पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरकाशी जिल्ह्याचा एक दिवसाचा दौरा केला. या दौ-यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी गंगा मातेचे हिवाळी निवासस्थान असलेल्या मुखवा येथील मंदिरात पूजा आणि आरती केली. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडमधील या धार्मिक स्थळाची महतीही सांगितली. सौंदर्याचे वरदान लाभलेल्या या मुखवा येथे जास्तीत जास्त भाविकांनी येण्याचे आवाहन केले. माता गंगेचे माहेर म्हणून या मुखवाची ओळख आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर मुखवा नेमकं कुठे आहे, आणि या मुखवाचे धार्मिक महत्त्व कसे आहे, याचा शोध सुरु झाला आहे. माता गंगेचे माहेर असलेल्या या मुखवामध्ये पर्यटन वाढवण्यासाठी उत्तराखंड सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ज्यांना निसर्गरम्य ठिकाणी जायचे आहे, अशा पर्यटकांनी उत्तराखंडमधील मुखवाला नक्की भेट द्यायलाच हवी. धार्मिकदृष्ट्याही मुखवाचे महत्त्व मोठे आहे. (Mukhava)
पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केल्यामुळे आता मुखवाचे महत्त्व अधिक वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील दौ-यादरम्यान माता गंगेचे हिवाळी मुक्काम स्थळ असलेल्या मुखवा येथे भेट दिली. माता गंगेची आरती करुन मोदी यांनी मुखवा या धार्मिक स्थळाचे महत्त्व जाणण्यासाठी तमाम देशवासीयांनी येथे भेट द्यावी असे आवाहनही केले. त्यापासून सोशल मिडियावर मुखवा नेमकं कुठे आहे, आणि माता गंगेचे माहेर म्हणून त्याला कसे ओळखले जाते याचा शोध सुरु झाला आहे. देवभूमी उत्तराखंड येथील मुखवा या गावाला मुखिमठ असेही म्हटले जाते. येथेच हिवाळ्यात, चार धामच्या देवतांची पूजा करण्यात येत. मुखवा हे उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल खोऱ्यात वसलेलं गाव आहे. (Marathi News)
या गावाभोवती डोंगर असून निसर्गाची देणगी मुखवाला मिळालेली आहे. मुखवा गाव गंगा नदीच्या काठावर वसलेले असल्यामुळे गावाच्या सौंदर्यात अधिक भर पडते. मुखिमठ अशी ओळखही असलेल्या या गावातील गंगा मातेचे मंदिर हे पुरातन आहे. या मंदिराला गंगा मातेचे मातृगृह असेही म्हणतात. मुखवाचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. या मुखवाच्या आसापस असलेल्या डोंगरावर अनेक साधू-संत रहातात. माता गंगेचे दर्शन करण्यासाठी हे साधू वर्षातील ठराविक कालावधित मंदिरात येतात. त्यानंतर ते त्यांच्या साधनास्थळावर अखंड ध्यानधारणा करतात. त्यामुळे मुखवाचे आध्यात्मिक महत्त्व वाढले आहे. (Mukhava)
आध्यात्मिक आणि अद्भुत सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले मुखवा हे उत्तरकाशीपासून सुमारे 75 किमी अंतरावर आहे. याच मुखवामध्ये हिवाळ्यामध्ये माता गंगेची मूर्ती गंगोत्रीहून पालखीतून आणली जाते. यादरम्यान गंगोत्री धाम पूर्णपणे बर्फाने झाकलेले असते. गंगोत्री बर्फाच्या आवरणाखाली जाण्यापूर्वी मुखवा येथील रहिवासी गंगोत्रीमध्ये जातात, आणि माता गंगेला आपल्या गावी घेऊन जातात. हा सोहळा बघण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. माता गंगेला माहेरी नेण्यात येत आहे, अशी यामागे सर्वांची भावना असते. त्यामुळे मुखवाला माता गंगेचे मातृगृह म्हटले जाते. (Marathi News)
गंगोत्री धामचे दरवाजे बंद झाल्यानंतरही भाविक गंगामातेची पूजा या मुखवा गावातील मंदिरात करु शकतात. मुखवा येथील मंदिरालाही पौराणिक महत्त्व आहे, आणि या मंदिरात गंगा मातेची पूजा केल्यानं व्यक्तीला त्याच्या कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती मिळते अशी भक्तांची धारणा आहे. अलिकडच्या वर्षात हिवाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे मुखवामध्ये या कालखंडात पर्यटकांची मोठी गर्दी असते. (Mukhava)
===============
हे देखील वाचा : Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !
Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
समुद्रसपाटीपासून सुमारे 8 हजार फूट उंचीवर असलेल्या मुखवामध्ये गंगोत्री धामच्या पुजाऱ्यांसह 450 कुटुंबे राहतात. गंगोत्री धामचे दरवाजे बंद झाल्यावर हिवाळ्याचे 6 महिने गंगोत्री धामचे पुजारी मुखावा गावातच रहातात आणि मातेची पुजा करतात. मुखवा गावाला मातंग ऋषींची भूमी म्हणूनही ओळखले जाते. येथेच मातंग ऋषींनी तपश्चर्या केली होती आणि गंगा मातेकडून हिवाळ्यात या ठिकाणी राहण्याचे वरदान मागितल्याची कथा सांगितली जाते. मातंग ऋषींच्या नावावरूनच मुखवा गावाचे नाव ठेवण्यात आले आहे. मुखवामध्ये जाण्यासाठी दिल्लीहून विमान आणि गाड्यांची सोय आहे. आता मुखवामध्ये पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी पर्यटकांसाठी निवासस्थाने उभारण्यात येत आहेत. येथील स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून होमस्टेही उभारण्यात आले आहेत. शिवाय पर्यटकांना स्थानिक भोजनाचा आस्वाद मिळावा म्हणून अनेक महिलांनी घरगुती खानावळीचा व्यवसाय सुरु केला आहे. (Marathi News)
सई बने