जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश म्हणून इंडोनेशियाचे नाव घेतले जाते. या इंडोनेशियात काही दिवसापूर्वी भगवान मुरुगन यांच्या भव्य मंदिराचे उद्घाटन झाले. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन सामील झाले होते. सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रात असलेल्या या भव्य मंदिराला बघण्यासाठी आता अवघ्या इंडोनेशियातील नागरिक गर्दी करत आहेत. इंडोनेशियाला भेट देणारे परदेशी पर्यटकही या मुरुगन मंदिरात येत आहेत. (Indonesia)
या मंदिराचे होत असलेले कौतुक मात्र पाकिस्तानमध्ये टिकेचा विषय झाला आहे. इंडोनेशियासारख्या मुस्लिम लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या देशात भारतीय संस्कृतीतील मंदिर खुले झाले, याचा पाकिस्तानी जनतेला मोठा धक्का बसला आहे. जर पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीनं मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला असता, तर आम्ही ते उद्ध्वस्त केले असते, असे जहरी बोल येथील धर्मगुरु व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानातील अनेक मौलवींनी या मुरुगन मंदिराच्या बांधकामावरुन इंडोनेशियाच्या सरकारवर टिका केली आहे. मात्र या टिकेकडे दुर्लक्ष करीत इंडोनेशियन सरकारनं मुरुगन मंदिराच्या अन्य सुशोभिकरणाचे काम सुरु केले आहे. (International News)
भारतामध्ये अनेक मंदिरे आहेत. भारतातील हिंदू धर्मियांनी उभारलेली ही भव्य मंदिरे या देशाची ओळख आहे. यासोबतच भारताबाहेरील अनेक देशातही अशीच मंदिरे आहेत. विशेष म्हणजे, अलिकडच्या काळात सौदी अरेबिया, युएई सारख्या देशातही भव्य मंदिरे उभारण्यात आली आहेत. आता जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया देशातही भव्य असे मुरुगन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. भगवान मुरुगन हे भगवान शिव आणि पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय यांचे दुसरे नाव आहे. त्यांना सुब्रमण्य आणि स्कंद असेही म्हणतात. भगवान मुरुगन यांची दक्षिण भारतामध्ये अनेक मंदिरे आहेत. भगवान मुरुगन यांना तमिळ लोकांचे संरक्षक देव मानले जातेच शिवाय शौर्य, ज्ञान आणि दैवी कृपेचे प्रतीक म्हणूनही त्यांची पूजा केली जाते. भगवान मुरुगन यांची अनेक भव्य मंदिरे तामिळनाडूमध्ये आहेत. स्कंद षष्ठीच्या दिवशी या मंदिरांमध्ये मोठ्या थाटामाटात पूजा होते. आता याच भव्य मंदिरांमध्ये इंडोनेशियातील एका मुरुगन मंदिराचा समावेश झाला आहे. इंडोनेशियाच्या जकार्ता येथे भगवान मुरुगन यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. मंत्रोच्चार आणि प्रार्थनांसह या मंदिराचे लोकार्पण होतांना हजारो नागरिक उपस्थित होते. (Indonesia)
यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही ऑनलाइन उपस्थित होते. भगवान मुरुगन यांच्यासोबत या मंदिरात अन्य देवी देवतांच्याही मूर्ती आहेत. जकार्ता येथील या मुरुगन मंदिराला श्री सनातन धर्म आलयम म्हणूनही ओळखले जाते. इंडोनेशियातील भगवान मुरुगन यांना समर्पित असे हे पहिले मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम 2020 साली सुरु झाले. या मंदिरासाठी जकार्तामध्ये सरकारनं 4000 चौरस मीटर जमिनी दान केली आहे. अतिशय भव्य अशा या मंदिराच्या बांधकामात अनेक भारतीय मूर्तीकारही सामिल झाले होते. या मंदिराच्या उभारणीत इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो यांची मोठी भूमिका आहे. भारताच्या नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाला प्रबोवो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाकुंभभिषेक सोहळ्यात ऑनलाईन उपस्थित असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती प्रबोवो यांचे या मंदिराबाबत आभारही व्यक्त केले आहेत. (International News)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Narendra Modi : चर्चा फक्त JFK’s Forgotten Crisis पुस्तकाचीच
===============
इंडोनेशियात भगवान मुरुगन मंदिराचा सोहळा होत असतांना पाकिस्तानात मात्र संताप व्यक्त करण्यात येत होता. इंडोनेशियातील या मंदिराला उद्धवस्त केले पाहिजे, अशा प्रतिक्रीया येथील मौलानांनी दिल्या आहेत. मुळात इंडोनेशियामध्ये एवढ्या मोठ्या जमिनीवर हिंदू देवतेचे मंदिर उभारलेच कसे, असा प्रश्न येथील मौलवी विचारत आहेत. हे मंदिर पाकिस्तानात असते, तर आम्ही ते नक्कीच पाडले असते, असे संतापजनक वक्तव्यही येथील मौलवींनी केले आहे. या मंदिराबाबत पाकिस्तानातील सोशल मिडियामध्ये अनेक व्हिडिओ शेअर झाले असून इंडोनेशियातील मुस्लिमांनी आपल्या भूमीत असे मंदिर उभारणे चुकीचे असल्याचे सांगितले जात आहे. एवढा अपप्रचार पाकिस्तानात होत असला तरी इंडोनेशियात या मंदिराचे आनंदात स्वागतच झाले आहे. इंडोनशियाचे हजारे भाविक मंदिराला रोज भेट देत आहेत. तर इंडोनेशियन सरकारनं मंदिराच्या परिसराच्या सुशोभिकरणाला सुरुवात केली आहे. (Indonesia)
सई बने