एखाद्या तलावाच्या शेजारी शांत बसायला कोणाला नाही आवडत, त्यात जर तलावाच्या आजूबाजूला डोंगर असतील आणि ते जर बर्फाच्छादित असतील तर मग ती जागा म्हणजे ब्रम्हानंदी टाळीच नाही का? एवढं ऐकून तुमचं मन त्या तलावपर्यंत पोहचलं असेल, तर त्याला मागे फिरवा. कारण मी ज्या तलावाबद्दल बोलतो आहे, त्या तलावाच्या आजूबाजूला मानवी हाडांचा खच आहे. तलावात डोकवाल तर माशांसोबत या तलावात मानवी सांगाडे सुद्धा पोहत असतात. हा काही एखाद्या हॉरर मूवीचा सेट नाही आहे. हा तलाव हिमालयात खरंच आहे. जे रूपकुंड तलाव म्हणून ओळखलं जातं. तलावाच्या आजूबाजूला एवढे सांगाडे आणि हाड कशी काय आहेत? रूपकुंड तलावाचं रहस्य काय? जाणून घ्या …. (Roopkund lake)
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमालयाच्या त्रिशूल पर्वताच्या जवळ रूपकुंड तलाव आहे. समुद्रसपाटीपासून 5,029 मीटर उंचीवर आहे. १९४२ साली सर्वात पहिले हरी किशन मढवाल या ब्रिटिश फॉरेस्ट रेंजरने हे तलाव शोधून काढलं होतं. तेव्हा भारत आणि जपानमध्ये संघर्ष सुरू होता. म्हणून सुरुवातीला हरी किशनला वाटलं की ही हाडं आणि सांगाडे लपलेल्या सैनिकांचे असतील, पण नंतर हे स्पष्ट झालं की ही हाडं बरीच जूनी आहेत. या सांगाड्यांसोबत लाकडी वस्तू, लोखंडी भाल्याच्या टोकां, लेदर चप्पल हे सुद्धा सापडलं होतं. या सांगाड्यांच रहस्य शोधण्यासाठी इंग्रजांनी लगेच एक टीम कामाला लावली. (National News )
या सांगाड्यांबद्दल अनेक कथा आहेत. एक सर्वात जुनी कथा अशी आहे की, हे सांगडे ८७० वर्षांपूर्वी एका भारतीय राजाच कुटुंब आणि सैन्य बर्फाच्या वादळात अडकले आणि तिथेच गोठून मरण पावले. त्या डोंगरावर या तलावा जवळ कोणीच माणूस फिरकला नसल्यामुळे त्याचा शोध इतक्या वर्षात कधीच लागला नाही. अजून एक थियरी किंवा कथा अशी सुद्धा आहे की, यातील काही सांगाडे हे भारतीय सैनिकांचे आहेत. जे १८४१ साली तिबेटवर कब्जा करण्यासाठी गेले होते. पण अपयशी होऊन परतले. यातील ७० सैनिकांचा परतताना इथे मृत्यू झाला. अजून एक गोष्ट अशी की, जुन्याकाळात ही जागा एक स्मशान असेल जिथे महामारी झालेल्या लोकांचे मृतदेह टाकून दिले असतील. (Roopkund lake)
या भागातील गावांमध्ये एक प्रसिद्ध लोकगीत गायला जातं. त्यात सांगितलं जातं की, कशी इथे पूजली जाणारी नंदा देवी एक ‘कडक वादळ’ उठवते, ज्यामुळे सरोवर पार करणाऱ्यांचा मृत्यू होतो आणि ते सरोवरात बुडून जातात. आता कथा अनेक आहेत, पण त्यातील खरी कोणती हा प्रश्नच आहे.
हे रहस्य शोधण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रयत्न झाले. या प्रयत्नात हे काळालं की, इथे मरण पावलेले बहुतेक लोक सामान्य माणसांपेक्षा जास्त उंचीचे होते. आणि इथे मरणं पावलेल्या बऱ्याच लोकांच वय ३५ ते ४० वर्ष होतं. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अध्ययनांनुसार काही हाडं 1200 वर्ष जुनी आहेत. सापडलेल्या लोकांच्या सांगाड्यामध्ये अनेक वर्षांचा फरक आहे. (National News )
=============
हे देखील वाचा :
Manmohan Singh जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ – मनमोहनसिंग यांचा जीवन प्रवास
Coconut Oil : आणि खोबरेल तेलाचे कोडे सुटले !
==============
फक्त वर्षांचा नाही तर या सांगाड्यांमध्ये खंडांचा सुद्धा फरक आहे. जेव्हा या सांगाड्यांच्या जेनेटिक्सचा अभ्यास करण्यात आला. तर हे आढळून आलं की, काही सांगाड्यांचे जेनेटिक्स हे आजच्या दक्षिण आशियामधील लोकांसारखे आहेत. तर काहींचे जेनेटिक्स यूरोपमधील लोकांशी जास्त जुळतात.
हे सांगडे हजार बाराशे वर्ष जूने त्यातसुद्धा त्या सांगाड्यांमध्ये अनेक वर्षांच अंतर आणि त्यातही हे सांगडे एकाच खंडातील नाही. त्यामुळे रूपकुंड तलावाच्या या सांगड्यांचं रहस्य तलाव सापडून इतकी वर्ष होऊन सुद्धा गूढ आहे. (Roopkund lake)