अब्जाधिश एलन मस्क (Elon Musk) आता चंद्रावर जाण्यासाठी सर्वाधिक मोठे असे रॉकेट प्रक्षेपित करणार आहे. हे रॉकेट चंद्रावर मानवाला घेऊन जाणार आहे. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा आणि एलन मस्कची (Elon Musk) कंपनी स्पेसएक्स यांच्यातर्फे चंद्रापर्यंत प्रवास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. गेल्या काही वर्षापासून नासा चंद्रावर मानवी वसाहत तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. नासाच्या मंगळ मोहिमेसाठी चंद्रावर असलेली ही वसाहत कामी येणार आहे. मंगळावर जाणारे यान पुढच्या यात्रेच्या तयारीसाठी चंद्रावर थांबवण्यात येईल. ही मोहिम जेवढी महत्त्वाची आहे, तेवढ्याच खर्चाची आणि धोक्याची आहे. मात्र त्याआधी मानवला चंद्र दाखवण्याचे स्वप्न एलन मस्कनं (Elon Musk) बघितले आहे. अर्थात गेल्या 60 वर्षात नासातर्फे हा प्रयत्न करण्यात येत असून त्यात नासाच्या 40 टक्के मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत. एलन मस्कच्या (Elon Musk) यानाचे पहिले प्रक्षेपणही काही सेकंदाचा अवधी असताना रोखण्यात आले होते. तरही एलन या स्टारशिप रॉकटेच्या भविष्यात होणा-या प्रक्षेपणासाठी उत्सुक आहे.
अमेरिकेतील टेक्सास शहरातून एलन मस्कचे (Elon Musk) सर्वात मोठे रॉकेट ‘स्टारशिप’ प्रक्षेपित होणार होते. मात्र आयत्यावेळी आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे यानाच्या प्रक्षेपणाची तारीख पुढे ढकलण्यात आहे. हे रॉकेट एलन मस्क (Elon Musk) याची कंपनी, स्पेसएक्सने बनवले आहे. या रॉकेटद्वारे नासा आपली ‘आर्टेमिस-2’ चंद्र मोहीम राबविण्याच्या तयारीत आहे. यामध्ये माणसाला चंद्रावर पाठवले जाणार आहे. नासाने मस्कच्या कंपनीसोबत या मोहिमेसाठी 23,000 कोटी रुपये आणि 9,000 कोटी रुपयांचे दोन करार केले आहेत. पुन्हा एकदा चंद्रावर विजय मिळवण्याची सुरुवात म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे.
त्यादृष्टोकोनातून एलन मस्कच्या (Elon Musk) या सर्वात मोठ्या यानाच्या प्रक्षेपणावर जगाचे लक्ष लागले होते. पण आयत्यावेळी प्रेशर व्हॉल्व्ह फ्रीज झाल्यामुळे प्रक्षेपण 39 सेकंद आधी रद्द करण्यात आले. संध्याकाळी 6.50 च्या सुमारास स्टारशिपचे लोकार्पण होणार होते. आता रॉकेट रिसेट करण्यासाठी किमान 48 तास लागणार आहेत. स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले स्टारशिप त्यानंतर अंतराळात कधी पाठवायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या यानाच्या प्रक्षेपणासाठी एलन मस्कही तळ ठोकून बसला होता. पण प्रक्षेपण रद्द झाल्यावर थोड्या निराश झालेल्या मास्कनं, प्रेशर व्हॉल्व्ह गोठले आहे, त्यामुळे ते काम सुरू होईपर्यंत लॉन्च केले जाऊ शकत नाही. आज खूप काही शिकायला मिळाले. आता प्रणोदक अपलोड करत आहे. काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न करू, असे ट्विट केले आहे.
या यानाचे प्रक्षेपण ठराविक वेळेत होणे गरजेचे आहे. कारण त्याच्या मदतीने, मानव चंद्रावर जाऊ शकणार आहे. तसेच या यानाच्या आधारानं नासाला 2029 पर्यंत मानवांना मंगळावर नेऊन तेथे वसाहत स्थापन करायची आहे. हे स्पेसशिप माणसांना एका तासापेक्षा कमी वेळेत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवण्यास सक्षम असेल. स्टारशिप ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 40 मजली इमारतीइतकी उंच आहे. ते 150 MT भार वाहून नेऊ शकते. पृथ्वीपासून 230 दशलक्ष किलोमीटर दूर असलेल्या मंगळावर वसाहत उभारायची कल्पना स्वप्नवत आहे. मात्र एलन मस्कनं हे स्वप्न पाहिलं आहेत. त्याच्या या सर्व स्वप्नांची मदार स्टारशिपवर आहे.
=========
हे देखील वाचा : ‘सरस्वती’ भारतीयांनी शोधलेली ब्रह्मांडातील सर्वात मोठी गोष्ट!
=========
स्टारशिप हे आतापर्यंत विकसित केलेले जगातील सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण वाहन आहे. हे यान पुन्हा वापरण्यायोग्य आहे आणि 150 मेट्रिक टन भार वाहण्यास सक्षम आहे. स्टारशिप सिस्टीम एकाच वेळी 100 माणसांना मंगळावर घेऊन जाण्यास सक्षम असणार आहे. मस्कला 10 एप्रिललाच स्टारशिप लाँच करायची होती, परंतु यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन कडून त्याला मंजुरी मिळाली नव्हती. हे संपूर्ण प्रक्षेपण 90 मिनिटांचे असणार आहे. हे यान 150 मैलांपेक्षा जास्त उंचीवर म्हणजेच 241.40 किलोमीटर अंतरावर पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल आणि नंतर हवाईयन किनारपट्टीवर स्प्लॅशडाउन करेल. या चाचणीला यश आल्यास मस्क त्याच्या मंगळावर शहर वसवण्याच्या स्वप्नाच्या जवळ गेल्याची पहिली पायरी ठरणार आहे. या यानाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, पृथ्वीच्या कक्षेत इंधन भरण्यास सक्षम असेल. ही प्रणाली मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या नैसर्गिक H2o आणि Co2 संसाधनांमधून देखील इंधन भरू शकते. स्टारशिप पृथ्वीच्या कक्षेतून मंगळाच्या दिशेने प्रवास सुरू करेल. स्टारशिप 7.5 किमी/सेकंद वेगाने मंगळाच्या वातावरणात प्रवेश करेल आणि नंतर त्याचा वेग कमी होईल. या वाहनाचे हीट शील्ड एकाधिक प्रवेशासाठी डिझाइन केलेले आहे. वेग कमी झाल्यानंतर स्टारशिप मंगळावर उतरेल. पृथ्वीवरून मंगळावर पोहोचण्यास सुमारे 9 महिने लागतील आणि परत येण्यासाठी तेवढाच वेळ लागेल.
स्वप्नवत वाटणारी ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी एलन मस्क (Elon Musk) प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. त्याच्या मते पृथ्वीवर काही वर्षांनी मानवाला धोकादायक वातावरण तयार होणार आहे. अशावेळी मानवाचा बचाव करण्यासाठी इतर ग्रहांवर झालेली मानवी वसाहत कामी येणार आहे. त्यासाठीच मंगळावर वसाहत उभी करण्यात येत आहे.
सई बने