‘अरुण गवळी’ हे नाव माहित नसलेली व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. केवळ मुंबईच नव्हे तर भारत आणि दुबईमध्ये या नावाने दहशत पसरवली होती. मुंबईतील कुख्यात गुंड म्हणजे अरुण गवळी. मागच्या दोन दिवसांपासून हे नाव सतत सगळ्यांच्याच कानावर पडत आहे. अरुण गवळी हा मागच्या १७ वर्षांपासून तुरुंगात होता आणि आता त्याची सुटका झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॉन असलेला अरुण गवळी १८ वर्षानंतर जेलमधून सुटला आहे. बुधवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून गुंड आणि राजकारणी अरुण गवळी उर्फ डॅडी यांची सुटका झाली. २००७ च्या एका खून प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गवळीला जामीन मंजूर केला. मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. (Arun Gawali)
एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेला अरुण गवळी मुंबईचा डॉन कसा बनला यामागे देखील एक स्टोरी आहे. अतिशय सर्वसामान्य मराठी घरात १७ जुलै १९५५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे अरुण गवळीचा जन्म झाला. पुढे चरितार्थ चालवण्यासाठी ते मुंबईला आले. त्याचे वडील गुलाबराव मजूर होते आणि नंतर ते मुंबईतील सिम्प्लेक्स मिलमध्ये काम करू लागले. त्याची आई लक्ष्मीबाई गृहिणी होती. आर्थिक अडचणींमुळे अरुण गवळीने मॅट्रिकनंतर शिक्षण सोडले आणि लहान वयातच काम करायला सुरुवात केली. तो घरोघरी दूध देण्याचे काम करू लागला. (Marathi News)
अरुण गवळी शाळेत असतानाच त्याचा संपर्क काही लहान मोठ्या गुंडांसोबत होऊ लागला होता. घरच्या गरिबाला कंटाळलेल्या गवळीला लवकरच श्रीमंत व्हायचे होते. यासाठीच गवळी विविध गँगमध्ये सामील झाला. तस्करी करणे आणि लोकांकडून जबरदस्तीने खंडणी घेणे असे गुन्हे तो सराईतपणे करू लागला. हळूहळू त्याचे नाव होऊ लागले आणि त्याच्या नावाची लोकांमध्ये दहशत बसू लागली. अशा पद्धतीने गवळीने त्याच्या क्राईम जीवनाची सुरुवात केली. (Todays Marathi Headline)

पुढे अरुण गवळीने दाऊद, छोटा राजन यांच्यासोबत देखील काम केले. अरुण गवळी आणि गुंड रामा नाईक हे खूपच जवळचे मित्र बनले. ८०-९० च्या दशकात मुंबईमध्ये अंडरवर्ल्डची मोठी दहशत होती. अनेक लहान मोठे गुंड सोबत घेऊन अरुण गवळी काम करत होता आणि तो गँगस्टर बनला. अशातच १०८० च्या आसपास त्याची भेट झाली ती दाऊदसोबत. पुढे तो दाऊद इब्राहिमसोबत काम करू लागला. दाऊदची बेकायदेशीर शस्त्रे आणि ड्रग्जची खेप सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी गवळीला देण्यात आली होती. ही मैत्री काही काळच टिकली. मात्र रामा नाईकच्या हत्येनंतर अरुण गवळी आणि दाऊदचे संबंध बिघडले. गवळीला या हत्येमागे दाऊद इब्राहिमचा हात असल्याचा संशय होता आणि यामुळेच ते कट्टर दुश्मन झाले. (Top Marathi News)
मुंबईतील दगडी चाळ परिसरात अरुण गवळी गँगची टोळी सक्रिय होती. इथूनच तो त्याचे काम सांभाळायचा. हळूहळू लोकांमध्ये तो ‘डॅडी’ नावाने ओळखला जाऊ लागला. अंडरवर्ल्डचा सर्वात मोठा डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन आणि रवी पुजारी सारख्या कुख्यात गुंडांविरुद्ध लढा दिला. १९९० च्या दशकात मुंबई पोलिसांच्या वाढत्या दबावापासून आणि टोळीयुद्धांपासून वाचण्यासाठी अरुण गवळीने राजकारणात प्रवेश केला. अरुण गवळीने अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष स्थापन केला. २००४ मध्ये त्यांनी चिंचपोकळी येथून विधानसभा निवडणूक जिंकली आणि आमदार झाला. (Top Trending News)
१९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटानंतर मुंबईतील अंडरवर्ल्डचे चित्र बदलले आणि सर्वच कुख्यात डॉन गुंड दुबईला पळवून गेले. यामुळे अरुण गवळीला मुंबईवर राज्य करण्याची आयती संधी मिळाली. त्याची टोळी खंडणी, तस्करी आणि खून यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होती. दगडी चाळ हे त्याचे मुख्य ठिकाण होते जिथून तो संपूर्ण मुंबईत सत्ता चालवत होतो. एकवेळ अशी आली जेव्हा छोटा राजन, दाऊदसारखे डॉन देवल गवळीपासून दूर राहायला लागले होते. (Loatest Marathi News)
२००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (MCOCA) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. त्याला ऑगस्ट २०१२ मध्ये सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. ७६ वर्षीय गवळीच्या सुटकेच्या वेळी न्यायालयाने त्याचे वय आणि दीर्घ तुरुंगवास लक्षात घेऊन जामिनाचा निर्णय घेतला. (Top Stories)
========
Donald Trump : या भारतीयापुढे ट्रम्प नितीची हार !
========
अरुण गवळीच्या आयुष्यावर चित्रपट काढायचा मोह सिनेसृष्टीला देखील आवरता आला नाही. मराठीमध्ये तर ‘दगडी चाळ’ नावाने अरुण गवळीवर चित्रपट निघाला असून यात मकरंद देशपांडेने मुख्य भूमिका साकारली होती. तर हिंदीमध्ये ‘डॅडी’ नावाने चित्रपट काढण्यात आला ज्यात अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत होता. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
