Home » ‘लॉट नंबर’ 64

‘लॉट नंबर’ 64

by Team Gajawaja
0 comment
Naga Human Skull
Share

भारताचे परराष्ट्र धोरण सध्या जगात अग्रेसर आहे. अवघ्या जगात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या हुशारीची चर्चा आहे. चीन, अमेरिका, रशिया या बड्या नेत्यांना भारताच्या ताकदीची जाणीव करुन देणा-या एस जयशंकर यांच्यामुळे आणखी एका प्रकरणात भारताला यश आले आहे. यातूनच एक शब्द सध्या गाजत आहे, तो म्हणजे, लॉट नंबर 64, म्हणजेच नागा मानवी कवटी. शिंगे असलेल्या नागा मानवी कवटीची विक्री लंडनमध्ये होत होती. त्यासाठी मोठी बोलीही लावली गेली. मात्र वेळीच ही बाब नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांनी एस. जयशंकर यांच्या ध्यानात आणून दिली. (Naga Human Skull)

भारतीय आदिवासी समाजात या मानवी कवटीला पुजले जाते. अशा वस्तूची बोली लावली गेली तर तो संस्कृतीचा अवमान होईल, हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनला सांगितले. भारताच्या या मंत्र्याचा ब्रिटनमध्ये एवढा दबदबा आहे की शिंगे असलेली ही नागा मावनी कवटी लिलावातून बाजुला काढण्यात आली. आता ती कवटी पुन्हा भारतात आणून तिला मुळ जागी नेण्यासाठी जयशंकर कामाला लागले आहेत. या नागा कवटीला लॉट नंबर 64 देण्यात आला होता. त्यामुळे भारताचे हे यश लॉट नंबर 64 याच नावानं सध्या चर्चेत आलं आहे. भारतीय परराष्ट्र धोरण किती सक्षम आहे, याचा प्रत्यय नुकताच ब्रिटनच्या एका लिलावात आला. ब्रिटनमधील एका लिलावात शिंगे असलेल्या नागा मानवी कवटीची बोली लावण्यात येणार होती. ब्रिटनच्या स्वान ऑक्शन हाऊसमध्ये जगभरातील कवट्या आणि इतर अवशेषांचा संग्रह आहे. 19 व्या शतकातील शिंगे असलेल्या नागा मानवी कवटीला ‘लॉट नंबर’ 64 म्हणून लिलावासाठी सूचीबद्ध करण्यात आले होते. (National News)

ही मावनी कवटी नागालॅंडमधून ब्रिटनमध्ये नेण्यात आलेली आहे. त्यामुळे या लिलावाला विरोध करुन नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी थेट परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे सर्व प्रकरण मांडले. शिंगे असलेल्या नागा मानवाची कवटी हा दुर्मिळ ठेवा आहे. लिलावात त्याची खरेदी विक्री झाल्यास तो भारतातील आदिवासी संस्कृतीचा अवमान होईल, ही बाब जयशंकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच सूत्र फिरवली. या लिलाव प्रक्रीयेमध्ये हस्तक्षेप केला. त्यामुळे ब्रिटनने शिंगे असलेल्या नागा मानवी कवटीची विक्री थांबवली लिलावगृहाने ‘नागा ह्युमन स्कल’ लिलावातून मागे घेत असल्याचे जाहीर केले. (Naga Human Skull)

ब्रिटनच्या टेस्टवर्थ, ऑक्सफर्डशायरमधील स्वान ऑक्शन हाऊसमध्ये जगभरातील कवट्या आणि इतर अवशेषांचा संग्रह आहे. त्यातच शिंगे असलेली ही 19 व्या शतकातील नागा मानवी कवटी लॉट क्रमांक 64 वर विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. याची माहिती नागालॅंडमध्ये मिळताच तेथील जनतेनं नाराजी व्यक्त केली होती. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी या नाराजीची दखल घेत परराष्ट्रमंत्र्यांना लिलाव थांबवण्याची मागणी केली. तिथूनच हा सगळा प्रवास सुरु झाला. आता हा लिलाव थांबल्यावर मुख्यमंत्री रिओ यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे आभार मानले आहेत. शिवाय फोरम फॉर नागा रिकन्सिलिएशनने या प्रकरणावर आनंद व्यक्त केला आहे. या नागा मानवी कवटीच्या फोटोखाली, ‘मानवशास्त्र आणि आदिवासी संस्कृतींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या संग्राहकांना विशेष उपयुक्त ठरणारी असे लिहिले होते. या लिलावासाठी सुरुवातीची रक्कम 2.30 लाख रुपये ठेवण्यात आली होती. लिलावकर्त्यांना ती कवटी 4,000 पौंड म्हणजेच, 4.3 लाख रुपयांना विकली जाण्याची अपेक्षा होती. (National News)

======

हे देखील वाचा : पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

======

हा नागा मानवाची कवटी 19 व्या शतकातील बेल्जियन वास्तुविशारद फ्रँकोइस कॉपेन्स यांच्या संग्रहात सापडली होती. आता या नागा मानवी कवटीचा लिलाव थांबवला असा तरी ही मानवी कवटी नागालॅंड राज्याची परंपरा आहे, त्यामुळे ही कवटी पुन्हा नागालॅंडला द्यावी अशी मागणी होत आहे. याबाबत फोरम फॉर नागा रिकॉन्सिलिएशनने थेट लिलावगृहाशी संपर्क साधून विक्रीचा निषेध केला आणि वस्तू नागालँडला परत करण्याची मागणी केली. आता याच संस्थेच्या माध्यमातून नागालॅंडमधील अशाच अनमोल वस्तू पुन्हा परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. (Naga Human Skull)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.