Naga Panchami 2024 : हिंदू धर्मात नाग पंचमीला सर्वाधिक प्रमुख सणांपैकी एक मानले जाते. भारत, नेपाळ आणि हिंदू लोकसंख्या असणाऱ्या दक्षिण आशियातील देशांमध्ये नागाची पूजा केली जाते. नाग पंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षावेळी साजरी केली जाते. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार यंदा नागपंचमी 09 ऑगस्ट, 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.
नागपंचमी असा एक सण आहे जो देशभरातील जवळजवळ सर्व ठिकाणी साजरा केला जातो. मान्यतांनुसार, नाग पंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात आध्यात्मिक शक्तीत वाढ होण्यासह काही समस्या दूर होतात.
नागपंचमी तिथी
हिंदू पंचांगानुसार, नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचम तिथीला साजरा केला जातो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार येत्या 09 ऑगस्ट 2024 रोजी नागपंचमी असणार आहे. पंचमी तिथीची सुरुवात 09 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजून 36 मिनिटांनी सुरु होऊन 10 ऑगस्ट पहाटे 3 वाजून 14 मिनिटांनी संपणार आहे.
नागपंचमी पूजा विधी
नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठून नित्य कामे उरकून घ्या. यानंतर स्नान करा. स्नान केल्यानंतर भगवान शंकरांसह नाग देवतेची पूजा करावी. नाग देवतेची पूजा करण्यासाठी फळ, फूल, मिठाई आणि दूध अर्पण करा. मान्यतांनुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष अथवा राहु-केतु संदर्भात काही दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा करु शकता.
नागपंचमीचे महत्व
नागपंचमीचा सण नाग, सापांची पूजा करण्यासाठी समर्पित केला जातो. महाभारातत राजा जनमेजयने आपले वडील राजा परीक्षित यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नागांचा नरसंहार करण्यासाठी यज्ञ सुरु केले होते. ऋषि आस्तिक यांनी नागांना वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला आणि यज्ञ रोखण्यास यशस्वी ठरले. ज्या दिवशी यज्ञ थांबले तेव्हा पंचमी तिथी होती, जी आज नागपंचमीच्या रुपात साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागांना महत्व आहे. ऋषीमुनी, देवता आणि राजांसोबतचे काही फोटोही नागांसोबतचे आहेत. (Naga Panchami 2024)
नागपंचमीच्या दिवशी नागरिक आपल्या घरात नागदेवतेची पूजा करतात. त्यांना दूध, तांदूळ, फुल आणि मिठाईचा नैवेद्य दाखवतात. काहीजण नागांना दूध पाजतात. अथवा नाग मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात. असे मानले जाते की, नागपंचमीच्या दिवशी भगवान शंतर आणि नाग देवतेची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात.