भारतात आज ही लोकांचा मंदिरातील देवावर खुप विश्वास आहे. पण जेव्हा त्यांच्या आयुष्यातील समस्या, संकट दूर होत नाही तेव्हा ते देवाला शरण जातात. अशाच प्रकारे जर भूत-प्रेत किंवा वाईट आत्मा दिसतो तेव्हा सुद्धा लोक मंदिरात जातात. दरम्यान, या सर्व गोष्टीला अंधविश्वास असे म्हटले जाते. तरीही काही लोक यावर विश्वास ठेवतात. भारतातील काही शहरांमध्ये अशी काही मंदिरे आहेत जेथे वाईट आत्मा यांना पळवून लावले जाते. जर तुम्हाला सुद्धा या मंदिरांच्या रहस्याबद्दल जाणून घेण्यास इच्छुक असाल तर ते ऐकल्यानंतर तुमचा थरकाप तर नक्कीच उडेल.(Mysterious Temple)
राजस्थान मधील मेहंदीपुर बालाजी
हे बालाजीचे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचे आहे. राजस्थान मध्येच नव्हे तर देशातील काही ठिकाणी या मंदिराबद्दल जरुर बोलले जाते. अशी मान्यता आहे की, जर एखाद्याला भूताने झपाटले असेल किंवा वाईट आत्मा त्यामध्ये असेल तर या मंदिरात आल्याने पळ काढतात. येथे खुप घाबरणारी लोक येण्यापासून दूर राहतात. कारण येथे ज्या पद्धतीने पूजा केली जाते ती अत्यंत भयंकर असते. हे मंदिर हनुमानाला समर्पित आहे, येथे येणाऱ्या लोकांना साखळ्यांनी बांधून वाईट आत्माला मारहाण करतात आणि त्या असे केल्यानंतर पळून जातात. काहीवेळ लोक आपल्यावर उकळते पाणी सुद्धा टाकतात आणि याचा आवाज दूरवर पर्यंत ऐकू येतो.

दत्तोत्रेय मंदिर, मध्यप्रदेश
एपमी मधील गंगापुर येथे एक आणि प्रेतवाधित मंदिर आहे, ज्याला सर्वात विचित्र मंदिरांपैकी एक मानले जाते. लोकांचे असे मानणे आहे की, दत्तात्रेय मंदिरात आल्यानंतर त्यांना असे वाटते की, शरिरावर एखाद्याने ताबा मिळवला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी लोक अधिक येतात. ज्यांच्यावर ही वाईट आत्मा आलेली असते ते देवाला शिव्या देऊ लागतात. लोक मंदिरांच्या भिंतीवर सुद्धा चढू लागतात.
देवजी महाराज मंदिर, एमपी
हे मंदिर भूतांचा मेळावा असल्याचे म्हटले जाते. पौर्णिमेच्या रात्री तो मेळावा ठेवला जातो. असे मानले जाते की, लोक आपल्यामधील आत्म्यापासून सुटका मिळवण्यासाठी या मंदिरातयेतात. येथील बाबा आणि साधू लोक भूत पळवून लावण्यासाठी झाडू मारतात. काही लोकांनी असा दावा केला की, या मंदिराच्या चहूबाजूंना आत्मा दिसतात. ज्यांना येथे विचित्र वाटते तिच लोक येथे येतात. येथे लोक भूतांपासून आपली सुटका करण्यासाठी हातांवर जळता कापूर ठेवतात.(Mysterious Temple)
कामाख्या मंदिर, आसाम
आसाम मधील कामाख्या मंदिर हे सुद्धा फार प्रसिद्ध आहे. कामाख्याची पूजा तिच्या माहवारीच्या वेळी होती. येथे पुरुष मंडळी जात नाही. पण माहवारी वेळी देवीची पूजा केली जाते आणि लाल कपड्यात प्रसाद बांधून दिला जातो. मान्यता अशी आहे की, देवीच्या रक्तानेच तो लाल कापड रंगवला जातो आणि तो अत्यंत पवित्र असतो. लोक असे म्हणतात की, त्यांना तेथे काही आत्मांचा आवाज ही ऐकू येतो. काही लोक आत्मांना पळवून काढण्यासाठी देवीजवळ येतात.
हे देखील वाचा- श्रीरामांचा आज विवाह सोहळा….
कोलकाता, कालीघाट मंदिर
कोलकाताचे कालीघाट मंदिर फार प्रसिद्ध आहे. येथे देवी कालीची पूजा केली जाते आणि लोक आपल्या समस्या घेऊन येथे येतात. जर एखाद्यावर वाईट आत्मा असेल तर येथे आल्यानंतर त्या पळ काढतात.
हरसू भ्रम मंदिर, बिहार
बिहार मधील हे मंदिर अगदी विचित्र आहे. पण या बद्दल खुप मान्यता आहेत. असे मानले जाते की, या मंदिराची निर्मिती ब्राम्हणाद्वारे केली होती. त्याला असे वाटत होते की, लोकांनी त्याची पूजा करावी. त्याची आत्मा आजही येथे फिरते आणि येथे येऊन आत्माला पळवून लावण्यासाठी मागणी करतात. मंदिर अगदी लपलेल्या ठिकाणी आहे. येथे जाण्यासाठी तु्म्हाला स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागते.