Home » मुंबईत रंगणार व्हर्च्युल गणेशोत्सव सोहळा

मुंबईत रंगणार व्हर्च्युल गणेशोत्सव सोहळा

by Correspondent
12 comments
Share

२०२० हे वर्ष जागतिक रोगाच्या विळख्यात सापडले असून यामुळे आपल्या राज्यासह मुंबईचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा वेळी महाराष्ट्राचे लाडके आराध्यदैवत श्री गणेशाचे आगमन अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपले असताना, या वर्षी उत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी केले आहे. दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र हीच गर्दी टाळण्यासाठी मुंबईचा गणेशोत्सव फेसबुक पेज तर्फे व्हर्च्युल गणेशोत्सव ची संकल्पना समोर आणली आहे.

पेज संचालकांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की गणेशोत्सव काळात आपल्या लाडक्या बाप्पाची झलक पाहण्यासाठी भाविक तासंतास रांगेत उभे राहतात यावर्षी एकंदरीत परिस्थिती पाहता कोणत्याही स्वरूपाची रोगराई पसरू नये याची काळजी प्रशासनासोबत मंडळे देखील घ्यायला तयार आहेत अशावेळी गर्दी टाळता यावी याकरता पेजवरून मोठं मोठी मंडळे फेसबुक, युट्युब आणि मुंबईचा गणेशोत्सव मोबाइल अँप च्या माध्यमातून २४ तास दर्शनासाठी भाविकांना उपलब्ध असतील या उपक्रमात मुंबईचा राजा, परेलचा राजा, गिरगावचा राजा, ठाण्याचा महाराजा अशा प्रमुख मोठ्या मंडळांशी पत्रव्यवहार केला आहे आणि आत्यास सकारात्मक प्रतिसाद मंडळांकडून देण्यात आला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

उत्सवाची सुरुवात मे महिन्यापासून सुरू होते मग त्यात मूर्तिकारांच्या कार्यशाळेत मंडळांची ये जा सुरू होते आणि जस जसे दिवस जाऊ लागतात तसतसे मोठमोठे आगमन सोहळे देखील सुरू होतात यंदा मात्र चित्र वेगळे आहे एकंदरीत वाढत जाणार. लॉकडाऊन आणि सामाजिक आणि शारीरिक अंतर ठेवून पाळले जाणारे नियम याचा विचार करून यंदाच्या गणेशोत्सव मध्ये मोठमोठ्या मंडळात ज्या भाविकांना पोहचता येणार नाही त्यांच्यासाठी गणेशोत्सव वर आधारित या पेज वर आपल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार.

मुंबईचा गणेशोत्सव पेज गेली ८ वर्षे पेजच्या माध्यमातून वर्षभर लोकांना अहोरात्र छायाचित्रांच्या मार्फत श्री गणेशाचे दर्शन घडवत असते नुकताच पेज ने ३००००० लाईक्सचा टप्पा पार केला आहे. त्याच सोबत लॉकडाऊन काळात गणेशभक्तांसाठी चित्रकला, टाकाउ पासून टिकाऊ, छायाचित्रण स्पर्धांचे आयोजन केले होते यास्पर्धांना खूप मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून त्याच सोबत पोलीस कर्मचाऱ्यांना पाणी, ज्यूस वाटप तसेच निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मार्फत आर्थिक स्वरूपात मदत गोळा केली अशी काही सामाजिक कार्ये देखील करीत आहेत.

पेज संचालक प्रणित तेजम व अमित कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता हा गणेशोत्सव घरी राहा सुरक्षित राहा याचा विचार करून बाप्पाला घरोघरी पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आम्हाला पार पाडायची आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी ओंकार कुलपे, निखिल मोरे, अखिल सावंत, विराज जांभळे, अनिकेत पवार, सोहम आफंडकर, नयन डुंबरे आणि तेजस दळवी यांनी सांभाळली आहे


Share

Related Articles

12 comments

amit kokate July 7, 2020 - 7:02 am

यंदाचा गणेशोत्सव सामाजिक अंतर राखून साजरा करताना तो कशा स्वरूपात पार पडेल याची काळजी वाटत होती पण मुंबईचा गणेशोत्सव टीम ने ती देखील चिंता मिरवली

Reply
Ashok Jambhale July 7, 2020 - 7:04 am

Thank u mumbaicha ganeshotsav

Reply
Anurag Pawar July 7, 2020 - 1:53 pm

यंदाचा गणेशोत्सव सामाजिक अंतर राखून साजरा करावा तो कशा स्वरूपात असेल याची काळजी वाटते

Reply
Nikhil July 7, 2020 - 7:15 am

Good job

Reply
Anupkumar S. Gawad July 7, 2020 - 7:49 am

जर एखाद्या मंडळाला या मध्ये सहभागी होण्यासाठी काय अटी व शर्ती आहेत. संपर्क कोणाला करावा. या बाबत माहिती उपलब्ध करून द्यावी.

Reply
Aniket Pawar July 7, 2020 - 8:27 am

⚜️ मुंबईचा गणेशोत्सव ⚜️
श्री. अमित कोकाटे
+918879893531

Reply
जितेश रघूनाथ गुरव July 7, 2020 - 4:30 pm

खुप छान ….
सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम पार पडेलच…
परंतू लांंब गेलेले अनेक कार्यकर्ते उत्सवा निमित्त मुंबईत यायचे….
आता “मुंबईचा गणेशोत्सव” टिम virtual उत्सव साजरा करते वाचलं….
तो ही प्रश्न मिटलाच….

धन्यवाद टिम…

Reply
Aniket Pawar July 7, 2020 - 8:24 am

खुप छान संकल्पना..
सर्व पेज अॅडमिनला ह्या संकल्पनेसाठी खुप खुप शुभेच्छा..🙏🙏

Reply
Siddhesh Patil July 7, 2020 - 9:59 am

Good job 👍

Reply
Jayesh shinde July 7, 2020 - 12:24 pm

Gr8

Reply
Vijay parulekar July 7, 2020 - 12:27 pm

Good job amit

Reply
जितेश रघूनाथ गुरव July 7, 2020 - 4:31 pm

खुप छान ….
सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम पार पडेलच…
परंतू लांंब गेलेले अनेक कार्यकर्ते उत्सवा निमित्त मुंबईत यायचे….
आता “मुंबईचा गणेशोत्सव” टिम virtual उत्सव साजरा करते वाचलं….
तो ही प्रश्न मिटलाच….

धन्यवाद टिम…

Reply

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.