रोज रोज घरातलचं खाण्याचा कंटाळा आलाय असं म्हटलं की, लगेच आपला बाहेर खाण्याचा प्लॅन तयार होण्यास सुरुवात होते. अशातच चमचमीत, चटकदार, तिखट, तोंडाला पाणी सुटेल अशा ठिकाणी खाण्यासाठी जाण्यास आपण एका पायावर तयार होतो. अशातच आईचा नाराजीचा सुर जरी लागला तरीही त्याचा आपल्यावर काही फरक पडत नाही. त्यामुळे नेमके कुठे स्वस्तात पण मस्त अशा ठिकाणी खाण्यासाठी जायचे याचा विचार तर पडतोच ना? तुम्ही सुद्धा असेच काहीसे ठिकाण शोधत असाल Worry Not! कारण मुंबईतील अशा काही खाऊगल्ल्या (Mumbai Khaugallis) आहेत ज्या तुम्हाला चटकदार आणि चमचमीत अशा फास्टफुडसह हलक्याफुलक्या डिनरची ही सोय करुन देतात.
खाऊगल्ल्यांच एक भारी असतं ते म्हणजे एकाच प्रकारचे फास्टफूड न ठेवता आपल्याला विविध फूडचा स्वाद घेता येतो. त्यामुळे नक्की हे खाऊ की ते खायचे असा प्रश्नच पडू लागतो. खिशाला परवडणाऱ्या अशा मुंबईतील काही खाऊगल्ल्यांना (Mumbai Kahugallis) तुम्ही यापूर्वी कधी भेट दिली नसेल तर नक्कीच जा.

-कार्टर रोड खाऊगल्ली
समुद्राचे मंद-थंड वाहणारे वारे, तरुणाईची भरगच्च गर्दी आणि अनोखे वातावरण असलेल्या कार्टर रोडची खाऊगल्ली मुंबईतील खवय्यांसाठी आकर्षण आहे. येथे खासकरुन शॉरमा (Shawarma) खुप भारी मिळतो. या व्यतिरिक्त मोमोज, फलाफल, चाइनिज, कॉर्नचाट अशा विविध खाद्यपदार्थांची येथे रांगच लागलेली असतेच. कार्टर रोड येथील खाऊगल्लीत तुम्ही स्विट कपकेक, फ्रोजन योगर्ट किंवा डेजर्ट म्हणून वॅफल्स खायला विसरु नका. कार्टर रोडवरील कार्टर्स ब्लू, केपचाकी मोमोज आणि लस्सी ते परोठे येथील पदार्थांचा नक्की स्वाद घ्या.
-एसएनडीटी ते क्रॉस मैदान खाऊगल्ली
कॉलेजला किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी एकदम परफेक्ट असणारी खाऊगल्ली म्हणजे एसएनडीटी ते क्रॉस मैदान. मरिन लाइन्सजवळच ही खाऊगल्ली असून रात्री उशिरापर्यंत येथे खवय्यांची खाण्यासाठी गर्दी दिसून येते. मंच्युरियन राइस, आलू बेबी कॉर्न चाट, पाव भाजी, चिझ पनीर फ्रंन्की, आणि बॉम्बे सँन्डविच ही येथील खासियत आहे. या व्यतिरिक्त तुम्ही नॉन-वेज खाण्याचे चाहते असाल, तर क्रॉस मैदानाजवळ तुम्हाला चिकन करी आणि रोटी किंवा चटकन मिळाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला बटर पाव, भजी किंवा मिल्कशेकचा तुम्हाला मुंबईतील या खाऊगल्लीत (Mumbai Kahugallis) ऑप्शन मिळतो.

हे देखील वाचा- हे आहेत भारतातील बिस्किटांचे टॉप १० ब्रॅन्ड्स, ७ नंबरचा ब्रॅन्ड तर आहे विशेष लोकप्रिय!
-घाटकोपर खाऊगल्ली
जर तुम्ही पूर्णपणे व्हेजिटेरियन असाल तर घाटकोपरची खाऊगल्ली तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. या खाऊगल्लीत रिमिक्स डोसा अतिशय भारी मिळतो. विविध प्रकारचे डोसा तुम्हाला हे या खाऊगल्लीत नक्कीच मिळतील. या व्यतिरिक्त चीझ ब्रस्थ सादा डोसा, थाउसंड आयलँन्ड डोसा आणि आयस्क्रिम डोसा सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी सुटायला भागच पाडेल. जिनी डोसा, साई स्वाद डोसा आणि हॉट स्पॉट या खाऊगल्लीतील ठिकाणांना नक्कीच भेट द्या.
-मोहम्मद अली रोड खाऊगल्ली
नॉन-व्हेजिटेरियन लोकांसाठी तोंडाला पाणी सुटणारे खाण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मोहम्मद अली रोडची खाऊगल्ली. येथे तुम्हाला नॉन-व्हेजचे ऐवढे प्रकार खाण्यासाठी मिळतील की, काय नक्की खायचे असाच प्रश्न वेळोवेळी पडेल. मुघलाई पासून ते कबाब पर्यंतचे सर्व खाद्यपदार्थ येथे तुम्हाला मिळू शकतात. नल्ली निहारी आणि हलीम हे तर मोहम्मल अली रोडच्या खाऊगल्लीतील प्रमुख आकर्षण आहेत. ऐवढेच नव्हे तर सुलेमान बेकरी मधील फिरनी चवीला अप्रतिम लागते.
-ताडदेव खाऊगल्ली
ताडदेव गोविंदा पथक जसे सर्वत्र प्रसिद्ध आहे, तशीच येथील खाऊगल्ली सुद्धा खवय्यांचे आकर्षण आहे. ऑफिसला जाणारे ते एखाद्या दुकानात कामगार म्हणून काम करणारे कर्मचारी सुद्धा या खाऊगल्लीत तुम्हाला विविध पदार्थांची चव घेताना दिसून येतील. खिशाला परवडणारी आणि चवीला उत्तम अशी ही खाऊगल्ली. अशातच तुम्ही व्हेजिटेरियन असाल किंवा नॉन-व्हेज खाणारे असाल दोघांसाठी सुद्धा फुडचे विविध प्रकार येथे तुम्हाला उपलब्ध होतात. पुरी भाजा, साऊथ इंडियन लंच थाली, मटण बिर्याणी ते शॉरमा पर्यंतचे फूड्स तुम्हाला येथे मिळतात. ताडदेवच्या खाऊगल्लीला तुम्ही भेट देणार असाल तर सरदारची पावभाजी, मामाजी ग्रिल अॅन्ड पिझ्झा आणि हॉटेल साई गोमांतकला नक्की भेट द्या.