मशरुम आपण भाजी म्हणून खाते. परंतु तुम्ही कधी मशरुमची चहा प्यायला आहात का? खरंतर काही हेल्थ कोच सुद्धा याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. ग्रीन टी प्रमाणेच या चहामध्ये मशरुमचा अर्क असतो. जर तुम्हाला चहा पसंद नसेल तर तुम्ही मशरुम टी चे सेवन करु शकता. अन्य ड्रिंक्सच्या तुलनेत ही चहा पोषक आहे. (Mushroom Tea)
खरंतर ताज्या मशरुममध्ये अँन्टीऑक्सिडेंट आणि फायबर असतात. उन किंवा युवी किरणांच्या संपर्कात ते आल्यानंतर व्हिटॅमिन डी चे उत्तम स्रोत मानले जातात. हे अँन्टिऑक्सिडंट जुने आजार रोखण्यात भुमिका बजावतात. २०२१ मध्ये जर्नल ऑफ अफेक्टिव्ह डिसऑर्डर मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार असे समोर आले की, मशरुम खाल्ल्याने व्यक्तीला येणारे नैराश्य कमी होऊ शकते. नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थच्या मते, त्यामधील फायबर तुम्हाला फार मदत करतात. त्याचसोबत व्हिटामिन डी मुळे तुमची हाडं ही मजबूत होतात.
२०१६ मध्ये हेलियॉनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे समोर आले की, जनावरांवर शरुमच्या अर्काचे परिक्षण म्हणून करण्यात आले, तेव्हा त्यामध्ये कँन्सरशी लढण्याची क्षमता असते असे समोर आले.
तसेच ब्लड शुगर नियंत्रण आणि मुत्रपिंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी ऋषि मुनी सुद्धा मशरुमचा वापर करायचे. एका अभ्यासानुसार, मशरुम हे उंदरांच्या आतड्यांमधील बॅक्टेरियात सुधारणा करु शकतात. तसेच लिव्हरमध्ये ब्लड शुगर मॅनेज करण्यास ही मदत होते.
या व्यतिरिक्त प्रोबायोटिक युक्त पदार्थ हे आरोग्यासाठी लाभभदायक असतात असे मानले जाते. ते खाणे आरोग्यासाठी फार महत्वाचे असतात. वास्तवात प्रोबायोटिक्स तुमच्या आतड्यात खत म्हणून काम करतात. तर मशरूम सेलच्या भिंतींमध्ये बीटा-ग्लुकन्स असतात, जे पॉलिसेकेराइड-आधारित विद्रव्य फायबर आहे. बीटा-ग्लुकन्स हे शक्तिशाली इम्युनोमोड्युलेटर आहेत जे सामान्य इम्यूनोलॉजिकल फंक्शन राखण्यात मदत करतात. म्हणून, शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, उकळत्या पाण्यात एक चमचे उच्च दर्जाचे संपूर्ण मशरूम पावडर मिसळून टर्की टेल चहा बनवण्याचा सल्ला दिला जातो.(Mushroom Tea)
कशी बनवाल मशरुम टी
-बाजारातून मशरुमची पावडर घेऊन या
-पाण्यात टाकून ती उकळवा, असे केल्यानंतर तुमची मशरुम टी तयार होती.
-तुम्ही याला एक हर्बल सप्लीमेंटच्या रुपात मानू शकता. यामुळे तुम्हाला तणावापासून थोडा आराम मिळतो.
हेही वाचा- शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे
तज्ञांच्या मते जर मशरुम टी किंवा मशरुम कॉफी पिण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. खरंतर ही चहा फार महाग येते. तसेच जर तुम्ही एखादी औषधं घेत असाल तर डॉक्टरला या चहा बद्दल नक्की विचारा. कारण याचे साइड इफेक्ट्स काय होतील हे माहिती नाही.