गायीच्या गोमुत्रामध्ये औषधी गुणधर्म आहेत. या गोमुत्रामुळे मानवी शरीरातील अनेक रोग नष्ट होतात. शिवाय गायीच्या शेणाचाही वापर औषधासारखा करण्यात येतो. गायीचे शेण आणि गोमुत्र हे शेतीसाठीही सर्वोत्कृष्ठ खत आहे. ही माहिती आपल्याला दिली तर कदाचित खिल्ली उडवली जाईल. भारतात गायीला देवाचा दर्जा आहे. मात्र याच गायीची खुलेआम कत्तल केली जाते. तसेच गायीच्या गोमुत्रामध्ये आणि शेणामध्ये असलेल्या औषधी गुणधर्माकडे कानाडोळा केला जातो. मात्र या लेखाच्या सुरुवातीच्या ओळी या भारतातील नसून चक्क सुदान या दक्षिण अफ्रिकेतील एक देशातील आदिवासी जमातीच्या आहेत. सुदानमधील मुंडारी जमातीचे लोक गायीला देव मानतात. त्यांचे सर्वकाही गायी असतात. त्यांच्या जिवनाचे चक्रच गायींभोवती फिरत असते. हा सर्व दुष्काळी भाग आहे. पाण्याची इथे कमालीची कमतरता आहे. मात्र स्वतः पाणी न पिता आपल्या गायीला पाणी देणाही ही मुंडारी जमात आहे. (Mundari Tribe)
आपल्या गायींच्या संरक्षणासाठी या जमातीचे लोक एके 47 हे आधुनिक हत्यारही हातात घेतात. मुंडारी समाजाचा आणि गायींचे एवढ्या सख्याचे नाते आहे की, या गायीही आपल्या मालकाचा जरासा आवजही दूरवरुन ओळखतात. या समाजात स्टेटस सिंबल म्हणून गायींकडे बघितले जाते. ज्यांच्या गायी जास्त त्याची समाजात प्रतिष्ठा जास्त असते. अफ्रिकेच्या सुदानमधील मुंडारी समाजात गायींचे महत्त्व अनन्य साधारण आहे. येथील एका कुटुंबात किमान 200 गायी असतात. तेथील सर्व अर्थकारण आणि समाजकारण या गायींभोवती असते. कारण ज्या घरात गायी नाहीत, त्या घरातील मुलांना लग्न करण्यासाठी कोणीही मुलगी देत नाही. हे मुंडारी लोक आपल्या गायीच्या गोमुत्राचा आणि शेणाचाही वापर करतात. आपल्या घरातील एक सदस्य म्हणूनच ते गायींची जोपासना करतात. मुंडारी हा दक्षिण सुदानमधील एक लहान वांशिक गट आहे. मुंडारी जमातीची मुख्य भूमी दक्षिण मुख्यतः हे मुंडारी लोक मेंढपाळ आहेत. (International News)
त्यांच्याकडे गायींसोबत अन्य पाळीव जनावरांची संख्या अधिक असते. गाईला ते अंकोले-वाटुसी म्हणतात. मुंडारी जमातीच्या लोकांसाठी प्रत्येक घरात गाय असणे ही जिवनाची अविभाज्य बाब मानली जाते. ज्या लोकांकडे गाय नाही त्यांना मृत समजले जाते. त्यांच्या घरात कुठलाही व्यवहार होत नाही. त्या घरातील मुलींना वर मिळत नाही. तर मुलांना कोणीही मुलगी देत नाही. गायीसोबतच या लोकांचा दिवस सुरु होतो आणि ते या गायींसोबतच आराम करतात. गायींना कोणीही चोरुन नेऊ नये म्हणून त्यांची आधुनिक शस्त्रांसह देखरेख करतात. या भागात गायींचा गुरांचा राजा म्हणून पूजा करण्यात येते. अर्थात येथील गायीही भारतीय गायींपेक्षा ब-याच उंच असतात. या गायींची उंची 7 ते 8 फूट असते. तर लांबी त्याहूनही अधिक असते. (Mundari Tribe)
या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यानं कायमचा दुष्काळ असतो. मात्र या दुष्काळाची झळ मुंडारी आपल्या गायींना बसू देत नाहीत. गायींना डास आणि किडेही चावणार नाहीत, यासाठी ही काळजी घेतली जाते. मुख्य म्हणजे मुंडारी गायींचे गोमुत्र आणि शेण यांचा पुरेपूर वापर करतात. येथील लोक गोमूत्राने केस धुतात आणि शेण सुकवल्यानंतर त्याचा दातांना स्वच्छ करणा-या पावडरच्या स्वरूपात वापर करतात. मुंडारी समाजात गोमुत्राला पवित्र मानण्यात येतं, तसेच त्याचे औषधी महत्त्वही त्यांना माहित आहे. गोमुत्रानं शरीरातील सर्व दोष दूर होतात, अशी त्यांची धारणा आहे. या भागात क्वचित डॉक्टर येतात. आपल्याला औषधांपासून दूर ठेवण्यासाठी गोमुत्र पिणे गरजेचे असल्याचे मुंडारी सांगतात. मुंडारी समाजात गायी 40 ते 50 हजार रुपयांना विकत घेता येते. पण एखाद दुसरी गाय शक्यतो विकली जात नाही. येथे किमान 10 ते 100 अशा गायी एकसाथ विकल्या जातात. (International News)
======
हे देखील वाचा : किसान ब्रँडची रंजक कहाणी !
======
लग्नात मुलीच्या घरी नव-याला 200 गायी हुंडा म्हणून द्याव्या लागतात. तरच त्याला त्या घरची मुलगी मिळते. समजा या गायींपैकी एखादी गाय मेली तर या गायीच्या दुःखापोटी ते कुटुंब काही दिवस खाणे पिणेही बंद करते. त्याला गायीचा शोक म्हटले जाते. मुंडारी गायीला देवांची देणगी मानतात. त्यामुळे ज्या कुटुंबातील गायीचा मृत्यू होतो, त्या कुटुंबावर देवाची अवकृपा झाल्याची भावना असते. त्यातही या जमातीत परस्पर वादातून कुणाची हत्या झाली, तर गाय दिल्यास खुनाची शिक्षा माफ केली जाते. समजा, एखाद्या व्यक्तीने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारामारीच्या वेळी मारले तर त्याला त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या कुटुंबाला गाय द्यावी लागते. मगच त्याची शिक्षा माफ होते. हे मुंडारी जसे आपल्या गायींना नावानं ओळखतात, तशाच त्यांच्या गायीही आपल्या मालकांना ओळखतात. या अनोख्या मुंडारी समाजातील हे सख्य पहाण्यासाठी काही परदेशी पर्यटक आवर्जून मुंडारीबहुल भागाला भेट देतात. (Mundari Tribe)
सई बने