Home » काही राज्यांमध्ये एकही मंत्री नाही…भारतात किती आहेत मुस्लिम जनप्रतिनिधी?

काही राज्यांमध्ये एकही मंत्री नाही…भारतात किती आहेत मुस्लिम जनप्रतिनिधी?

by Team Gajawaja
0 comment
Muslims Leaders in India
Share

ब्रिटेनमध्ये ऋषी सुनक हे पंतप्रधान होणार असल्याने भारतात आनंदाचे वातावरण आहे. ब्रिटेनमध्ये ऋषी सुनक यांच्या नावाच्या घोषणेनंतर भारतात एका वर्गाकडून मागणी केली जात आहे की, ब्रिटेन प्रमाणेच भारतात सुद्धा अल्पसंख्यांक पंतप्रधान असावा. तसेच लोक अशी चर्चा सुद्धा करतायत की, भारताच्या राजकरणात आता मुस्लिम नेत्यांची कमतरता भासत आहे. त्याचसोबत मुस्लिम मंत्री नसल्याने काही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप ही करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकही मुस्लिम मंत्री नसल्याने लोक सांगतायत की, यापूर्वी किती मुस्लिम मंत्री आणि राष्ट्रपती होते. तर आकडेवारीवरुन समजून घेऊयात किती भारतात किती जनप्रतिनिधी मुस्लिम वर्गातील आहेत. तसेच यापूर्वी केंद्रात कधी आणि केव्हा मुस्लिम मंत्री होते त्याबद्दल अधिक. (Muslims Leaders in India)

भारतात किती मुस्लिम खासदार?
वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या आधारावर २७ मुस्लिम उमेदवारांचा विजय झाला होता. यापूर्वी २०१४ मध्ये लोकसभेत फक्त २३ खासदार होते. आतापासून ते १९८० मध्ये लोकसभेत मुस्लिम जनप्रतिनिधी पोहचले होते. त्यावेळी ४९ मुस्लिम खासदार होते.

काय आहे मुस्लिम आमदारांची स्थिती?
२०२० च्या रिपोर्ट्सनुसार, भारतात १० अशी राज्य आहेत जेथे ८० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. या १० राज्यांमध्ये २८१ मंत्री आहेत. ज्यापैकी १६ मंत्री हे मुस्लिम आहेत. टक्केवारीनुसार, ५७ टक्के मुस्लिम मंत्री आहेत ही जनसंख्या मुस्लिम लोकसंख्येच्या तिप्पट आहे. म्हणजेच जनसंख्येच्या हिशोबाने जेवढे मुस्लिम आहेत त्यापेक्षा कमी मुस्लिम मंत्री आहेत. यामध्ये चार राज्य आसाम, कर्नाटक, गुजरात आणि बिहार मध्ये भाजप मध्ये एक ही मुस्लिम मंत्री नाही.

Muslims Leaders in India
Muslims Leaders in India

तर २०२० मध्ये देशात जवळजवळ १५ राज्य अशी होती जेथे एक ही मुस्लिम मंत्री नव्हता. या राज्यांमध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपुर, मेघालय, मिजोरम, नागालैंड, ओडिसा, सिक्किम, त्रिपुरा आणि उत्तराखंडचा समावेश आहे. तर १० राज्य अशी आहेत जेथे फक्त एक-एकच मुस्लिम मंत्री आहे. पश्चिम बंगाल. केरळ सारख्या राज्यांमध्ये मुस्लिम मंत्र्यांची संख्या अधिक आहे. (Muslims Leaders in India)

हे देखील वाचा- नोटांवर गणपती-लक्ष्मीचा मोदी सरकारने फोटो लावावा, अरविंद केजरीवाल यांचे अपील

पक्षाची काय स्थिती?
जर पक्षाच्या नुसार नोव्हेंबर २०२० च्या एका रिपोर्ट्नुसार, २३३ एकूण मुस्लिम आमदार होते. यामध्ये काँग्रेसचे ७६, टीएमसीचे ३२, लेफ्टचे १९, एसपीचे १८, आययूएमएलचे १७, एआयएमआयएचे १४, एआययूडीएफचे १२ आणि अन्य पक्षांचे ४३ आमदार होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीत याचा आकडा बदलला आहे. मुस्लिम आमदारांची संख्या वाढली आहे. जसे युपीत सपीचे १७ वरून ३४ मुस्लिम आमदार झाले आहेत. तर २ आरएलडीचे मुस्लिम आमदार ही सहभागी झाले आहेत.

केंद्रात किती मंत्री राहिले होते?
अल्पसंख्यांक मंत्रालयाव्यतिरिक्त केंद्र सरकारमध्ये काही मुस्लिम मंत्री होते. जसे वर्ष १९४७, १९६६,१९७२ मध्ये शिक्षण मंत्री, १९६६ मध्ये परराष्ट्र मंत्री,१९८९ मध्ये गृह मंत्री मुस्लिम होते. या व्यतिरिक्त १९६७,१९७४,२००२ मध्ये राष्ट्रपती सुद्धा मुस्लिम होते. या व्यतिरिक्त भारताच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा काही मुस्लिम नेते होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.