श्रावणातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी होणारी नाग पंचमी देशातील विविध राज्यांमध्ये मोठ्या भक्ती आणि श्रद्धेने साजरी केली जाते. यावेळी नाग पंचमी २९ जुलै २०२५ रोजी अर्थात आज साजरी होत आहे. या दिवशी नाग देवाची पूजा करण्याची परंपरा आहे. महादेवांना समर्पित असलेल्या श्रावण महिन्यात येणारी नागपंचमी खास असते.नागाला महादेवाचा गण म्हणून ओळख असून, नागपंचमीला याच नागाची मनोभावे पूजा करून कुटुंबाच्या उत्तम सुखासाठी आणि आरोग्यासाठी त्याला प्रार्थना केली जाते. नागपंचमी पूजा करताना नागाची प्रतिमा ठेवली जाते. (Marathi News)
काही ठिकाणी रांगोळीने नाग बनवला जातो तर काही ठिकाणी नागाचे वारूळ बनवून त्याची देखील पूजा केली जाते. मंत्र भारतामध्ये नागांची काही मोजकी मंत्र अतिशय अलौकिक मंदिरं आहेत. ज्यांना जाज्वल्य इतिहास आहे. या मंदिरांमध्ये जाऊन देखील नागोबाला पुजले जाते. यातलेच एक प्रसिद्ध आणि मोठे मंदिर म्हणजे केरळ राज्यातील मन्नारसा मंदिर. या मंदिरामध्ये एक लाखाहून अधिक नाग अन् सापांच्या मूर्त्या आहेत. आज नागपंचमीच्या निमित्ताने आपण याच मंदिराबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया. (Nagpanchami News)
केरळ राज्यातील आलापुज्हा (अलेप्पी) शहरापासून ३७ किलोमीटरवर स्थित आहे हे मन्नारसा मंदिर. या मंदिराला मन्नारशाला नाग मंदिर असे म्हटले जाते. या मंदिराची खासियत अशी की, येथे हजारो नागांच्या मुर्ती आहेत. ‘मन्नार टेम्पल’ म्हणून ओळखले जाणारे मंदिर आहे. येथील मंदिराला ‘श्रीनागराज मंदिर’ असे मूळ नाव आहे. परशुरामांनी हे स्थान निर्माण केल्याचे सांगितले जाते व या ठिकाणी नागराजाने त्यांना आशीर्वाद दिल्याचीही कथा सांगितली जाते. सामान्यपणे आपण जे मंदिरं बघतो तिथे एक किंवा दोन फार फार तर चार, पाच देवाच्या मूर्ती असतात. मात्र या मंदिरामध्ये नागांच्या किंवा सापांच्या ३० हजारांपेक्षा जास्त मुर्त्या आहेत. हे मंदिर १६ एकरपेक्षा अधिक जमिनीवर विस्तारलेले आहे. या मंदिरात नागपंचमीच्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. येथे मुख्य नागदेवता नागराज आणि नागयक्षी आहे. (Todays Marathi HEadline)
या मंदिराबद्दल एक आख्यायिका देखील सांगितली जाते. त्यानुसार भगवान परशुरामांनी केरळची भूमी ब्राह्मणांना दान केल्याच्या कथा आहेत. परंतु येथे अनेक विषारी साप होते ज्यामुळे लोकांचे राहणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत त्यांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली. यानंतर, भगवान शिव यांनी परशुरामांना सापांचा राजा नागराजची पूजा करण्याचा सल्ला दिला जेणेकरून सापांचे विष मातीत पसरेल आणि ती सुपीक होईल. यानंतर, भगवान शिव यांनी परशुरामांना सापांचा राजा नागराजची पूजा करण्याचा सल्ला दिला जेणेकरून सापांचे विष मातीत पसरेल आणि ती सुपीक होईल. (Marathi Trending News)
परशुरामांनी मन्नारसाला येथे नागराजाची मूर्ती स्थापित केली आणि विधींसाठी एका ब्राह्मण कुटुंबाची व्यवस्था केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याच कुटुंबातील लोक मंदिरात पूजा करत आहेत. त्यांना इल्लम म्हणून ओळखले जाते. परशुरामांनी मन्नारसाला येथे नागराजाची मूर्ती स्थापित केली आणि विधींसाठी एका ब्राह्मण कुटुंबाची व्यवस्था केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याच कुटुंबातील लोक मंदिरात पूजा करत आहेत. त्यांना इल्लम म्हणून ओळखले जाते. (Top Marathi News)
याबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे, महाभारतात खांडववनात वर्णन करण्यात आले आहे. खांडव वनात एकेकाळी साप रहायचे. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन खांडव वनाला आपल्या बाणांनी जाळून टाकले होते. तेव्हा खांडव वनात राहणारे सर्व साप आजूबाजूला पळून गेले. अशातच साप केरळात येऊन स्थित झाले. मन्नारशाला मंदिरात नम्बूदिरी परिवारातील व्यक्तीच पूजा करतात. असेही म्हटले जाते की, या परिवारातील एका स्री च्या गर्भातून नागराज यांनी जन्म घेतला होता असे सांगितले जाते. (Latest Marathi News)
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावणात होणाऱ्या मंगळागौरीच्या व्रताची माहिती
Nagpanchami : महादेवांनी का धारण केला आहे गळ्यात नाग?
=========
सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये या मंदिरात विशेष उत्सव होत असतो. त्यावेळी येथीळ नागराजाला तांदळाचे पीठ आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. नागराजाच्या पूजेचा अधिकार येथील ज्येष्ठ स्त्रीला असतो ही सुद्धा इथली खासियत आहे. शिवाय ज्या महिलांना मुलं झालेले नाहीत अशा महिलांनी या मंदिरात हळदीपासून तयार करण्यात आलेली नागाची मुर्ती अर्पण केल्यास नक्कीच त्या स्त्रीला मातृत्वाचे सुख मिळते. या आधी पती-पत्नी मंदिर परिसरातील तलावात आंघोळ करतात आणि ओल्या कपड्यांनीच देवाचे दर्शन घेतात. येथे कांस्याचे एक भांडे ठेवलेले असते त्याला उरूली असे म्हटले जाते. हे भांडे पती-पत्नी पालथे घालतात आणि मुलं झाल्यानंतर ते सुलट करुन आपल्या इच्छेनुसार देवाला काहीतरी वस्तू अर्पण करतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics