Home » ऑन-डिमां गिफ्ट पाठवणारी Myntra कंपनी अशी बनली फॅशन ई-कॉमर्स कंपनी

ऑन-डिमां गिफ्ट पाठवणारी Myntra कंपनी अशी बनली फॅशन ई-कॉमर्स कंपनी

by Team Gajawaja
0 comment
Myntra Success Story
Share

ई-कॉमर्स इंडस्ट्रीत जेव्हा फॅशन बद्दल बोलले जाते तेव्हा मिंत्राचा उल्लेख जरुर केला जातो. सध्या मिंत्रा भारतातील सर्वाधिक मोठी ई-कॉमर्स स्टोर्सपैकी एक आहे.जी कपडे ते चप्पलापर्यंतच्या सर्व गोष्टींची विक्री केली जाते. मिंत्राची सुरुवात २००७ रोजी झाली होती. मात्र २०१४ मध्ये फ्लिपकार्ट त्यांची पॅरेंट कंपनी बनली. फ्लिपकार्टने मिंत्राला २ हजार कोटी रुपयांना खरेदी केले.मिंत्राची सुरुवात ही मुकेश बंसल, आशुतोष लवानिया आणि विनीत सक्सेना यांनी मिळून केली होती. फाउंडर मुकेश बंसल यांनी जेव्हा मिंत्राची सुरुवात केली तेव्हा त्याआधी ४ विविध प्रकारच्या स्टार्टअपच्या रुपात प्रोडक्ट मॅनेजरच्या रुपात त्यांनी काम केले होते. त्यांना मार्केटची ओळख होती. याच अनुभवाने त्यांनी या स्टार्टअपचे लॉन्चिंग केले. (Myntra Success Story)

एकेकाळी ऑन-डिमांड गिफ्ट प्रोडक्टसची विक्री करायची कंपनी
मिंत्राची सुरुवात एका अशा प्लॅटफॉर्मच्या रुपात झाली होती जी ऑन-डिमांड गिफ्ट प्रोडक्ट्स विक्री करण्याचे काम करत होता. २००७ ते २०१० च्या दरम्यान कंपनीने पर्सलाइज्ड प्रोडक्ट्स जसे की, टी-शर्ट, मग, माउसपॅडसह काही गोष्टींची ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू कंपनीने फॅशन आणि लाइफस्टाइल संबंधित प्रोडक्ट्स विक्री करण्यास सुरुवात केली. युजर्सला कंपड्यांमध्ये विविध प्रकार उपलब्ध करुन दिले. त्यानंतर यामध्ये फॅशन इंफ्लुएंसरची एन्ट्री झाली. कपड्यांसह एक्सपर्ट्सने फॅशन टीप्स देण्यास सुरुवा केली. हा ट्रेंड तरुणांना खुप आवडला.

Myntra Success Story
Myntra Success Story

फ्लिपकार्टने खरेदी केल्यानंतर ही बदल सुरुच राहिला
मिंत्राची काम करण्याची पद्धत इंडियन फॅशन इंडस्ट्री मध्ये बदल घेऊन आला. युजर्सचा ऑनलाईन शॉपिंगचा अनुभव अधिक वाढू लागला. अशा प्रकारे हा एक प्लॅटफॉर्म म्हणून उभी राहिली. २०१४ मध्ये त्यांना २ हजार कोटींना फ्लिपकार्टने खरेदी केले. त्यानंतर ही मिंत्राने काम करण्याच्या पद्धतीत बदल केला नाही. याच वर्षात कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर १ हजार ब्रँन्ड्सच्या दीड लाख प्रोडक्ट्सचा समावेश करण्यात आला. मिंत्राने आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला अशी ओळख निर्माण करुन दिली की, भारतातील ९ हजार विविध लोकेशनवर त्यांच्या प्लॅटफॉर्मचे प्रोडक्ट्स डिलिव्हर केले जातील.(Myntra Success Story)

हे देखील वाचा- सोशल मीडिया फ्रेंडली Hashtags साठी ‘या’ वेबसाइट्स येतील कामी

जेव्हा लोकांना धक्का दिला
१० मे, २०१५ रोजी मिंत्राने आपल्या युजर्सला एक धक्का दिला. कंपनीने असे म्हटले होते की, त्यांची वेबसाइट बंद होणार आहे. युजर्सला केवळ अॅपच्या माध्यमातूच खरेदी करता येईल. मिंत्राचा ७० टक्के सेल हा स्मार्टफोनच्या माध्यमातूनच होत होता. कंपनीने असे म्हटले होते की, त्यांच ९५ टक्के सेल मोबाईल डिवाइसच्या माध्यमातून होतो. त्यामुळेच ते अॅपवर उपलब्ध असतील. यामुळे कंपनीला निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. युजर्सची संख्या ही कमी झाली. यामुळे मिंत्राला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. कंपनीला असे काही बदल करावे लागले की, जे युजर फ्रेंडली असतील. अशातच पुन्हा एकदा कंपनी यशाच्या मार्गावर पोहचली. यासाठी मिंत्राला २०२१ मध्ये बेस्ट ई-कॉमर्स वेबसाइट फॉर २०१२ आणि २०१२ मध्ये फॅशन ई-रिटेलर ऑफ द ईयरचा पुरस्कार मिळाला. ऐवढेच नव्हे तर २०१२ मध्ये प्युमा इंडियाकडून बेस्ट-ई-कॉमर्स पार्टनर ऑफ द ईयरचा ही पुरस्कार मिळाला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.