चीनमध्ये एक असे शहर सापडले आहे, ज्यामध्ये तीन हजार वर्षापूर्वीच्या समृद्ध नागरी वसाहतीचे पुरावे वास्तुशास्त्रांच्या हाती लागले आहेत. चीनच्या उभारणीत मोठा वाटा असलेल्या शांग राजवंशाचे हे तीन हजार वर्षे जुने शहर म्हणजे, चीनच्या इतिहासातील खाणाखुणा शोधण्याचे महत्त्वाचे साधन ठरणार आहे. एक संपूर्णच शहर संशोधकांना मिळाल्यामुळे हजारो वर्षापूर्वीची संस्कृतीही समजण्यास मदत होणार आहे. सोबत अनेक रहस्यांची उकल होणार आहे. (China)
चीनमध्ये शांग राजवंशाचे तीन हजार वर्षे जुने शहर सापडल्यानं अनेक इतिहाससंशोधकांनी आनंद व्यक्त केला आहे. हे संपूर्ण ठिकाण रहस्यांनी भरलेले असल्यामुळे याभागाची छायाचित्र घेण्यासाठीही अभ्यासकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी मानवी वसाहतीच्या हजारो वर्षापूर्वीच्या खाणाखुणा भेटल्या आहेत. येवढ्या वर्षापूर्वी मानवी संस्कृती किती संपन्न आणि समृद्ध होती, याचे हे पुरावे थक्क करणारे आहेत. लिंगनान हे चीनच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील गुआंग्शी, ग्वांगडोंग आणि हैनान या आधुनिक प्रांतांमध्ये पसरलेले शहर आहे. या शहराच्या सीमा कुठपर्यंत आहेत, याचा अद्यापही शोध चालू आहे. जसजसे उत्खलन होत आहे, तशा या शहराची सीमा ही हाँगकाँग, मकाऊ आणि उत्तर व्हिएतनाम पर्यंत असल्याचे स्पष्ट होत आहे. गुआंग्शी झुआंग राज्यातील शहराचे पुरातत्व अवशेष हे चीनमध्ये सापडलेले आत्तापर्यंतचे सर्वात जुने अवशेष मानले जात आहेत. (International News)
यामुळे 3000 वर्षापूर्वीच्या मानवी संस्कृतीवर प्रकाश पडणार आहे. चीनला बसवणा-या शांग राजवंशाच्या काळातील हे शहर असल्याची माहिती आहे. हा काळ म्हणजे, 1600-1050 ईसापूर्वचा काळ मानला जातो. चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, हुबेई युनिव्हर्सिटी आणि ग्वांगझो म्युनिसिपल कल्चरल हेरिटेज डिपार्टमेंटच्या पुरातत्व संस्थेचे अनेक तज्ञ या शहरातील रहस्यांचा उलगडा करण्यासाठी संशोधन करीत आहेत. शांग राजांच्या काळात चीनचा आर्थिक आणि सामाजिक विकास झाला. शांग राजांनी हुआन नदीच्या दक्षिणेकडील आन्यांग येथे नवीन राजधानी स्थापन केली. हे शहर प्राचीन जगातील सर्वात मोठ्या शहरी केंद्रांपैकी एक होते. या शहरात राजवाडे आणि मंदिरे होती. तसेच येथील व्यापार केंद्रेही प्रसिद्ध होती. येथून कांस्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुरावे आहेत. शांग राजवंश हा चीनमधील सर्वात जुने राजवंश आहे, आणि याच राजवंशानं कांस्यनिर्मितीमध्ये मोठे योगदान दिले आहे. या शांग राजवंशातील राजे हे गणितामध्ये तज्ञ होते. ग्रहकाळाचा त्यांचा अभ्यास होता. त्यानुसारच त्यांनी शहरांची रचना केली होती. (China)
त्यामुळेच गुआंग्शी शहराजवळ शांग राजवंशकालीन शहराच्या खुणा मिळाल्यावर उत्खलन तज्ञ या शहरात मोठ्या संख्येनं दाखल झाले. या शहराचा शोध लागल्यावर या साईटमध्ये प्रथम विटा आणि तुटलेली भांडीही आढळून आली आहेत. सप्टेंबर पासून या सर्व भागात मोठ्याप्रमाणात संशोधन केल्यावर ही साईट 3 हजार वर्ष जुनी असल्याची माहिती स्पष्ट झाली. या संपूर्ण शहराच्या उत्तर आणि पश्चिम भिंती भक्कमपणे सुरक्षित केल्या आहेत. त्यापैकी पश्चिमेकडील भिंत अजूनही चांगल्या प्रकारे सुरक्षित आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना या ठिकाणी राखेचे खड्डे आणि खांबांसह अन्य अवशेष मिळाले आहेत. यासोबत मातीची भांडी आणि दगडी हत्यारेही मिळाली आहेत. शान राजवंशाची खासियत होती की हे राजे शहराची निर्मिती करतांना त्या भागात भव्य राजवाडे उभारायचे. सोबत मंदिरेही असायची. विशेष म्हणजे, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीही मोठी उभारण्यात येत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. (International News)
====================
हे देखील वाचा :
America : कोण असणार असणार अमेरिकेचे भावी अध्यक्ष
Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !
====================
या भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जात असे. त्यामुळे आता जी अवजारे मिळत आहेत, ती शेतीची असल्याचा काही संशोधकांचा अंदाज आहे. याशिवाय शेतकरी पाळीव प्राणी पाळत असल्याचे पुरावेही या शोधातून मिळाले आहेत. चीन हे त्याकाळीही व्यापाराचे मोठे केंद्र होते. पूर्वेकडील देशांमध्ये चीनचा व्यापार चालत असे, या व्यापारातून चीनमध्ये या देशांमधील संस्कृतीच्याही खाणाखुणा दिसू लागल्या. त्यातच चार चाकांच्या रथाचाही समावेश आहे. असाच चारचाकी रथ या संशोधनात मिळाला आहे. शिवाय इजिप्त आणि मेस्किकोमधील संस्कृतीशी साम्य असणारी अवजारेही मिळत असल्यामुळे या भागातच एक संग्रहालय उभारण्याचा निर्णय आता स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. (China)
सई बने