Home » टाटा समूहात इंटर्न म्हणून सामील झालेले एन चंद्रशेखरन, ‘असे’ पोहचले कंपनीच्या शीर्षस्थानी

टाटा समूहात इंटर्न म्हणून सामील झालेले एन चंद्रशेखरन, ‘असे’ पोहचले कंपनीच्या शीर्षस्थानी

0 comment
Share

पुढील पाच वर्षांसाठी टाटा समूहाचे नेतृत्व पुन्हा एकदा नटराजन चंद्रशेखरन यांच्या हातात आहे. यामुळे यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि चिकाटीशिवाय दुसरा मार्ग नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाच वर्षांपूर्वी सायरस मिस्त्री यांच्यानंतर दुसरी पसंती म्हणून समोर आलेल्या चंद्रशेखरन यांनी या नियुक्तीद्वारे आपण देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे निर्विवाद प्रमुख असल्याचे दाखवून दिले आहे. (N Chandrasekaran)

३५ वर्षांपासून जोडलेले आहेत टाटा समूहाशी 

चंद्रशेखरन यांचे जवळचे मित्र त्यांना ‘चंद्र’ म्हणतात. ते गेल्या ३५ वर्षांपासून टाटा समूहाशी संबंधित आहेत. दीडशे वर्षांहून अधिक जुन्या कंपनीचे ते पहिले बिगर पारशी प्रमुख आहेत, यावरून त्यांच्या कंपनीवरील निष्ठेचा अंदाज लावता येतो. २०१७ मध्ये त्यांना सायरस मिस्त्री यांच्या जागी पहिल्यांदा टाटा समूहाचे प्रमुख बनवण्यात आले. मिस्त्री यांनी त्यांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले आणि प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने चंद्रशेखरन यांची नियुक्ती कायम ठेवून मोठा कॉर्पोरेट वाद संपवला. (N Chandrasekaran)

भारतातच घेतलंय शिक्षण

नटराजन चंद्रशेखरन यांचा जन्म २ जून १९६३ रोजी तामिळनाडूमधील नमक्कल जिल्ह्यातील मोहनूर गावात झाला. ते आपल्या मोठ्या भावांसोबत गावातील स्थानिक सरकारी शाळेत शिकण्यासाठी जात असत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण तामिळ माध्यमातून झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोईम्बतूर येथून पदवी आणि तिरुचिरापल्ली प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अनुप्रयोग (एमसीए) मध्ये मास्टर्स केले. (N Chandrasekaran)

कंपनीच्या इंटर्नमधून टॉपपर्यंत पोहोचले चंद्रशेखरन

त्यांनी आयआयएम कोलकाता येथून एमबीएची पदवीही मिळवली आहे. १९८६ मध्ये आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका वर्षानंतर, चंद्रशेखरन टाटा समूहात इंटर्न म्हणून सामील झाले आणि कालांतराने विविध जबाबदाऱ्या सांभाळत समूहाच्या टॉपपर्यंत पोहोचले. (N Chandrasekaran)

समूहासाठी बनले निर्विवाद निवड

एअर इंडियाला टाटा समूहात परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे चंद्रशेखरन हे रतन टाटा यांच्या जवळचे मानले जातात आणि गेल्या पाच वर्षांत त्यांनी कंपनीचा नफा आणि कामकाजाचा विस्तार केला आहे. रतन टाटा यांनी दुसऱ्या टर्मसाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि बोर्डाच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवली. याचा अर्थ चंद्रशेखरन पुढील पाच वर्षांसाठी टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष असतील. नटराजन चंद्रशेखरन यांचा पहिला कार्यकाळ फेब्रुवारीतच संपत होता. त्यांची दुसऱ्यांदा निवडणुक जवळपास निश्चित झाली होती. (N Chandrasekaran)

हे देखील वाचा: बापाच्या रंगेल आयुष्याचा फटका मुलांना! विजय मल्ल्याची कहाणी वाचून थक्क व्हाल….

मॅरेथॉन धावपटू देखील आहेत चंद्रशेखरन

पद्मभूषण पुरस्कार विजेते चंद्रशेखरन यांना फोटोग्राफीची आवड आहे आणि त्यांना संगीत ऐकायलाही आवडते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात उल्लेखनीय पैलू म्हणजे, ते लांब पल्ल्याचे धावपटू आहेत. त्यांनी जगभरातील अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे आणि तासनतास मैल धावत असताना ते मानसिकदृष्ट्या इतके खंबीर झाले की, आयुष्याच्या मॅरेथॉनमध्येही ते टप्प्याटप्प्याने गंतव्यस्थानाकडे वाटचाल करत राहिले आणि विजेता म्हणून उदयास आले. धावण्याची आपली आवड लक्षात घेत त्यांनी कागदावर ‘रनर्स वर्ल्ड’ हे पुस्तकही लिहिले आहे. (N Chandrasekaran)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.