जगात अशा काही घटना घडत असतात की, ज्याबद्दल ऐकून हैराण व्हायला होते. अशातच जगातील काही माणसं अशी आहेत ज्यांच्याबद्दल कधीच थांगपत्ताच लागलेला नाही. ना कोणीही त्यांच्याबद्दल सांगणारा व्यक्ती शोधून सापडलेला नाही. अशा काही घटना घडल्या ज्याबद्दल अजून ही रहस्यच आहे. तर जाणून घेऊयात अशा काही लोकांबद्दल जे आज ही एक रहस्य म्हणूनच ओळखले जातात. (Mysterious People)
द फॉलिंग मॅन
जेव्हा ९/11 मध्ये अमेरिकेती ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा एक व्यक्ती डोक्याच्या भागाकडून खाली कोसळल्याचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला होता. या व्यक्तिचा फोटो संपूर्ण जगभरात व्हायरल झाला होता. मात्र त्या व्यक्तिची आजवर ओळख पटलेली नाही. काही लोकांच्या अंदाजाने त्याचे नाव जोनाथन ब्रइलेह होते. जो रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. पण अधिकृतरित्या त्याची कधीच ओळख पटली नाही.
द हिरोशिमा स्टेप्स शॅडो
दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिरोशिमावर परमाणूचा हल्ला झाला. तेव्हा ३ लाख लोकांचा या मध्ये बळी गेला होता. त्यावेळी एक फोटो हल्ला झालेल्या ठिकाणापासून ८० फिट दूरवरुन काढण्यात आला होता. तेथे एक व्यक्ती बसला होता. पण परमाणूचा हल्ला झाला तेव्हा त्यामध्ये त्याच्या मृत्यू झालाच. पण त्याच्या शरिराची सावली तेथे होती आणि त्या व्यक्तीची ओळख कधीच झाली नाही की, तो नक्की कोण होता.
हसताना आढळलेली सीन नदीतील मृत मुलगी
या मुलीची ओळख कधीच पटली नाही. ती कोण होते, तिच्या चेहऱ्यावर मृ्त्यूच्या वेळी कोणतेही भय, दु:ख नव्हते तर ती हसत होती. तिचा फोटो सुद्धा लोकांनी खरेदी केला आणि अधिकाधिक किस करण्यात आलेल्या फोटोंपैकी एक आहे. या मुलीच्या चेहऱ्यावर एक पुतळा ही तयार करण्यात आला. जो तिच्या रहस्यमयी मृत्यूसह हसत आहे.
केविन कार्टर यांच्या फोटोतील सूडानी मुलगा
सूडाच्या दौऱ्यासाठी निघालेले फोटो जर्नलिस्ट कार्टर यांच्या या फोटोने जगभरात खळबळ उडवली होती. त्यामध्ये एक कुपोषित मुलगा झुकलेला दिसून येत आहे. त्याच्या मागेच गिधाड बसले आहे. हा मुलगा कोण होता, त्याची ही कधीच ओळख पटली नाही. (Mysterious People)
हे देखील वाचा- ताऱ्यांना सुद्धा आपला इतिहास माहिती असतो?
डी.बी. कूपर
हे अमेरिकेतील वायुयान सेवेच्या इतिहासातील पहिले आणि अखेरचे व्यक्ती आहेत.यांची सुद्धा कधीच ओळख पटली नाही. त्यांना अमेरिकेच्या विमानाला हवेतच हायजॅक केले होते आणि २ लाख अमेरिकन डॉलरसह विमान एखाद्या ठिकाणी उतरण्यापूर्वी त्यांनी पॅराशूटच्या माध्यमातून विमानातून उडी मारली होती. खुप प्रयत्न करुन ही अमेरिकेच्या एजेंसीला त्यांना पडकता आले नाही. खुप तपास केल्यानंतर ४ वर्षात काही रक्कम कोलंबियातील नदीत मिळाली. पण उर्वरित रक्कम आणि पॅराशूटसह कूपर यांना पोलिस कधीच शोधू शकले नाहीत.