पुरुषांप्रमाणेच महिला नागा साध्वींचे संपूर्ण आयुष्य हे देवाला समर्पित केलेले असते. त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि अंत या दोन्ही गोष्टी पुजा-पाठ सोबत होतात. जेव्हा एखादी महिला नागा साधु होते तेव्हा त्यांना सर्व साधु आणि साध्वी या माता असे म्हणतात. माई बाडा हा तो आखाडा आहे जेथे महिला नागा साध्वी असतात. प्रयागराजमध्ये २०१३ रोजी झालेल्या कुंभच्या माई बाडाला अधिक विस्तृत रुप देत दशनाम संन्यासिनी आखाडा असे नाव दिले गेले. (Naga Women Sadhu Life)
नागा ही एक पदवी असते. साधुंमध्ये वैष्णव, शैव आणि उदासीन अशा तिन्ही संप्रदायांचे आखाडे नागा बनवतात. पुरुष साधुंना सार्वजनिक रुपात नग्न होण्याची परवानगी आहे. मात्र महिला साधु असे करु शकत नाही. नागा यांच्यामध्ये बहुतांश वस्रधारी आणि दिगंबर (निर्वस्र) असतात. अशा प्रकारे महिला सुद्धा जेव्हा संन्यासाची दीक्षा घेतात तेव्हा त्यांना नागा बनवले जाते. मात्र त्या सर्व वस्रधारी असतात. महिला नागा साध्वींना आपल्या मस्तकावर टीळा लावावा लागतो. त्यांना एकच कापड घालण्याची अनुमती असते. जे केशरी रंगाचे असते.
नागा साध्वी जे कपडे घालतात ते शिवलेले नसतात. त्याला गंती असे म्हटले जाते. नागा साध्वी होण्यापूर्वी महिलेला ६ ते १२ वर्षाच्या कालावधीपर्यंत ब्रम्हचार्याचे पालन करावे लागते. जेव्हा एखादी महिला असे करण्यात यशस्वी होते तेव्हातिला गुरु नागा साध्वी बनवण्याची परवानगी देतात.
तसेच नागा साध्वी बनण्यापूर्वी महिलेच्या आयुष्याबद्दलची सर्व माहिती देतात जेणेकरुन असे कळते की, त्या पूर्णपणे ईश्वराला समर्पित आहेत की नाही. त्याचसोबत तिला नागा साध्वी होता येईल की नाही हे सुद्धा पाहिले जाते. आखाड्याच्या महिला साध्वींना माई, अवधूतानी किंवा नागिन असे म्हटले जाते. दरम्यान या माई किंवा नागिन यांना आखाड्याच्या प्रमुख पदांपैकी कोणत्याही पदावर निवडले जात नाही.
एक नागा साध्वी बनण्यादरम्यानच्या प्रवासात एका महिलेला हे सत्य करुन दाखवायचे असते की, त्या पूर्णपणे ईश्वराप्रति समर्पित झाल्या आहेत. आता त्यांना संसारामध्ये रस राहत नाही. सकाळी नदीवर स्नान केल्यानंतर शुद्ध होऊन त्यांची साधना सुरु होते. अवधूतानी मा संपूर्ण दिवस देवाचा जाप करतात. पहाटे लवकर उठून शंकराची आराधना करतात. संध्याकाळी त्या भगवान दत्तात्रयाची पूजा करतात.(Naga Women Sadhu Life)
हे देखील वाचा- भारतात ‘या’ सुपरस्टार्स आणि राजकीय नेत्यांची उभारली आहेत मंदिरं
नागा साध्बी बनवण्यापू्र्वी त्यांना आपले पिंडदान करावे लागते आणि यापूर्वीचे आयुष्य मागेच सोडावे लागते. तर महिलांना संन्यासी बनवण्याची प्रक्रिया आखाड्यातील सर्वोच्च पदाधिकारी आचार्य महामंडलेश्वर द्वारे पूर्ण केली जाते. त्यानंतर महिलांना आपल्या डोक्यावरील संपूर्ण केस काढावे लागतात आणि त्या नदीत पवित्र स्नान करतात. ही त्यांची महिला ते नागा साध्वी होण्यापर्यंतची प्रक्रिया असते.
महिला पुरुष नागा साध्वींमध्ये एक मोठे अंतर असते. पुरुष नागा साधू पूर्णपणे नग्न असतात. तर महिला नागा साध्वी या पूर्णपणे केशरी रंगाच्या वस्रात असतात. या महिलांना कंभुाच्या स्नान दरम्यान नग्न स्नान करु शकत नाहीत. त्या स्नानाच्या वेळी ही केशरी रंगाचे वस्र घालतात.