरचा वापर करुन संपूर्ण शरिर तयार केले जाते. त्यानंतर इस्लास्टिकचा वापर करुन स्किन तयार केली जाते आणि लोकरीपासून केस तयार होतात. पुतळे हे एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसण्यासाठी ती गाल आणि ओठांना गुलाबी रंग सुद्धा देते. (Nagore Village)
हेही वाचा- जवळपास सव्वाशे वर्ष जुनी असलेली पाकिस्तानातील बॉम्बे बेकरी!
खास गोष्ट अशी की, हे गाव पाहण्यासाठी दूरदूरवरुन लोक येतात. ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी येथे एक खास सण ही साजरा केला जातो.त्यावेळी पुतळ्यांना पाहण्यासाठी लोक येतात.जर्मन फिल्म मेकर फ्रिट्स शूमन याने २०१४ मध्ये या गावावर एक डॉक्युमेंट्री फिल्म सुद्धा शुट केली होती. त्यानंतरच या गावाला पुतळ्यांचे गाव म्हटले जाऊ लागले.